फिल्मसिटी व्यवस्थापनाचा आर्थिक घोटाळा

 मुंबई -
गोरेगाव फिल्मसिटी 1 व 2 क्रमांकाच्या स्टुडिओ मध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची माहिती मिळत आहे.  माहिती अधिकारातून मागविलेल्या माहिती नुसार फिल्मसिटी व्यवस्थापनाकडून फार मोठा आर्थिक घोटाळा होत असल्याचे निदर्शनात आले आहे. कलागार म्हणजेच स्टुडिओ क्रमांक 1 आणि 2 इमारतीचे स्ट्रक्चरचे ऑडिट केले असता,  डी डी कुलकर्णी आणि सरदार पटेल महाविद्यालयाने या दोन्ही स्टुडिओच्या इमारती धोकादायक असून या पाडुन नव्याने बांधण्यात याव्यात असे आदेश दिले होते. मात्र तसे न होता मंडळाद्वारे डागडुगी व दुरुस्ती करून नीला प्रोडक्शनला चालविण्याची परवानगी दिली आहे.  

सदर स्टुडिओमध्ये एसी प्लांट चालविण्यासाठी जागा असूनही दुसरीकडे देण्यात आली आहे. शिवाय सदर इमारती या मोडकळीस आल्याचा रिपोर्ट असूनही बृहन्मुंबई महापालिकेच्या अधिकार्यांनी परवानगी दिली कशी? शिवाय महामंडळाला स्वतला फायदा होत असताना नीला प्रोडक्शनला जागा दिली असतांना निला प्रोडक्शनने ती थर्ड पार्टीला किरायाने कशी काय दिली? 

महामंडळाने नीला स्टुडिओला सुरुवातीचे 6 महिने भाडेही माफ केले, 7 व्या महिन्यानंतर भाडे घेण्याचे काय कारण असावे. यात भरपूर काही आर्थिक घोटाळा झाला असून याबाबत याबाबत अधिकाऱयांशी विचारणा केली असता उत्तर देण्यास टाळाटाळ करीत आहेत. या प्रकाराची तात्काळ चौकशी करण्यात यावी. तसेच दोषी असलेल्या महामंडळाचे संबंधित अधिकारी व बृहन्मुंबई अधिकाऱयांना  निलंबित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते  डॉ. राजन माकणीकर व कॅ. श्रावण गायकवाड यांनी केली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA