Top Post Ad

अखेर अरुणा प्रकल्पाचे काम पुर्णपणे बंद, बुडालेल्या घरांचे पंचनामे करण्याची मागणी

15 वर्षात पहिल्यांदाच अरुणा प्रकल्पाचे काम पुर्णपणे बंद. प्रकल्प ग्रस्तांच्या  एकजुटीचा विजय.
आता पाण्याचा विसर्ग सुरु करुन बुडालेल्या घरांचे पंचनामे करा.
अन्यथा...महालक्ष्मी इन्फ्राप्रोजेक्टस पुणे कार्यालयावर प्राणांतिक उपोषण... 

वैभववाडी
अरुणा प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन कमालीचे यशस्वी झाल्यानंतरही आणि शब्द देवून ही दुसऱ्याच दिवशी प्रकल्पाचे काम चालु ठेवून प्रकल्प ग्रस्तांची थट्टा उडवू पहाणा-या जलसंपदा विभागाच्या अधिका-यांना आणि ठेकेदाराला अरुणा प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक होत चांगलाच दणका दिल्यानंतर गेले दोन दिवसांपासून प्रकल्पाच्या पीचींगचे आणि कालव्याची कामे पुर्ण पणे बंद ठेवण्यात आली आहेत. सुमारे 15 वर्षानंतर प्रकल्पस्थळी कामे बंद असल्याने सामसूम आहे. पाण्याचा विसर्ग बंद,तर काम ही बंद, असा इशारा लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे,  मुंबई अध्यक्ष प्रकाश सावंत,  सेक्रेटरी अजय नागप, खजिनदार विलास कदम यांनी दिलेला आहे.  विकासाला आमचा विरोध नाही. धरण प्रकल्पालाही कुणी विरोध केला नव्हता. परंतु प्रकल्पग्रस्तांच्या असह्यतेचा,अज्ञानाचा फायदा उठवून जलसंपदा, पुनर्वसन ठेकेदार आदी विभागाच्या अधिकार्‍यांनी गावातील दलालांच्या मदतीने आखवणे, नागपवाडी, भोम गावच्या प्रकल्पग्रस्तांवर जो अमानुषपणे अन्याय केलेला आहे याची तक्रारही आपण लवकरच दिल्लीला जावून प्रधान मंत्री सिंचाई योजनेच्या मुख्य अधिका-यांना भेटुन करणार आहेत.असे  संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे व पदाधिका-यांनी सांगितले.

अरुणा प्रकल्पाच्या पाण्याचा विसर्ग गेल्या महिना भरापासून मोठ्या प्रमाणात सुरु ठेवण्यात आला होता.त्यामुळे अरुणा धरणात बुडालेली घरे दिसू लागताच पाण्याचा विसर्ग अचानक पूर्णपणे बंद करण्यात आला होता.मात्र धरणाची विविध कामे चालु होती. या विरोधात   उपोषणकतेँ आक्रमक होत पाणी बंद तर काम बंद असा इशारा देत 15 वर्षानंतर पहिल्यांदा प्रकल्पस्थळी काम बंद करण्यात आल्याने प्रकल्पस्थळ साम सुम आहे. हा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा विजय मानला जात आहे. 

दरम्यान येत्या आठ दिवसात अरुणा प्रकल्पाच्या पाण्याचा विसर्ग सुरु करा. बुडालेल्या घरांचा पंचनामा करा. सर्व पुनर्वसन गावठाणात ठप्प असलेली विविध विकासाची कामे सुरू करा. बेघर प्रकल्पग्रस्तांना थकीत घरभाडे द्या. या व इतर मागण्यांची पूर्तता न केल्यास शिवाजी चौक पुणे येथील महालक्ष्मी इन्फ्राप्रोजेक्टसच्या कार्यालयावरच अरुणा प्रकल्पग्रस्त प्राणांतिक आक्रोश आमरण उपोषणास बसणार आहेत. असा निर्णय लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेने घेतला आहे. 

जिल्हयातील कार्यकारी अभियंता आणि अधिक्षक अभियंता यांनी अरुणा प्रकल्पात केलेल्या पापा मुळे प्रकरण अंगलट येणार हे लक्षात आल्याने त्यांनी बदली करुन पळ काढला आहे. जबाबदार अधिकारी उपलब्ध नसल्याने आम्ही दाद कुणाकडे मागायची महालक्ष्मी इन्फ्राप्रोजेक्टस शिवाय आता पर्याय नसल्याने अरुणा प्रकल्पग्रस्त आता पुणे येथील ठेकेदाराच्या कार्यालयावर थेट आक्रोश आंदोलन, आमरण उपोषण करुन 130 प्रकल्प ग्रस्तांच्या बुडालेल्या घराबद्दल दाद मागणार आहेत. कार्यकारी अभियंता राजन डवरी आणि गावातील बुवा सह तिन दलालांच्या प्रतिकात्मक तिरडीसह आक्रोश आंदोलन करण्यात येणार असल्याचे लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा  संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, सेक्रेटरी अजय नागप,विलास कदम, पांडुरंग जाधव, मुकेश कदम ,जयराम कदम, राजा कांबळे यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com