ठाण्यातील पत्रकारांची पात्रता निश्चित करण्याचा अधिकार एका खाजगी संस्थेलाठाणे
ठाणे महानगर पालिकेच्या पत्रकारांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक पत्रकारांनी आपआपले अर्ज दाखल केले होते. संपुर्ण भारतभर कार्यरत असलेल्या एका संस्थेने आपल्या ठाण्यातील युनिटच्या सद्स्यांकरिता  देखील या योजनांचा लाभ व्हावा यासाठी अर्ज केला होता. मात्र या अर्जाला उत्तर देतांना ठाणे महापालिकेने   ठाण्यातील काही मूठभर पत्रकारांसाठी असलेल्या ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने पत्रकारांची पात्रता निश्चित केल्यासच या योजनांचा लाभ घेता येईल असे कळवले आहे. त्यामुळे  मागील अनेक वर्षापासून ठाण्यात पत्रकारिता करणारे अगदी स्वतच्या वर्तमानपत्राचे संपादकपद भूषवणारे पत्रकार हे पत्रकारीतेच्या निकषात बसत नाहीत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  

ठाणे महानगर पालिकेच्या दैनंदिन डायरीमध्ये पत्रकारांचा आपल्या वर्तमानपत्रासह उल्लेख आहे. हा उल्लेख ठामपा कोणत्या आधारावर करते. जर कोणालाही पत्रकार म्हणून नमूद करून दैनंदिनीमध्ये नोंद होत असेल तर याचीही चौकशी व्हायला हवी.  स्थानिक मुठभर पत्रकारांच्या संघटनेचे सभासद असणारे पत्रकारच खरे पत्रकार असल्याचे शिक्कामोर्तब ठाणे महानगर पालिकेने केले आहे. केवळ त्यांच्या शिफारशी असतील तरच ठाणे महानगर पालिकेच्या योजनांचा तुम्हाला लाभ होईल अन्यथा तुम्ही बोगस पत्रकार म्हणून तुम्हाला कोणताही लाभ होणार नाही असे पालिकेने जाहिर केले आहे.  ठामपाच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर या संघटनेची शिफारस घ्या म्हणजे आम्हाला कळेल की तुम्ही पत्रकार आहात असा याचा अर्थ होत असल्याने ठाण्यातील अनेक पत्रकारांना आजपर्यंत पालिकेच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळालेला नाही आणि भविष्यातही मिळणार नाही.मागील 10-15 वर्षापासून पत्रकारिता करीत असलेले, स्वतचे दैनिक, साप्ताहिक चालवत असलेले पत्रकारांना या योजनांचा लाभ न देता मागील वर्षभरापासून  या संस्थेचे सदस्य बनलेल्या नवशिख्या पत्रकारांना देखील संस्थेने शिफारस दिल्याची म]िहती मिळत आहे.

ठाणे महानगर पालिकेच्या वतीने दरवर्षी प्रकाशित होत असलेल्या दैनंदिनीमध्ये नोंद असलेल्या सर्व पत्रकार बोगस आहेत का? शासनाच्या महापालिकांच्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी एका स्थानिक संस्थेची शिफारस घेणे हे कोणत्या कायद्यात बसते? असा प्रश्न ठाण्यातील अनेक पत्रकार संघटनांनी उपस्थित केला आहे. 

 ठाणे महानगर पालिकेच्या दैनंदिन डायरीमध्ये देखील या पत्रकारांचा आपल्या वर्तमानपत्रासह उल्लेख असतानाही ठामपाने पत्रकारांची पात्रता निश्चित करणेसाठी  ठाणे दैनिक शहर पत्रकार संघाची शिफारस अत्यावश्यक ठरणार असून,  या धोरणात्मक निर्णयास 13 ऑक्टोबर 2017 रोजी सर्वसाधारण सभेद्वारे मान्यता देण्यात आली आहे. तसेच सदर धोरण मान्य झाल्यास पत्राकारांच्या पात्रतेबाबत माहिती व जनसंपर्क अधिकारी यांचेकडून स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्यात यावा असे ही सर्वसाधारण सभा ठरवित असल्याचा उल्लेखही या ठरावात करण्यात आलेला आहे. मात्र या ठरावाबाबत ठाण्यातील कोणत्याही जुन्या संघटनेला विचारात घेतलेले नाही. ठाण्यातील सर्वात जुनी पत्रकार संघटना `ठाणे जिल्हा पत्रकार संघ' असतानाही या संघटनेला कोणत्याही प्रकारची विचारणा करण्यात आलेली नाही. लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारचे ठराव करताना ठाण्यातील विविध संघटनांशी याबाबत विचारणा करण्याचा कोणताही प्रयत्न न करता आपल्या पठडीतल्या पत्रकारांना लाभ मिळवून देण्याकरिता हा ठराव परस्पर मंजूर करून घेतल्याची चर्चा आता ठाण्यातील पत्रकारांच्या संस्था आणि संघटना करीत आहेत.  या ठरावामध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, कार्यालयीन अहवाल पाहता, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दैनिक परकार संघ ही ठाणे शहरातील पत्राकारांची संघटना असून, सदर संघटनेत स्थानिक व राज्यस्तरीय दैनिक वाहिन्यांचे संपादक, प्रतिनिधी यांचा समावेश आहे.   मात्र या संघटनेत काही मुठभर पत्रकारांचाच समावेश आहे.  ठाण्यात या आधीही पत्रकारांच्या संघटना कार्यरत आहेत. मात्र त्या सर्वांना डावलून या संघटनेला ठाण्यातील पत्रकारांची पात्रता निश्चित करण्याचे अधिकार विद्यमान नगरसेवकांनी कसे काय  दिले. हा ठराव करण्यासाठी कोणता पत्रकार आणि अधिकारी प्रयत्नशील होता याबाबत ठाण्यातील पत्रकार संघटनांमध्ये चर्चा सुरु आहे.

--------------------------------------

ठाणे मनपा माहिती कनिष्ठ अधिकारी व तथाकथित पत्रकार संघटना व त्यांच्या स्वयंम घोषित नेत्यांशी संगनमत / ठामपा आयुक्त याच्या धोरणांना हडताल.

 ठाणे मनपा आयुक्तांनी सर्व पत्रकार मंडळी करिता सहानुभूती पूर्वक विचार करून सरसकट सर्व पत्रकाराना अधिकृत निवारा,घर मिळावे म्हणून तथाकथित फक्त नोंदणीकृत असलेल्या व प्रेस क्लब करिता आरक्षित भूखंड मिळण्याची पत्रकार संघटना ची मागणी फेटाळत सरसकट सर्व अधिकृत पत्रकारांसाठी,योजनेत बाधित होणारे व मनपा अधिकारी / कर्मचारी यांच्या करिता प्रस्ताव मंजूर केला पण नंतर कनिष्ठ अधिकारी व पत्रकार स्वयंम घोषित नेते यांच्या संगनमताने आयुक्तांना गाफील ठेऊन फेरफार आपल्या सोई नुसार करण्यात आले.गोषवारात व प्रस्तावा त शिफारस उल्लेख नसतानाही ठरावात मात्र संगनमताने आयुक्तांना गाफील ठेऊन उल्लेख केल्याचे स्पष्ट दिसत आहे व पत्रकार पात्रतेसाठी  pro ने स्वतंत्र प्रस्ताव करण्याचे म्हटले असतानाही  ही तथाकथित फक्त नोंदणीकृत  संघटना व त्याच्या पगारी, आता पत्रकार आहेत की नाही ज्यांच्यावर पोलीस गुन्हे दाखल असताना अश्या लोकांच्या शिफारशी ची मागणी कनिष्ठ अधिकारी(प्रभारी)करून पत्रकारांची दिशा भूल करून आपल्या लाडक्या संघटना ची दलाली करीत आयुक्तांच्या बदलीचे वारे वाहताच आयुक्तांच्या निर्णयास केराची टोपली दाखवत आहे.पत्रकारांना घरं देणे किंवा न देणें हे कागतपत्र यांच्या पडताळणी करून सर्वस्वी ठामपा आयुक्त यांचे अधिकार असतांना कनिष्ठ अधिकारी व पत्रकार नेते यांचा शासकीय काय संबंध असा सवाल निर्माण झाला आहे यांना निर्णय घेण्याचे अधिकार कोणी दिलेत? उलट याची तपासणी झाली पाहिजे.विशेष म्हणजे ठाणे जिल्हा माहिती अधिकारी पत्रकाराच्या माहिती मिळणे बाबतचे अधिकृत ठिकाण पण ठाणे मनपा ठराविक पत्रकार फक्त नोंदणीकृत संघटना ना व त्यांच्या पगारी वृत्तपत्र प्रतिनिधी ना विचारून पत्रकार कोण आहे ते कसे ठरवते.या संघटना रुपी गटाने शेकडो घरं लाट लित  त्यात गरज वन्त सोडा ज्यांच्याकडे करोडो रुपयाच्या मालमत्ता आहेत व एकाच घरात अनेक घरं देण्यात आल्याचे म्हटले जाते.वास्तविक पाहता ठाणे जिल्हा माहिती अधिकारी, पोलीस आयुक्त माहिती अधिकारी, जिल्हा परिषद माहिती अधिकारी व ठाणे मनपा माहिती अधिकारी वेळोवेळी बातम्या, प्रसे नोट, पत्रकार परिषद, या बाबत कळविते तसच सर्व पत्रकार मंडळी चे कार्यलय ही ठाण्यात आहेत मग ठाणे मनपात पत्रकार कक्ष हवाय कश्याला व त्यावरील कोट्यवधी रुपयांचा खर्च इतर लोक उपयोगी कामांसाठी वापरावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.हे पत्रकार कक्ष जणू विकत घेतल्या चा रुबाब तथाकथित संघटना व त्यांचे पगारी प्रतिनिधी दाखवत असतांना दिसतात. तरी सन्मानीय ठाणे मनपा आयुक्त यांनी सदर प्रकरण गांभीर्याने घेऊन आयुक्तांचा अपमान करणाऱ्या त्या कनिष्ठ माहिती अधीकारी (प्रभार)हिच्यावर कारवाई करून हजारो अधिकृत पत्रकारांना न्याय द्यावा. अन्यथा या विरोधात मोठं आंदोलन व न्यायालयिन प्रक्रिया करण्यात येईल अशी शक्यता नाकारता येत नाही आहे. - 

विलास शंभरकर (संपादक: साप्ताहिक वृत्तसंग्राम) M- 8828528996


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA