हे नियम जर मान्य केले नाही तर Whatsapp अकाउंट डिलीट

 

नवी दिल्लीः 
 रिलायन्स जिओ आणि मार्क झुकरबर्ग यांच्या फेसबुकमधील भागीदारीनंतर मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले . फेसबुकशी झालेल्या डील नंतर अंबानींची संपत्ती 4 अब्ज डॉलर्सने वाढून 49.5 अब्ज डॉलर्स (सुमारे 3.77 लाख कोटी रुपये) झाली आहे. मुकेश अंबानीच्या जिओमध्ये फेसबुक 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणूकीनंतर जिओमधील फेसबुकची भागीदारी 9.99% पर्यंत वाढणार आहे. तर Whatsapp ला फेसबुकशी जोडल्या गेले आहे.  फेसबुकनं 2014 मध्ये 19 बिलियन डॉलरमध्ये व्हॉट्सअॅपची खरेदी केली होती. सप्टेंबर 2016 पासून व्हॉट्स अॅपनं आपल्या युजर्सचा डेटा फेसबुकसोबत शेअर करायला सुरूवात केली होती. आता व्हॉट्सअॅपने नवीन प्रायव्हसी पॉलिसीमध्ये फेसबुक आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांसोबत आपल्या युजर्सचा डेटा शेअर करण्याचा स्पष्ट उल्लेख केला होता. यामुळे आता Whatsappवर देखील भविष्यात अंबानींचे वर्चस्व आल्यास आश्चर्य वाटायला नको. त्याची सुरुवात  म्हणजे   Whatsapp चे नवीन नियम आणि अटी. यामुळे युजर्संची डोकेदुखी वाढली असून सर्वत्र भीती सुद्धा पसरली आहे.  Whatsapp कडून बुधवारी युजर्संना पॉप अप मेसेज पाठवले आहे. यात युजर्संना नियम व अटी सोबत नवीन प्रायव्हसी संबधी सांगितले आहे. नवीन नियम ८ फेब्रुवारी पासून लागू होणार आहेत. मेसेज मध्ये सांगितले की, Whatsapp कशा पद्धतीने तुमचा डेटा युज करणार आहे. Whatsapp च्या वापराकरिता या नियम व अटी मान्य करावे लागणार आहे. यामध्ये अगदी तुमचे अकाऊंटची माहिती देखील घेतली जाणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. हे नियम जर मान्य केले नाही तर अकाउंट डिलीट केले जाईल. 

या सर्व प्रकारामुळे आता Whatsapp वापरावे की नाही या चिंतेत सर्वजण आहेत. परिणामी अनेकजण सिग्नल आणि टेलिग्राम सारख्या मेसेजिंग अॅप्सकडे जाण्यासाठी तयार होत आहेत. सध्या सिग्नल मेसेंजरला जगभरात पसंती मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत युजर्संची संघ्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सिग्नल मेसेंजर  वर व्हेरीफिकेशन कोड उशिराने येत आहे. या अॅपने युजर्संला जोडण्यासाठी एक गाइडलाइन जारी केली आहे.  टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत बिझनेसमॅन अॅलन मस्क यांनी गुरुवारी नवीन युजर्सला सिग्नल जोडण्याचे आवाहन केले आहे. सिग्नल पर्सनल डेटा मागत नाही, केवळ तुमचा फोन नंबर स्टोर करतो. सिग्नलने डिसेंबर २०२० मध्ये आपले लेटेस्ट व्हर्जन सोबत एक ग्रुप कॉल लाँच केले आहे. सिग्नल पर्सनल डेटा म्हणून केवळ तुमचा फोन नंबर स्टोर करतो. तर टेलिग्राम तुमचे पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणून कॉन्टॅक्ट इन्फो, कॉन्टॅक्ट्स आणि युजर आयडी मागतो.   गुरुवारी सिग्नलने ट्विट करून अनेक प्रोव्हाइडर्स कडे व्हेरिफिकेशन कोड लेट आले. कारण, नवीन लोक मेसेजिंग अॅप प्लॅटफॉर्मवर जोडण्याचा प्रयत्न करीत होते. कंपीने एक गाइडलाइन सुद्धा शेयर केली आहे. सिग्नलने गाइडलाइन मध्ये अन्य मेसेंजर अॅप संबंधी व्हॉटसअॅपचे नाव घेतले नाही.

असे सिग्नल जॉइन करू शकता
सिग्नलवर सर्वात आधी एक ग्रुप बनवा
ग्रुप सेटिंग्सवर जा आणि ग्रुप लिंकवर टॅप करा.
ग्रुप लिंक क्रिएटसाठी टॉगल ऑन करा आणि शेयरवर टॅप करा.
यानंतर तुमच्या पंसतीच्या जुन्या मेसेंजर अॅपवर शेयर करा.

ग्रुप बनल्यानंतर हे करा
जे लोक या ग्रुपला जोडू इच्छितात ते लिंक शेयर करू शकतात.
ग्रुपमध्ये नवीन मेंबर्सला अप्रूव्ह करण्यासाठी टॉगल ऑन-ऑफ करा. शेयर लिंक द्वारे नवीन मेंबर्सला यात रिक्वेस्ट येईल.
नवीन मेंबर्सला अॅड करण्याआधी तुम्हाला ग्रुप अॅडमिनकडून अप्रूव्हल घ्यावे लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या