नशा विरोधी जनजागरण रैलीला ठाणेकर युवकांचा प्रतिसाद

ठाणे 

अंमली पदार्थ, दारू आणि गुटका आदीचे दुष्परिणाम बाबत समाजात जागरूकता करण्याचे उद्देश्याने व्यसनमुक्ती जनजागृति सेवा संस्था, ठाणे नगर पोलिस स्टेशन आणि समता विचार प्रसारक संस्था यांच्या वतीने ७ जानेवारी २०२१ रोजी ठाण्यातील बाजारपेठेतुन जन जागरण रैलीचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे शहरात रैझींग डे सप्ताह २०२१ सुरू असल्याने रैलिमध्ये ठाणे नगर पोलिस स्टेशनचे  सक्रीय सहकार्य लाभले होते.  

दारू, गुटका आणि अंमली पदार्थांचा सेवन केल्याने कैंसर, टीबी, मेंदूचा आजार माणसाचे आरोग्य बिघडवते, कौटुंबिक व सामाजिक समस्या निर्माण होतात. अनेकांची कुटुंबे उध्वस्त होतात. नशा पासून तरूण पिढीला वाचवा. व्यसनमुक्ती..सुखी जीवनाची सुरुवात, दारू छोडो, ज्ञान बढाओ-- परिवर्तन आ जाएगा. अंमली पदार्थांची नशा म्हणजे कुटुम्बियांना मानसिक त्रास,  नशा मुक्त ठाणे -- स्वस्थ ठाणे, नशा मुक्त ठाणे-- सुंदर स्वच्छ ठाणे आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. 

रैलीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व समता विचार प्रसारक संस्थेचे विश्वस्त जगदीश खैरालिया, सामाजिक कार्यकर्ते सतपाल मेहरोल, नरसीभाई झाला, व्यसनमुक्ती जनजागृति सेवा संस्थेचे अध्यक्ष ललित मारोठीया, सचिव संजय धिंगाण, समता विचार प्रसारक संस्थेचे खजिनदार सुनील दिवेकर, सीमा श्रीवास्तव, अंजली चौहान,  नरसीभाई,  बाबुलाल करोतिया, अजयवीर, अजय राठोड,उ आशिष उज्जैनवाल, राजकुमार राठे, प्रवीण खैरालिया, दिलीप चौहान, सुरेश बर्नवाल, हरिलाल राजोरिया,सुब्रतो भट्टाचार्य, भरत मोरे, नरेश मेवाती, राजकुमार चौंटेले आदीं प्रमुख कार्यकर्त्यासह नशा विरोधी  जनजागरण रैलीत मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते.

https://www.prajasattakjanata.page/2021/01/blog-post_95.html

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या