... तर लॉकडाऊनची वेळ येऊ शकते - विजय वडेट्टीवार

कोरोनाच्या लक्षणांमध्ये काही बदल झाले आहेत. मात्र कितीही सांगितलं तरी लोक विनामास्कचे फिरत आहेत. कुठलीही काळजी लोक घेत नाही. त्यामुळे आता काही कठोर पावलं उचलावी लागणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की, मास्क लावणं, गर्दी टाळणं, हे नियम नागरिकांनी पाळावेत. लग्न समारंभात गर्दी टाळण्यासाठी आम्ही आता मंगल कार्यालयांवर कारवाई करण्याचं सुरु केलं आहे. साधारणत: संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार सुरु आहे. जर लोकांनी सुरक्षेची काळजी घेतली नाही, तर लॉकडाऊनची वेळ येऊ शकते,” असे विजय वडेट्टीवार म्हणाले. 

मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक यासारख्या शहरात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत चालले आहे. राज्य सरकारकडून कोरोनाचे नियम पालन करा, असे आवाहन केले जात आहे. मात्र सर्वसामान्य जनतेकडून हे नियम पायदळी तुडवले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार केला जात आहे. सर्वसामान्यांनी कोरोनाच्या गाईडलाईन्स पाळाव्यात, यासाठी अनेक ठिकाणी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. सार्वजनिक ठिकाणी, लोकल ट्रेनमध्ये कोरोनाच्या गाईडलाईन्सचे पालन करावे, असेही सांगितले जात आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे, गर्दीत जाणे टाळणे याबाबत सर्वसामान्य नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच लग्नाचे हॉल किंवा विवाह समारंभांशी संबंधित कार्यालयांवरही कारवाई सुरु करण्यात आली आहे. राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात साधारण संध्याकाळी 6 ते सकाळी 9 पर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार सरकारकडून केले जात आहे. विशेष म्हणजे जर कोरोनाच्या रुग्णांमध्ये अशाचप्रकारे सातत्याने वाढ झाली, तर मग पूर्णपणे लॉकडाऊनही केले जाऊ शकतं. 

सरकारकडून संपूर्ण राज्यात एकाच वेळी नाईट कर्फ्यू लावला जाऊ शकतो का? असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांना विचारण्यात आला होता. यावर वडेट्टीवार म्हणाले, सध्या मुंबईसह इतर सर्व ठिकाणी नाईट कर्फ्यू लावण्याबाबत विचार करण्यात आलेला नाही. पण संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे अधिकार देण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शक्य त्या उपाययोजना राबवा, असे आदेश देण्यात आले आहेत.प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या, संसर्गाचा प्रसार होण्याची गती, बाजारपेठेत किंवा सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी या सर्व बाबी पाहून नाईट कर्फ्यूबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच जर नाईट कर्फ्यू लागू करुनही परिस्थिती सुधारली नाही, तर कठोर पावलं उचलावी लागतील, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. 

दरम्यान  गेल्या दोन आठवड्यांत मुलुंड, चेंबूर, अंधेरी पूर्व-जोगेश्वरी पूर्व, बोरिवलीमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. होम क्वारंटाइन असलेले बाधित व काही संशयित रुग्ण नियम मोडून घराबाहेर फिरत आहेत. त्यामुळे महापालिकेने प्रतिबंधित इमारतींचे नियम कठोर केले आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापुढे पाच बाधित रुग्ण आढळले तरी संपूर्ण इमारत सील (प्रतिबंधित) करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. इमारत सील केल्यानंतरही काही रहिवासी घराबाहेर जात असल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. 

चेंबूर हॉटस्पॉट गेल्या आठ दिवसांत चेंबूरमध्ये कोरोना रुग्णांचा संख्या वाढत असल्याने पालिकेने सुमारे ५५० इमारतींना क्वारंटाइनचे नियम पाळा, नाही तर कारवाई करू, असा इशारा दिला होता. मात्र, रहिवाशांच्या मानसिकतेत काही बदल न झाल्यामुळे पाचपेक्षा जास्त रुग्णसंख्या असलेली चेंबूर, मैत्री पार्क येथील सफल हाइट, चेंबूर पोलीस ठाण्यासमोरील नवजीवन सोसायटी, सिंधी सोसायटी बंगलो नं. १३ मधील साई त्रिशूल आणि आरसी मार्ग मारवली गावाजवळ शिवधाम या इमारती सील करण्यात आल्या आहेत. १४ दिवस बाहेर पडण्यास मनाई सील इमारतींमधील रहिवाशांना पुढील १४ दिवस इमारतींबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. १४ दिवसांनंतर या इमारतींमधील रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात येईल. संख्या कमी झाली तर सील काढले जाईल. मात्र, रुग्णसंख्या कमी झाली नाही तर इमारत सील राहणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या