ठाणेकरांसाठी एक प्रेक्षणीय स्थळ धर्माधिकारी उद्यानाचे लोकार्पण

तीन हातनाका ते अॅपलब सर्कल, एल.बी.एस रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा आणि रहेजा गृहसंकुलालगतच्या सेवा रस्त्याच्या डांबरीकरणाच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आला. यामध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले ते महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उद्यानाचा लोकार्पण सोहळा. या उद्यानात सिंगापूरच्या बेबी स्कल्पचरची हुबेहूब प्रतिकृती बसविण्यात आली आहे. तसेच अमेरिकेतील जॉय ऑफ म्युझिक हे स्कल्पचर देखील साकारण्यात आले आहे. अॅम्पीथिएटर, ध्यानधारणा केंद्र, अॅक्युप्रेशर वॉक, तथागत बुध्दांची प्रतिकृती सोबत मनमोहक कारंजे बसविण्यात आली असून उद्यानात येणाऱया नागरिकांसाठी आणि लहान मुलांसाठी बटरफ्लाय सेल्फी पाँईट आदी विविध सोईसुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे उद्यान कशिश पार्कवासियांसाठीच नाही तर सर्व ठाणेकरांसाठी एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून परिचीत होईल असे सांगतानाच पालकमंत्री शिंदे यांनी या प्रेक्षणीय उद्यानाची निर्मिती करणाऱया टीमचे कौतुकही केले.   

 ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून व स्थानिक शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे व वृक्षप्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले-जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून साकारण्यात आलेल्या या उद्यानाचे लोकार्पण प्रसंगी आमदार रविंद्र फाटक, महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती,  विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण, क्रीडा समिती सभापती  प्रियांका पाटील, परिवहन समिती सभापती  विलास जोशी, माजी महापौर संजय मोरे, नगरसेवक राजन किणे, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अध्यक्ष भूषण भोईर, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, उपायुक्त मुख्यालय (उद्यान) विजयकुमार म्हसाळ, वरिष्ठ उद्यान निरीक्षक केदार पाटील आदी उपस्थित होते.  

महाराष्ट्रात या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उद्यानाच्या प्रतिकृतीची कीर्ती पसरेल. तसेच ठाणे महानगरपालिकेचा विकासनिधीचा सुयोग्य वापर कसा करावा, याचे हे उद्यान उत्तम उदाहरण असल्याची पोचपावती ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी दिली.        


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA