Top Post Ad

काँग्रेसचे मुंबईत शक्तीप्रदर्शन, टिळक भवन ते ऑगस्ट क्रांती मैदान ट्रॅक्टर रॅली

 काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मावळते प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडून औपचारिकरित्या पदभार आज स्वीकारला. मुंबईतील टिळक भवन येथे हा कार्यक्रम झाला. यानंतर काँग्रेसने मुंबईत शक्तीप्रदर्शन करत ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत ट्रॅक्टर रॅली काढली. यावेळी हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. ट्रॅक्टर रॅलीदरम्यान माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, 'नरेंद्र मोदींनी देशातील शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. राज्यसभेच्या माध्यमातून आंदोलनावर टीका केली, तसेच त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे पाप केले आहे. या माध्यमातून आम्ही देशाच्या अन्नदात्याचा अपमान करेल त्याच्याविरोधात या पध्दतीची व्यवस्था निर्माण केली जाईल असा संदेश देत आहोत' असे नाना पटोले म्हणाले.

काँग्रेस महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही, यापुढं काँग्रेसच महाराष्ट्रात सत्तेत राहणार,' असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. 'महाराष्ट्रात आज जी लाट दिसत आहे ती परिवर्तनाची लाट आहे. केंद्रातील हुकूमशाही सरकारविरोधातील परिवर्तनाची लाट. मुंबईत महात्मा गांधींनी परकीयांना बाहेर काढण्याचा जो विचार मांडला तोच विचार आम्ही मांडत आहोत. देशातील हुकूमशाही मोदी सरकारविरोधात चले जावची घोषणा आम्ही देणार आहोत,' अशी टीका पटोले यांनी केली आहे. 'नरेंद्र मोदींनी देशाच्या शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. राज्यसभेच्या माध्यमातून आंदोलनावर टीका केली. त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे पाप केलं. या माध्यमातून आम्ही देशाच्या अन्नदात्याचा अपमान करेल त्याच्याविरोधात या पद्धतीची व्यवस्था निर्माण केली जाईल असा संदेश आम्ही देत आहोत,' असा घणाघातही त्यांनी केला आहे.

पुढे बोलताना पटोलो यांनी महागाईवरही बोट ठेवले. 'आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर कमी आहेत. तरीही 100 रुपयांपर्यंत दर गेलेले आहेत. देशातील जनतेची लूट केली जात आहे. तसेच महागाई त्याविरोधातही आम्हाला संदेश द्यायचा आहे' असेही पटोले म्हणाले. 'देशात इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत. यावरही नाना पटोले यांनी लक्ष वेधलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी असतानादेखील पेट्रोलचे दर १०० रुपयांपर्यंत गेले आहेत. देशातील जनतेची लूट सुरु आहे,' असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com