Trending

6/recent/ticker-posts

यंदा ६ जूनला साजरी होणार गुढीपाडवा... शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन

मुंबई 
महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन यावर्षीपासून महाविकास आघाडी सरकारतर्फे अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे.   रायगड किल्ल्यावर साजरा होणारा हा शिवराज्याभिषेक दिन  आता  संपूर्ण राज्यभर साजरा केला जाणार आहे.  या  दिवशी ग्रामविकास विभागातर्फे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर गुढी उभारली जाणार असून राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. ग्रामविकास विभागातर्फे या वर्षीपासून छत्रपतींचा राज्याभिषेक दिन हा "स्वराज्य दिन" म्हणून साजरा केला जाणार आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य कारभार करणार्‍या महाविकास आघाडी सरकारने ६ जून हा महाराजांचा राज्याभिषेक दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचं ठरवलं आहे. महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन या वर्षीपासून स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जाणार आहे.  दरवर्षी महाराजांचा राज्यभिषेक दिन उत्साहाने साजरा व्हावा यादृष्टीने ग्रामविकास विभाग हे पाऊल उचलणार आहे. आतापर्यंत शिवराज्याभिषेक दिन रायगडावर साजरा व्हायचा, पण आता हा दिन राज्यभर साजरा केला जाणार आहे. सध्या याबाबतचा अधिकृत निर्णय घेण्यास राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकीची आचारसंहिता आड येत आहे. मात्र ग्रामपंचायत निवडणुकींची आचारसंहिता संपल्यानंतर ग्रामविकास विभाग याबाबतचा अधिकृत निर्णय जारी करणार आहे.

 कुळवाडी भूषण, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले रायगडावर होणारा शिवराज्याभिषेक दिन सोहळा हा संपूर्ण महाराष्ट्रात तारखेनुसार सहा जून रोजी शिवराज्य दिन म्हणून साजरा करण्याचे राज्य शासनाने जाहीर केले. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी किल्ले रायगडावर सहा जून रोजी होणारा शिवराज्याभिषेक दिन हा संपूर्ण महाराष्ट्रात शिवराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला आहे. या दिवशी राज्यातील ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषदा आदी आस्थापनांवर भगव्या झेंड्याची गुढी उभारून महाराष्ट्र गीत गायनानंतर शिवरायांच्या आदेश पत्राचे वाचन केले जाणार आहे. दरम्यान येत्या 15 जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात होणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर या निर्णयाची अधिकृत सरकारी घोषणा जाहीर होणार आहे. 

किल्ले रायगडावर युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखालील अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती दुर्गराज रायगडच्या वतीने सहा जून रोजी शिवराज्याभिषेक दिन किल्ले रायगडावर साजरा केला जातो. मात्र बामणी काव्याने यामध्येही भेद निर्माण करून जन्मदिनाप्रमाणे येथेही वाद निर्माण केला होता. मात्र आता या वादाला पुर्णपणे तिलांजली देण्यात आली आहे.  शिवराज्याभिषेक सोहळ्यावर आता ठाण तोडगा निघाला असल्याची जाहीर भूमिका अनेक संस्थांनी व्यक्त केली. अजुन किती दिवस हा वाद ठेवणार. अखेर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन्ही समित्यांशी एकत्रितपणे चर्चा न करता  सहा जून हा शिवराज्याभिषेक दिन सोहळा अधिकृत असल्याचे जाहीर केले असल्याने अनेक शिवप्रेमींनी याला पाठिंबा दिला आहे.  शिवरायांना रयतेचा राजा मानले जाते. त्यामुळे या राजाचा राज्याभिषेक सोहळ्याबरोबरच महाराजांचा प्रत्येक सोहळा हा तारखेनुसारच करण्यात यावा अशी अनेक शिवप्रेमी संघटनांची मागणी अखेर शासनाने मान्य केल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 


महाराष्ट्र राज्यात , मु.पो. सांबरी, ता.अलिबाग ,जि.रायगड या ठिकाणी भवानी बाई पाटील व हिराबाई पाटील या दोन जुळ्या बहिनी रहात होत्या. इ.स.१६२५/२७ दरम्यान कार्ला संस्थान येथे पोर्तुगीजांचा व्यापार होता तिथे बायकांची विक्री होत आहे. हे जेव्हा जिजामातांच्या लक्षात आलं तेव्हा त्यानी शहाजी महाराजांना ती बातमी सांगितली. जनावराप्रमाणे बायकांची विक्री होणे त्यांना पटलं नाही हे थांबलं पाहिजे असं त्यांना वाटलं .तेव्हा तो व्यापार शहाजी महाराजांसमवेत जाऊन त्यांनी बंद पाडला व तेथे विक्रीसाठी असलेल्या भवानीबाई व हिराबाईला त्या सोबत घेउन आल्या. १९ फेब्रुवारी १६३० ला शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला. शहाजी राजे मोगल सैण्याशी लढाई करत असतांना त्यांना कल्याण पारगण्यात सहा महिने भुमिगत रहाव लागल.( म्हणुनच तो प्रांत शहापुर या नावाने प्रसिद्ध झाला ) शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर पाच वर्षे किल्ला लढविल्यावर किल्ल्यावरील रसद संपत आलि.तेव्हा *माँ साहेब जिजाऊनी निर्णय घेतला व हिराबाईला सोबत (विश्वासात घेउन मोगल सेनापतिला चर्चेत गुंतवल आणि भवानीबाई पाटील बाळ शिवरायांना घेउन साबरी गावी निघून गेल्या.भवानीबाईने शिवराय ५ ते १२ वर्षाचे होईपर्यंत त्याच आई प्रमाणे संगोपन केलं.         इ.स.१६४२ मध्ये तुकाराम महाराज कोकण दौऱ्यावर असतांना त्यांनी जिजाऊ आणि भवानीआईची भेट घडवून आणली.तेव्हा जिजाऊंच्या डोळ्यातुन अश्रु वाहू लागले. आपल्या मुलाचं संगोपन भवानीने उत्तम पध्दतीने केले ते पाहून त्या भावूक झाल्या.आणि भवानीआईला म्हणाल्या "तु माझ्या बाळाला पोटच्या आपत्यांप्रमाणे वाढवलस, मी तुला वचन देते भविष्यात जेव्हा केव्हा माझ्या मुलाचा जयघोष केला जाईल, तेव्हा तेव्हा तुझ्या नावाचा प्रथम उल्लेख केला जाईल". आणि तेव्हा पासुन  जय भवानी ! जय शिवाजी ! हे घोषवाक्य तयार झाले. छत्रपती शिवरायांना कोणत्याही काल्पनिक देविने नव्हे तर आई भवानी पाटीलने व सांबरी गावच्या ग्रामस्थांनी तलवार बाजी व व युद्ध कला शिकवली होती.ब्रिटनची राजधानी लंडनच्या संग्रहालयात जी हिरेजडित मुठ असलेली  भवानी तलवार आहे ती शिवरायांनी इ.स.१६४८ दरम्यान कोकणातील सरदार सावंताच्या शस्त्रास्त्र लिलावात सुमारे ३५० होनला विकत घेतली होती. अशी नोंद राजेंच्या लेखापाल विभागात आहे.

         माधुरी सपकाळे - कल्याण

Post a Comment

0 Comments