महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे ठाणे जिल्ह्यात सामूहिक रजा आंदोलन

 ठाणे

उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील शासकीय कर्तव्यावर असलेले नायब तहसीलदार वैभव पवार यांचेवर जीवघेणा हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणा-या मुजोर रेती माफियांवर अटकेची कारवाई झाली नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने आंदोलन पुकारले  व त्या आंदोलनात एक टप्पा म्हणून  मंगळवारी  आज दि.२फेब्रुवारी रोजी संघटनेच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील तहसीलदार व नायब तहसीलदारांनी "सामूहिक रजा" आंदोलन करीत ठाणे जिल्ह्याच्या अपर जिल्हाधिकारी वैदही रानडे यांना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी निवेदन दिले.यावेळी  हल्लेखोर कुख्यात गुंड रेतीमाफिया अविनाश चव्हाण याला तात्काळ अटक करण्याची मागणी  करण्यात आली .  

             नायब तहसीलदार वैभव पवार यांच्यावर करण्यात आलेला चाकूहल्ला व त्यानंतर अद्यापही आरोपींना अटक न केल्याबाबत  महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या  सर्व कार्यकारिणी सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली .संघटनेने या बाबतीत तीव्र आंदोलन उभारले .या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रातील तहसीलदार नायब तहसीलदार व संघटनेत समाविष्ट उपजिल्हाधिकारी हे एक दिवसाचे सामूहिक रजा आंदोलनात सहभागी  झाले.संघटनेचे ठाणे जिल्हयातील सर्व सदस्य उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी  मंगळवारी 02.फेब्रुवारी रोजी  सामूहिक रजा आंदोलनात सहभागी झाल्याच्या सह्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे यांना दिले या निवेदनात जिल्हा खनिज निधी मधून सशस्र सुरक्षा रक्षक पुरविणेबाबत,एक दिवसाची नैमत्तिक रजा मंजूर करण्याची मागणी प्रसंगी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) बाळासाहेब वाकचौरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अर्पणा आरोलकर सोमाणी, ठाणे जिल्हा पुरवठा अधिकारी राजू थोटे, सहाय्यक ठाणे जिल्हा पुरवठा अधिकारी विजय पाटील ,तहसीलदार, ठाणे युवराज  बांगर, तहसीलदार, भिवंडी अधिक पाटील, राजेंद्र चव्हाण  यांच्यासह  ठाणे जिल्ह्यातील तहसीलदार ,नायब तहसीलदार आदी या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी आरोपीच्या निषेधार्थ सर्वानी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार घोषणा बाजी केल्या.


     कोकण विभागातील तहसीलदार, नायब तहसीलदार व उपजिल्हाधिकारी महाराष्ट्र राज्य तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये यवतमाळ तालुक्यातील वैभव पवार यावर करण्यात आलेला चाकूहल्ला व त्यानंतर अद्यापही आरोपींना अटक न केल्याबाबत सर्व कार्यकारिणी सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.संघटनेने या बाबतीत तीव्र आंदोलन उभारायची भूमिका सर्वांनी घेतलेली आहे. या अनुषंगाने उद्या 2 फेब्रुवारी रोजी  संपूर्ण महाराष्ट्रातील तहसीलदार नायब तहसीलदार व संघटनेत समाविष्ट उपजिल्हाधिकारी हे एक दिवसाचे सामूहिक रजा आंदोलनात सहभागी होणार असल्याबाबत आधी ठऱवण्यात आले होते.      यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक निवेदन तयार करून त्यामध्ये सदर घटनेचा उल्लेख करायचा व त्यावर सामूहिकपणे सर्वांनी रजेसाठी स्वाक्षऱ्या करायचे व हे निवेदन उद्या प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना द्यायचे व कोणीही कामकाज करणार नाही असा ठाम निर्धार झाला होता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या