दादोजी कोंडदेव स्टेडियम, पांढरा हत्ती ठाणे महापालिका कोणासाठी पोसत आहे

 दादोजी कोंडदेव स्टेडियम, पांढरा हत्ती  ठाणे महापालिका कोणासाठी पोसत आहे, या मथळ्याखाली ठाण्यातील एका दैनिक वर्तमानपत्राने दादोजी कोंडदेव स्टेडीयमच्या नुतनीकरण कामामध्ये झालेल्या प्रचंड घोटाळ्याला वाचा फोडली आहे. क्रिडा अधिक्षक श्रीमती पालांडे आल्यापासून स्टेडियमच्या दुरुस्तीवर झालेल्या खर्चाचा सविस्तर तपशील ठामपाने जाहिर करावा, अशी मागणीही याद्वारे करण्यात आली आहे. स्टेडियम म्हणजे केवळ दर्शनी भाग असा समज असलेल्या क्रिडा अधिक्षकांनी  स्टेडियमची धुरा घेतल्यापासून स्टेडियमची प्रगती केली झाली असल्याचे भासवत आहेत. मात्र दादोजी कोंडदेव स्टेडियम हा पांढरा हत्ती असल्याचे नेहमीच पालिका प्रशासन बोलत आले आहे. या स्टेडियमला दरवर्षी लाखो-करोडोचा खर्च करूनही त्यामधून कोणतेही भरीव उत्पन्न अद्यापही महापालिकेला मिळालेले नाही. तरीही  या स्टेडियमच्या दुरुस्तीखाली अधिकारी वर्ग आपले खिसे भरत असल्याचे स्पष्ट होत आहे. 

त्यातच काही वर्षापूर्वी क्रिडा अधिक्षक म्हणून रुजू झालेल्या श्रीमती पालांडे यांनी या वास्तुचे नुतनीकरण करण्याचा सपाटाच लावला आहे. त्यांच्या कार्यकाळातच स्टेडियमचे गेट दोन वेळा बदलण्यात आले. कोणत्याही प्रकारची शहनिशा न करताच बोरींग-वेल खोदण्याचा प्रकारही करण्यात आला. स्टेडियम अंतर्गत बांधण्यात आलेल्या छोट्या गार्डनचाही बळी नाल्याच्या बांधकामाच्या वेळी घेण्यात आला. इतकेच नव्हे तर  नाल्याच्या बांधकामासाठी एक जुना वृक्षही पाडण्यात आला. हा पाडलेला वृक्ष अद्यापही वर्षाहून अधिक काळ लोटला तरी तिथेच पडून आहे. येथील छोट्याश्या उद्यानामध्ये मागील दहा वर्षापासून अनेक वृक्षांची लागवड करण्यात आली होती. मात्र नाल्याच्या बांधकामासाठी येथील वृक्षांची छाटणी करण्यात आली  नाल्याच्या बांधकामामध्ये अनेक वृक्षांचा बळी गेला आहे. याबाबत पालांडे अनभिज्ञ आहेत का? अनेक क्रिडा प्रकारासाठी वेगवेगळ्या दुरुस्त्या करण्यात आल्या मात्र यामधून किती उत्पन्न पालिकेला मिळाले याचा तपशील जाहीर व्हावा.अशी मागणीही आता ठाणेकरांनी केली आहे.  

स्टेडियमची भींत असताना देखील या भींतीवरून ड्रेनेज लाईन टाकण्यात आली आहे. ही ड्रेनेज लाईनला नेहमीच गळती असते. गाळेधारकांना या ठिकाणी बसणेही मुश्कील होत आहे. नेहमीच पाणी साठलेले असल्याने येथे सतत मच्छरांचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे पालांडे यांचे लक्ष नाही का? दरवर्षी पावसाळ्यामध्ये गाळ्यांमधून पाणी साचते. महानगर पालिका तकलादू कारवाई करते आणि पुन्हा जैसे थे अवस्था असते.   ज्या तऱ्हेने ठाणे महानगर पालिकेने काही वर्षापुर्वी कर  थकबाकीदारांची यादी वर्तमानपत्रातून आणि ठिकठिकाणी बोर्ड लावून प्रसिद्ध केली होती. त्याचप्रमाणे या स्टेडियमच्या दुरुस्तीसाठी श्रीमती पालांडे आल्यापासून झालेल्या सर्व खर्चाची तपशीलवार माहिती प्रसिद्धी करावी

दोन वेळा बनलेल्या लॉन टेनिस कोर्टाची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. पुर्वी याला छप्पर नव्हते आजुबाजूला हायमाक्सचे दिवे लावण्यात आले होते. मात्र नंतर पावसाळ्यात याची दुरावस्था झाल्यानंतर हायमाक्सचे दिवे गायब झाले आणि याच्यावर छप्पर आले तेही  अर्धवट त्यानंतर पुन्हा वर्षभराने ते पुर्ण करण्यात आले. क्रिडा अधिक्षक श्रीमती पालांडे यांनी अधिभार घेतल्यापासून सुमारे दहा वर्षाच्या काळात स्टेडियमच्या अंतर्गत आणि बाहेरील भागातील वेगवेगळ्या पद्धतीने दुरुस्तीचे नुतनीकरणाचे काम आजपर्यंत अद्यापही सातत्याने सुरु आहे.  या काही वर्षात 100 कोटीहून अधिक आर्थिक घोटाळा झाला असल्याची चर्चा आता ठाण्यात रंगली आहे. याचा शोध घेतला असता स्टेडियममध्ये अनेक कामे दोन दोन वेळा झाली आहेत. कोणतेही पूर्वनियोजन न करता ही कामे करण्यात आली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे बोरींग वेल दोन दोन बोरींग वेल खोदण्यासाठी झालेला खर्च हा सर्वसामान्य नागरिकांनी कररुपाने दिलेला. मात्र हे अधिकारी आपल्या मर्जीनुसार वारेमाप उधळपट्टी करीत असल्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे दादोजी कोंडदेव स्टेडियम 

ओपन लॉन कोर्टासाठी आधी शेड नसलेले बांधकाम करण्यात आले त्यासाठी प्रचंड किमतीचे हायमाक्सचे दिवे  लावण्यात आले. मात्र याचा उपयोग काडीमात्र झाला नाही. ओपन लॉन कोर्टाची पावसाने दुर्दशा केल्यानें त्यावर नंतर शेड बांधण्यात आले मात्र हे शेडही अर्धवट बांधण्यात आले. पुन्हा काही काळानंतर हे शेड पूर्ण करण्यात आले. अशा तऱहेने कोणत्याही नियोजनाअभाव स्टेडियममध्ये दुरुस्ती, नुतनीकरणाची अनेक कामे करण्यात आली आहेत.  या सर्व बांधकामांची कंत्राटे कोणत्या कंत्राटदाराला देण्यात आली आहेत. याचा शोध घेतला असता स्वतःच्या घरातीलच कंत्राटदार असल्याचे समजते. कंत्राटदार आणि अधिक्षक पालांडे यांचे साटेलोटे असल्यानेच हा सर्व व्यवहार खुलेआम सुरु आहे.  

कोणत्याही कामाचा अनुभव  नसताना, केवळ प्रभारी क्रिडा अधिकारी म्हणून नेमणूक झालेल्या मिनल पालांडे यांनी संपुर्ण स्टेडियमचा कारभार स्वतकडे कसा काय घेतला. क्रिडा अधिकारी यांचे काम काय? दादोजी कोंडदेव स्टेडियमकरीता पुर्णवेळ व्यवस्थापकाची नेमणूक का करण्यात येत नाही. स्टेडियममध्ये काही समस्या निर्माण झाल्यास श्रीमती पालांडे या मुख्यालयात असल्याचे सांगण्यात येते. तेथे त्या भांडारपाल म्हणूनही काम पहात आहेत. या सर्व प्रकारात महापालिकेचे उपायुक्तांचा आणि लोकप्रतिनिधींचा किती वाटा आहे याची देखील चौकशी व्हावी.  सर्वसामान्यांनी कर नाही भरला तर जप्ती आणणाऱया  ठाणे महानगर पालिकेने या सर्व कारभाराची लेखा परिक्षण विभागामार्फत चौकशी करून आजपर्यंत झालेला सर्व खर्च सामायिक करावा. विद्यमान  आयुक्तांनी सत्यता जाणून घ्यावी. 

या घोटाळाधारी क्रिडा अधिक्षक आता पदोन्नती करिता प्रयत्नशील असल्याचे खात्रीलायक वृत्त कळत आहे. क्रिडा क्षेत्रातील एक पदक असलेल्या क्रिडा अधिक्षक म्हणून नियुक्त झाल्यानंतर त्यांच्यावर भांडारपाल म्हणून अधिक जबाबदारी देण्यात आली. अधिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी दादोजी कोंडदेव स्टेडीयमची रुपरेखाच बदलली आहे. आल्यापासून प्रत्येक काम दोन वेळा करण्याचा विक्रम यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. मात्र याबाबत मागणी करूनही कोणतीही चौकशी नाही. किंवा काही कारवाई नाही. उलट या श्रीमती पालांडें यांना पदोन्नतीसाठी प्रयत्नशील आहेत. दादोजी कोंडदेव स्टेडियम हा पांढरा हत्ती असल्याचे नेहमीच पालिका प्रशासन बोलत आले आहे. या स्टेडियमला दरवर्षी लाखो-करोडोचा खर्च करूनही त्यामधून कोणतेही भरीव उत्पन्न अद्यापही महापालिकेला मिळालेले नाही. तरीही प्रत्येक अधिकारी या स्टेडियमच्या दुरुस्तीखाली आपले खिसे भरत असल्याचे स्पष्ट होत आहे.या सर्व प्रकारात महापालिकेचे संबंधित विभागाचे  उपायुक्त संदीप माळवी आणि स्थानिक नगरसेवक लोकप्रतिनिधींचा किती वाटा आहे याची देखील चौकशी व्हावी.  सर्वसामान्यांनी कर नाही भरला तर जप्ती आणणाऱ्या  ठाणे महानगर पालिकेने या सर्व कारभाराची लेखा परिक्षण विभागामार्फत चौकशी करून आजपर्यंत झालेला सर्व खर्च वर्तमानपत्रातून जाहीर करावा. ज्या ज्या ठेकेदारांना या कामांचे कंत्राट देण्यात आले आहे त्यांची नावे जाहीर करावी.  त्यांना देण्यात आलेली  बीले देखील जाहीर करावी . ज्या तऱ्हेने ठाणे महानगर पालिकेने काही वर्षापुर्वी कर  थकबाकीदारांची यादी वर्तमानपत्रातून आणि ठिकठिकाणी बोर्ड लावून प्रसिद्ध केली होती. या सर्व खर्चाची तपशीलवार माहिती प्रसिद्धी करावी. अशी मागणी आता होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA