सर्व माध्यमांच्या शाळा तसंच आश्रमशाळा येत्या २७ जानेवारी पासून सुरू

ठाणे
Covid-19 च्या लॉकडाउननंतर तब्बल 10 महिन्यांनी शाळा सुरू होणार आहेत.  सुरुवातीला राज्य सरकारच्या आदेशानुसार, ठाणे जिल्ह्यातील  सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळा विद्यार्थ्यांसाठी 16 जानेवारीपर्यंत बंद होत्या. नंतरही शाळा बंदी वाढवण्यात आली. पण आता ठाणे  जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील शाळा लवकरच सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.  सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळा तसंच आश्रमशाळा येत्या 27  जानेवारी  पासून सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. ठाणे, कल्याण, डोंबिवली अशा जिल्ह्यातल्या शहरी भागातल्या शाळांसाठी हा निर्णय आणि आदेश लागू नाही. 

 केवळ ग्रामीण भागातल्या शाळांसाठी 27 जानेवारीपासून वर्ग सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरी भागांतील सर्व शाळांबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल, असं सांगण्यात आलं. राज्य सरकार ज्या गाइडलाइन्स देईल त्याप्रमाणे शहरातल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय़ घेण्यात येईल, असं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं. अंबरनाथ व कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रातील शाळांबाबत वेगळे निर्देश देण्यात येतील. शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशांचे पालन करणे संबंधित शाळा प्रशासनावर बंधनकारक असेल असंही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.
नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत काही जिल्ह्यांनी शाळा सुरू करण्याचे आदेश दिले होते. पण दरम्यान नव्या कोरोनाव्हायरसच्या केसेस समोर आल्याने पुन्हा आदेश मागे घेत शाळा बंद करण्यात आल्या.  मुंबईत उपनगरी रेल्वे वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे शहरातल्या शाळाही इतक्यात सुरू व्हायची शक्यता नाही.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या