पुण्यात सार्वजनिक बांधकाम खात्यात 'एफडीआर' घोटाळा, कारवाई न झाल्यास येत्या अधिवेशनावेळी तीव्र आंदोलन

 पुण्यात सार्वजनिक बांधकाम खात्यात 'एफडीआर' घोटाळा 
 कार्यकारी अभियंत्याची चौकशी करा: भीमराव चिलगावकर 

मुंबई
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग यांनी त्यांच्या कार्यकाळात कामे वितरित करताना निविदांतिल अटी-शर्तिची पूर्तता न केलेल्या कंत्राटदारांवर सुद्धा कंत्राटांची बरसात करण्याचे धोरण नेहमीच अवलंबले आहे. या प्रकरणात नियमांना साफ हरताळ फासल्याबद्दल त्यांनी कामे  वितरित केलल्या कंत्राटदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची सखोल चौकशी करण्यात यावी. अशी मागणी बहुजन संग्रामचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर यांनी एका निवेदनाद्वारे सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे.

तेलंग यांनी ठेकेदारांशी संगनमत करून कोट्यावधींची कामे वितरित करताना अनामत रकमेबाबतच्या अटी शर्ती संदर्भात राज्य सरकारची फसवणूक करण्यात ठेकेदारांना साथ दिली आहे, असा आरोप केला जातो. त्यांचा हा 'एफडिआर' घोटाळा सार्वजनिक बांधकाम खात्यात सध्या चर्चेचा विषय बनला आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे येथील तत्कालीन कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर यांचा तीन वर्षाचा कार्यकाल पुणे होण्याआधीच त्यांची उचलबांगडी करून त्यांची जागा हस्तगत करण्यात सफल ठरलेल्या निरंजन तेलंग यांनी गेली तब्बल ७ वर्ष पुणे मंडळातच तळ ठोकला आहे, अशी माहिती चिलगावकर यांनी दिली आहे.

स्वतः एका कार्यकारी अभियंत्याला कार्यकाल संपण्याअगोदरच विस्थापित करणाऱ्या तेलंग यांनी नंतरच्या काळात आपल्या विभागात २००५ सालातील बदली कायदाच साफ मोडीत काढला आहे. त्यांनी अभय दिल्यामुळेच त्यांच्या विभागात वर्ग ३ आणि ४ वर्गातील भ्रष्टाचाराच्या तक्रारी असलेले अनेक कर्मचारीही बस्तान ठोकून आहेत, याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्र्याचे लक्ष वेधले आहे. कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग यांच्या भ्रष्ट आणि पक्षपाती कारभारामुळे शासन नियमानुसार, दर तीन वर्षानी होणारी बदली निमूटपणे स्विकारत असलेल्या अधिकारी आणि कर्मचारऱ्यामध्ये नैराश्य पसरत चालले आहे. त्यांचा विपरीत परिणाम त्यांच्या कर्तव्य भावनेवर आणि संचोटिवर पडण्याचा धोका आहे, असे भीमराव चिलगावकर यांनी म्हटले आहे.

निरंजन तेलंग यांच्या 'एफडीआर' घोटाळ्यांत त्यांची त्वरित उच्चस्तरिय चौकशी करण्यात यावी. तसेच पुणे मंडळात ७ ते १० वर्ष तळ ठोकलेल्या त्यांच्या सहित संबंधित अधिकारी आणि वर्ग ३ आणि ४ च्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांची सरळ अन्य प्रादेशिक विभागात बदली करून सार्वजनिक बांधकाम मंडळ, पुणेची 'सफाई' करण्यात यावी, अशी मागणी बहुजन संग्रामने केली आहे.  या प्रकरणी त्वरित अपेक्षित कारवाई न झाल्यास विधीमंडळाच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशना वेळी बहुजन संग्रामतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भीमराव चिलगावकर यांनी दिला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या