कल्याणच्या घरकामगार महिलांनी केला जागतिक मानवी हक्क दिन साजरा

कल्याणच्या घर कामगार कष्टकरी महिला यांनी कल्याणच्या विद्युत हॉल येथे केला जागतिक मानवी हक्क दिंन साजरा केला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

करोना महामारी संकटात घरकामगार महिलांनी जीवन मृत्यूशी झुंज देऊन जगण्याची लढाई यशस्वी पने जिंकली. आपल्या घरातील वस्तू सोने काही सामान विकून कुटुंब जगवले एव्हढेच नाही तर आपल्या साथीदार असलेल्या महिलांना मदतही केली. याच जिगरबाज महिलांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वतःला पोलिसानंकडे बिंधास अटक ही करून घेतली. आणि सुटका झाल्यावर पोलीस स्टेशन बाहेर घोषणाही दिल्या. पत्रकार बाबा रामटेके यांनी महिलांना काही प्रश्न विचारले त्यात करोना काळात लोकांनी मदत केली देव कुलूप बंद होते. तर तुम्ही देवाला मानता का? त्यांनी हो म्हटले. गरीबी कष्ट असले तरी देव ही अंधश्रध्देची पारंपरिक ब्राम्हणी संकल्पना त्यांच्या डोक्यातून जात नाही हे संघटना चलवणार्यांच अपयश आहे.

एनजीओ संघटना चालवणारे यांनी सत्य सांगून अंधश्रद्धा निर्मूलन केले पाहिजे. रोजगाराच्या बरोबर याची गरज आहे. करोना लॉक डाऊन काळात तुमच्या नवऱ्याची दारू सुटली का? दारू या काळात बंद होती...महिलांनी नाही सांगितले. ब्लॅक नी दारू मिळत होती असे म्हणाले.

या घरकामगार महिलांना सोळा सतरा वक्त्यांनी भाषणे देऊन त्यांच्या मानसिक कष्टात भर घातली. या वेळी संकल्पना करडे, रंजना आठवले, मा.महापौर वैजयंती घोलप, रश्मी जुवेकर मधू विर्मुळे, आत्माराम विशे, घनश्याम गायकवाड, विशाल जाधव, किरण सोनवणे, रवी भिलाने, संजय शिंदे, आणि ज्ञानेश पाटील बाबा रामटेके यांनी आपले विचार मांडले.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या