Top Post Ad

राजकीय आरक्षणाचा पांगूळगाडा संपला पाहिजे का ?

 डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम करून ,राजकीय क्षेत्रात आपला सहभाग वाढावा म्हणून आरक्षणाच्या माध्यमातून व्यवस्थेने पिळलेल्या ,परंपरेने नागवलेल्या ,वर्णव्यवस्थेने तुडविलेल्या ,व्यवस्थेने नाकारलेल्या ,रंजल्या ,गांजलेल्या समाजाला सत्तेपर्यत पोहचल्याशिवाय  ,त्यांचा विकास होणार नाही ? म्हणून बाबासाहेबांनी राजकीय आरक्षणाची तरतूद संविधानाच्या मार्फत करुन ठेवली.तळागाळातील ,उपेक्षित ,वंचित या समाजाला राजकीय आरक्षण देताना बाबासाहेबांचा एक दूरदृष्टी हेतू  होता कि,आरक्षणाच्या माध्यमातून सत्तेवर पोहचलेला माणूस समाजाचे मूलभूत प्रश्न मोठ्या तळमळीने सभागृहात मांडेल ,त्यांच्या समस्येविषयी सभागृहात आवाज उठवेल ,आपल्या हिन -दिन समाजासाठी विकासाच्या अनेक योजना मंजूर करून घेईल ,हजारो वर्षापासून दबलेल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी हे राजकीय आरक्षणाचे लाभार्थि काम करतील पण ,समाजावर अन्याय अत्याचाराच्या घटना होणार नाहीत ,राजकीय दबदबा निर्माण होईल पण हे  खेदान म्हणावस वाटतय की हे होताना दिसत ना?    मानवी समाजाच्या सर्व प्रश्नांची ,समस्याची व विकासाची सर्व  कुलपे ही राजकीय चावीने खुलतात. राजकीय आरक्षणातून हे सर्व साध्य होईल,असा हेतू बाबासाहेबांचा होता.

  गावच्या ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेच्या सदस्यापर्यत ,तत्कालीन कट्टर धार्मिक नेत्यांसोबत निकाराचा वैचारिक लढा देऊन ,राजकीय आरक्षणावर एकमत घडवून आणले .त्यासाठी त्यांना किती संघर्ष करावा लागला असेल याची कल्पना जरी केली तर अंगावर काटे येतात ,किती मोठा संघर्ष केला हो बाबासाहेबांनी त्याची जाण यांना नाही. या व्यवस्थेने माणूसपण नाकारले होते, त्या समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून ,   ग्रामीण भागातील ग्रामपंचायत सदस्यापासून ,सरपंच ,जिल्हा /पंचायत समिती ,सदस्य ,सभापती ,अध्यक्ष*शहरी भागात *नगरसेवक ,नगराध्यक्ष,महापौर,आमदार ,खासदार ,मंञी होऊन दिमाखात राज्यकारभार चालवतात.हे फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या संविधानिक तरतुदिच्या सवलतीमुळे ,हे राजकीय आरक्षणाच्या लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी विसरता कामा नये.

दिवंगत रोशन सकपाळ एका गीतात बोलतात,
मतदार केल तुला ,कामदार केल तुला
तरीही साल्या ,बैमान झाला माझ्या बाबासाहेबांना.
तू असा ,कसा माझ्या
माझ्या बाबासाहेबांना............ अशी म्हणण्याची वेळ का आली, त्याच कारण अस ,

     आरक्षणाचा लाभ घेऊन ,सत्तेच्या अनेक खुर्च्या घेऊन ,बाबासाहेबांना अपेक्षित असणारे काम करताना दिसत नाहीत ,निवडणुकीच्या काळात मोठमोठया वल्गना ,घोषणा ,आणाभाका घ्यायच्या ,बाबासाहेब बेंबिच्या देठापासुन सांगायचे अन्,सत्तेवर येताच आपला ,कुटुंबाचा अन् आपला आका काय यांचाच विकास कसा होईल ,हे काम ईमान इतबारे करायच
वा रे प्रतिनिधी
मोठमोठया सत्तेची पद घ्यायची ,प्रशासन ,प्रतिष्ठित लोकांसोबत संबंध आल्यामुळे आपण इतरांपेक्षा मोठे आहोत ही भावना तयार होते. पण या पदावर संधी प्राप्त झाली ती आरक्षणाच्या जीवावर ,दिन दुबळ्या समाज्याच्या जीवावर हे जाणीवपूर्वक विसरतात.जो समाज आपल्याकडे अपेक्षेने पहात आहे त्यांचे काम न करता ,ज्यांनी आम्हाला वंचित ठेवल,आम्हाला तुडवण्यातच धन्यता मानणाऱ्या प्रस्थापित पक्षात घरगडी म्हणून वावरण्यातच धन्यता वाटते ,अशा स्वाभिमान नसलेल्या राजकीय लाभार्थ्यांच करायच काय .?  विविध प्रकारच्या दलित सुधारणेच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत.समाजावर अन्याय ,अत्याचाराचा पाढा चालूच आहे. आमचे अनेक निधी दुसरीकडे वळवण्यात येत आहे,अनेक क्षेञाच खाजगीकरण,कोरोनाच्या या काळात समाज मेटाकुटिला आलेला आहे ,नोकऱ्या नाही ',उद्योगधंदे बंद जगण कठिण झालेल आहे .संविधानीक अधिकाराची पायमल्ली रोजच चालू आहे,संविधानाचे एक-एक कलम बदलण्याचे काम राजरोसपणे चालू आहे'पण,याच्यावर काहीच न बोलता माझ्या पदरात काय पडेल यासाठीच तो धडपडताना दिसतोय.माझ पोठ भरल ना बस्स ,सामाजिक संवेदना बोथट झालेत,

म्हणून वामनदादा कर्डक म्हणतात,
तुझ्या हाती तुप आल तुझ्या हाती साय.
समाजाच ,काय रं गड्या,  समाजाच काय........

हे सर्व गैरआंबेडकरवादि पक्षाकडून निवडून येतात ,ते सामाजिक दृष्ट्या आपल्या समाजाचे नेतृत्व करीत असले तरी  पण काम माञ ,त्यांच्या संबंधित पक्षाच्या आदेशानुसार करतात.आपल्या इछेप्रमाणे निधी ,इतर सर्व निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना नाही.म्हणजेच possession मिळाली power माञ मिळाली नाही.अन् हे नकली प्रतिनिधी ,समाज्याच्या आरक्षित जागेवर निवडून येतात पण काम ,समाजाच न करता आपल्या म्होरक्याला खुष करण्यासाठी आमदारकि,खासदारकिचा उपयोग करतात.स्वातंत्र्याच्या या 73 वर्षानंतर देखील समाजात बाबासाहेबांना अपेक्षित असणार काम होत नसेल तर ,समाजाच्या उथानाच काम होत नसेल तर हे राजकीय आरक्षण काय कामाच??बंद झाल पाहिजे हे राजकीय आरक्षण ,हा बाळासाहेबांचा मुद्दा अगदी योग्य आहे.

मान्यवर कांशीराम साहेब म्हणतात ;hit the hand thats operate the chamacha,चमच्यांचे युग संपवायचे असेल तर ,ज्यांनी चमचा निर्माण केला ,त्याला संपवणारी व्यवस्था आपल्याला तयार करावी लागेल.म्हणून समाज्याच्या उध्दारांसाठी आत्मनिर्भर बनण्यासाठी,जाचा समाजासाठि काहीच उपयोग नाही अशा राजकीय आरक्षणाला बंदच केले पाहिजे.


सतिश आडूरकर MA.DJ.CJ

        युवा उद्योजक.      लेखक /कवी.      कळवा -ठाणे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com