कापूरबावडी माजीवडा परिसरातही रस्ते सुरक्षा जनजागृती अभियानानिमित्त कार्यक्रम

 ठाणे 

 दर वर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यात रस्ते सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात येत असून 'सडक सुरक्षा जीवन रक्षा’ उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कापूरबावडी माजीवडा ब्रिजच्या जवळ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कापूरबावडी वाहतूक उपविभाग ठाणे शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश लांभाते यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी रस्ता सुरक्षिततेबाबतचे नियम आणि ते न पाळल्यास होणारे परिणाम याचे प्रात्यक्षिकासह महत्व पटवून देण्यात आले. 
 रोड सेफ्टी ई- गुरुकुल उपक्रमाद्वारे डिजिटल पातळीवरून प्रशिक्षण

दरम्यान ठाणे वाहतूक पोलीस आणि  होंडा मोटरसायकल यांच्या संयुक्त विद्यमाने व समाज आणि रस्त्यावरील प्रत्येकाला सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे रोड सेफ्टी ई- गुरुकुल या अनोख्या उपक्रमाद्वारे डिजिटल पातळीवरून तसेच ऑफलाइन प्रशिक्षणाद्वारे देत असलेल्या प्रशिक्षणाला चालना मिळणार आहे अशी माहिती होंडा मोटरसायकल अँड स्कूटर ब्रँड आणि कम्युनिकेशन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रभू नागराज यांनी दिली.   ठाणे शहरात या उपक्रमात ५ हजार ७०० पेक्षा जास्त लहान मुले व प्रौढांना घोडबंदर रस्त्यावरील लहान मुलांसाठीच्या ट्रॅफिक प्रशिक्षण पार्क्समधे आपल्या नियमित उपक्रमांद्वारे प्रशिक्षित केले आहे. कोव्हिड- १९ च्या युगात न्यू नॉर्मल परिस्थितीत मे २०२० पासून ठाण्यातील ९ हजार ५०० नागरिकांना शिक्षित केले आहे. या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा महिन्यात वयोगटांनुसार तयार करण्यात आलेल्या सात ऑनलाइन प्रशिक्षण मोहीम राबवून मोटर वाहन जागरूकता कायदा, पादचारी सुरक्षा जागरूकता आणि सर्व वयोगटांसाठी रस्ता सुरक्षेचे सुवर्ण नियम, रस्ता अभियांत्रिकी आणि वाहनांची आरोग्य तपासणी आणि प्रौढांसाठी कागदपत्रे व बस चालक आणि कंडक्टर्ससाठी स्कूल बस कम्युनिकेश  माध्यमातून रस्त्यावर सुरक्षित कसे राहायचे याविषयी जागरूकतेचा प्रसार केला जाणार आहे. ही चौफेर जागरूकता मोहीम सर्व वयोगटांना रस्त्यावर पाळायचे नियम शिकवणार आहे. शिकाऊ परवाना अर्जधारक आणि ट्रॅफिकचे नियम मोडणारे ट्रॅफिकचे नियम तसेच रस्त्यावरील शिस्त क्लासरूम प्रशिक्षण सत्रांद्वारे सहा शहरांत कार्यरत असलेल्या होंडाच्या सुरक्षित वाहन चालक प्रशिक्षण माध्यमातून दिले जाईल. डिजिटल पातळीवरून विविध सरकारी संघटना, शाळा, महाविद्यालये आणि कॉर्पोरेट्सच्या सहकार्याने पूर्ण होणार आहे.  याबाबत नागराज यांनी माहिती देताना सांगितलें की. याला होंडाच्या ६ हजार ३०० पेक्षा जास्त विक्री आणि सेवा केंद्रांची जोड मिळणआर असून ते  १००० पेक्षा जास्त शहरे व गावांतील दुचाकी ग्राहकांना शिक्षित करतील. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad