Trending

6/recent/ticker-posts

प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

 मुंबई :  

 ईडीच्या कारवाई विरोधात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती , अन्य एका प्रकरणासोबत सरनाईकांचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे तूर्तास कारवाई न करण्याचे निर्देश ईडिला देण्यात आले आहेत. यामुळे  प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. 

मी रिक्षा चालवण्याबरोबर ऑम्लेट पावची गाडीही चालवली, याचा अभिमान आहे.पण गेल्या ३० वर्षात कायद्याचे पालन करून इथवर पोहचलो आहे. राहूल नंदा, अमित चंडेला यांच्याशी मैत्री आहे पण व्यावसायिक संबंध नाहीत. हे कॉर्पोरेट वॉर आहे. दोन्ही फिर्यादीत माझे नाव नाही. महाराष्ट्र, मराठी माणसाच्या विषयी आगपाखड करत असेल तर मी त्याला सोडणार नाही. हीच भूमिका कायम असून याकरता फासावर लटकवले तरी चालेल.सत्ता आहे म्हणून बायका मुलांना त्रास देत असाल तर ते योग्य नसल्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. 

परप्रांतिय असलेल्या मंगलप्रभात लोढा, पराग शहा, सुधाकर शेट्टींच्या संपत्तीची चौकशी केली का ? असा प्रश्न सरनाईक  यांनी उपस्थित केलाय. राजस्थानमधून आलेल्या मंगलप्रभात लोढा यांच्या संपत्तीची चौकशी केली का? भाजप आमदार पराग शहांची ५ हजार कोटींची संपत्ती, सुधाकर शेट्टीची शेकडो कोटींची संपत्ती, बंगालमधून आलेले अर्णब गोस्वामी एका चॅनेलचे मालक आहेत. हिमाचलमधून आलेल्या आणि मोठ्या संपत्तीची मालक असलेल्या कंगनाची चौकशी केली का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

ईडीच्या नोटीस आलेल्या आहेत, त्यांना तसं पत्राद्वारे उत्तरही पाठवलंय. ईडी ज्या ज्या वेळी चौकशीला बोलवेल, तेव्हा तेव्हा मी जाईन असे सरनाईकांनी म्हटलंय. हे युद्ध महाविकास आघाडी विरूध्द भाजपा असे सुरू आहे. काही भाजपा नेत्यांनाही माहिती आहे की, माझा राजकीय बळी दिला जातोय. कुणी कितीही ऑफर दिल्या तरी मी शिवसैनिकच राहीन असे सरनाईक म्हणाले.   

माझी पत्नी आजारी असल्यानं मी ईडीला गेलो नाही, तसं उत्तर ईडीला दिलंय. ते जेव्हा बोलवतील तेव्हा जावू असे विहंग सरनाईक म्हणाले. आम्ही काही चुकीचे केले नाही. तर घाबरण्याची गरज नाही. नियमानुसार व्यवसाय केलाय असे विहंग म्हणाले. 

दरम्यान ईडीकडून तपास केला जात असलेल्या टॉप्स सिक्युरिटी प्रकरणातील तक्रारदार रमेश अय्यर यांच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल दाखल केला आहे. रमेश अय्यर यांच्यावर टॉप्स सिक्युरिटीमध्ये आर्थिक फसवणुकीसंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल केला आहे.  टॉप्स सिक्युरिटीचे मालक राहुल नंदा यांनी रमेश अय्यर यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे. रमेश अय्यर यांनी आर्थिक घोटाळा केला, ज्यामुळे टॉप्स कंपनीला मोठे नुकसान झाल्याचा आरोप मालकाकडून करण्यात आला आहे. रमेश अय्यर ही तीच व्यक्ती आहे ज्यांच्या तक्रारीनंतर प्रताप सरनाईक यांची चौकशी ईडीकडून करण्यात येणार आहे. तसंच याप्रकरणी अमित चांदोळेला अटकही झाली आहे. ईडीकडून या प्रकरणात तपास चालू असतानाच तक्रारदारावरच मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने आता ईडी विरुद्ध मुंबई पोलीस असा सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


Post a Comment

0 Comments