Top Post Ad

... तर मुणगेकर यांच्या घरावर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही - रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद

मुंबई : 
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग बॉडी सदस्यपदी मागील दोन दशकांपासून एड. बाळासाहेब आंबेडकर तसेच रामदास आठवले यांना घ्यावे म्हणून सतत समाजातून मागणी होत होती. मात्र या दोन्ही नावांच्या मागणीला संबंधित गव्हर्निंग बॉडीने सातत्याने केराची टोपली दाखवली आहे.  परंतु काही वर्षांपूर्वी जेव्हा पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग बॉडी मध्ये गट पडले तेव्हा एका गटाने एड. बाळासाहेब आंबेडकर यांना जवळ केले तर दुसर्‍या गटाने रामदास आठवले यांना जवळ केले. अशातच काही सदस्यांनी आनंदराज आंबेडकर यांना गव्हर्निंग बॉडीच्या सदस्यपदी घेऊन संस्थेचे अध्यक्ष म्हणून घोषित केले, तर दुसरीकडे काही सदस्यांनी आठवले यांना गव्हर्निंग बॉडीचे सदस्य करून द पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून घोषित केले. या दोहोंचे चेंज रिपोर्ट मा. धर्मादाय आयुक्त यांच्या कार्यालयात पेंडिंग असताना मा. उच्च न्यायालयाने जैसे थे  परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले.  ह्या आदेशामुळे, ज्या गटाचे अध्यक्ष घोषित होते तो गट आपापल्या महाविद्यालयाचे कामकाज पहात होते.

संस्थेच्या कामकाजात फेरफाराच्या अनेक बाबी मा. धर्मादाय आयुक्त अथवा उच्च न्यायालय यांच्याकडे प्रलंबित असताना काही अतिहुशार व विद्वानांना बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग बॉडी सदस्यपदी व पर्यायाने सोसायटीच्या अध्यक्षपदी जाण्याचे डोहाळे लागले. संस्थेच्या वादामधून महाड पोलीस स्टेशन येथे आयपीसी 307 ची केस असलेले फरार आरोपी एड. अशोक तळवटकर यांना सात वर्षानंतर उपाध्यक्ष पदावरून काढल्याचा राग मनात ठेवून त्यांनी संस्थेमध्ये गटबाजी सुरू केली व संस्थेचे नोकर असलेल्या प्राचार्य व प्राध्यापकांना गव्हर्निंग बॉडी सदस्य करण्याचे आमिष दाखवले.

दिनांक 06 जानेवारी 2021 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, वडाळाचे प्राचार्य, डॉ. सिद्धार्थ कांबळे व सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्सचे प्रभारी प्राचार्य, डॉ. राव यांना अनैतिक मार्गाने पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग बॉडी मेंबर म्हणून घोषित केले, तदनंतर मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, राज्यसभेचे माजी सदस्य, डॉ. भालचंद्र मुणगेकर यांना अनैतिक मार्गाने गव्हर्निंग बॉडीचे सदस्य करून पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून घोषित केले गेले. या सर्व प्रकरणामागे कुणाचे षडयंत्र आहे,  सुमारे २००हून अधिक पोलिसांच्या सुरक्षायंत्रणेत ही अध्यक्षपदाची घोषणा का करण्यात आली. असा सवाल  रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आला आहे.   भालचंद्र मुणगेकर यांच्या पाठीशी कोण आहेत कुठले नेते आहेत तसेच भालचंद्र मुणगेकर यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे. 

याबाबत चौकशी न झाल्यास महाराष्ट्रात तीव्र आंदोलनाची भूमिका घेणार याला जबाबदार सरकार असल्याचे परिषदेने स्पष्ट केले. ही बाब अतिशय हास्यास्पद आहे, दोन अध्यक्षांचा वाद मा. धर्मादाय आयुक्त यांच्या कार्यालयात प्रलंबित असताना, भारताच्या अर्थकारणात मोठं नाव असलेलं डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी या वादामध्ये उडी घेणे म्हणजे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची लक्तरे तोडून  चिंधड्या-चिंधड्या केल्या सारखे आहे.  मुणगेकर यांचे हे कृत्य पीपल्स एज्युकेशन सोसायटीला किती घातक आहे याची कदाचित त्यांना जाणीव नाही किंबहुना ते जाणून-बुजून या वादात उडी घेत असल्याचे भासत आहे.  मुणगेकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची लक्तरे तोडण्याचे प्रयत्न करण्याचे थांबवले नाही तर रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद त्यांच्या मुंबई येथील घरावर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.*

कारण भविष्यात मुणगेकर यांचे हे कृत्य पाहून इतर विद्वानांना सुद्धा पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होण्याचे डोहाळे लागले. तर या संस्थेच्या चिंधड्या चिंधड्या होतील, तेव्हा या प्रकरणाचा कर्ता करविता धनी कोण आहे हे शोधून त्याचा तात्काळ समज द्यावी असे जाहीर आवाहन रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. 

बाबासाहेबांचे शैक्षणिक योगदान म्हणजे अन्य सर्व योगदान मध्ये अनन्य साधारण असे महत्व प्राप्त असलेले योगदान होय. मुंबई मधील सामान्य विद्यार्थ्यांना नोकरी करून शिकता यावं या हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मुंबईमध्ये पहिले सिद्धार्थ महाविद्यालय स्थापन केले.

महाराष्ट्र राज्यातील मुंबईसह सबंध देशभर या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शाखा पसरल्या आहेत.पूर्ण देशभर विविध क्षेत्रांमधील  नामवंत असे अनेक नावं घेता येतील जे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे विद्यार्थी होते,  आहेत. म्हणूनच भारताच्या शैक्षणिक इतिहासामध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटी हा एक मानबिंदू ठरला आहे. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर जशी चळवळीची वाताहत होत आहे, अगदी तशीच बाबासाहेबांच्या शैक्षणिक संस्थेची हळूहळू वाताहत होत असलेले पाहायला मिळत आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com