राज्यात अत्याधुनिक ड्रोनद्वारे गावठाण भूमापन कार्यक्रमास सुरुवात.

   नागरिकांच्या  मिळकतीची अचूक माहिती  उपलब्ध होणार - एस .चोक्कलिंगम

 ठाणे 
अत्याधुनिक ड्रोन मोजणी तंत्रज्ञानाचा उपयोग करुन महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीचे गावांचे गावठाणातील सर्व मिळकत धारकांचे मिळकतींचे , मोजमाप व नकाशा तसेच आखीव पत्रिका तयार करण्यात येणार आहे. या मोजमापा मुळे नागरिकांच्या मिळकतीची अचूक माहिती त्यांना उपलब्ध होणार आहे. ग्राम विकास विभाग , जमाबंदी आयुक्तालय व सर्वे ऑफ इंडिया , डेहराडून यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यात अत्याधुनिक ड्रोनद्वारे गावठाण भूमापन कार्यक्रमास सुरुवात झाली असल्याचे जमाबंदी आयुक्त तथा राज्याचे भूमि अभिलेख संचालक  एस .चोक्कलिंगम यांनी सागितले. गावठाण जमाबंदी   गावठाण भूमापन प्रशिक्षण नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे  येथे आयोजित केले होते त्यावेळी अधिकारी व कर्मचारी यांना  मार्गदर्शन करताना   एस .चोक्कलिंगम बोलत होते.    

यावेळी  प्रमुख उपस्थिती पालघरचे जिल्हाधिकारी डॉ.माणिक  गुरसळ, पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद सिध्दराम सालिमठ,ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद डॉ. भाऊसाहेब दांगडे,  ठाणेअप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे, भुमि अभिलेख संलग्न जमाबंदी आयुक्त(ना.भू) बाळासाहेब काळे, कोकण प्रदेश उपसंचालक भुमि अभिलेख मिंलिद चव्हाण,ठाणे जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख अनिल माने,पालघरचे जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख महेश इंगले, वसई तहसिलदार  उज्वला भगत  आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  

 अत्याधुनिक ड्रोनद्वारे अचुक व जलद गतीने मोजणीचे काम होणार आहे . ड्रोनद्वारे गावठाण भूमापन हा प्रकल्प महत्त्वाकांशी व जनताभिमुख प्रकल्प असुन सदर प्रकल्पाची वैशिष्टे व फायदे  पुढील प्रमाणे आहेत गावठाणातील सर्व मालमत्तांचे अत्याधुनिक तंत्रज्ञाना आधारे सर्व्हेक्षण होऊन , गावठाणातील प्रत्येक घराचा नकाशा तयार होणार आहे . धारकांना आपले मिळकतींचे सीमा व नेमके क्षेत्र माहित होणार आहे . गावठाणातील धारकांना आपले मालमत्तेचे अधिकार अभिलेख पुरावा म्हणजेच मालमत्ता पत्रक ( मिळकत पत्रिका ) मिळणार असल्याचे श्री एस .चोक्कलिंगम. यांनी सागितले.                                 

 तसेच मालमत्ता पत्रक ( मिळकत पत्रिका ) म्हणजेच गावठाणातील घर जागेचा मालकी हक्काचा पुरावा असल्याने त्या आधारे कर्ज उपलब्ध होऊ शकेल तसेच तारण म्हणून धारकाला जामीनदार म्हणून राहता येईल विविध आवास योजनेत मंजूरी शक्य करणे सुकर होईल मालमत्तेचे मालकी हक्क संबंधी अभिलेख व नकाशे तयार झालेने आर्थिक पत उंचावेल. गावठाणातील जागेचे मालकी व हद्दी संबंधी वाद / तंटे मिटविणेसाठी गावठाण भूमापन अभिलेख कायदेशीर दृष्टया प्रमाणीत मानले जातात . त्यामुळे वाद / तंटे संपुष्टात येतील . गावठाणातील जमिनीचे खरेदी विक्री व्यवहारामध्ये होणारी फसवणूक टाळता येईल. गावठाणातील सार्वजनिक जागा, बखळ जागा, रस्ते, नाले याचे नकाशे व अभिलेख तयार होणार असल्याने सार्वजनिक मालमत्तांचे संरक्षण होणार आहे . तरी गावठाण भूमापन योजना ही अत्यंत महत्वपुर्ण व उपयुक्त योजना आहे . तरी योजना यशस्वी होणेसाठी सर्व ग्रामस्थानी आपले मिळकतीचे सिमांकन वेळेवर करुन घ्यावे व ग्रामविकास ,भूमि अभिलेख अधिकारी किंवा कर्मचारी यांना योजनेचच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करावे असे आवाहन श्री एस .चोक्कलिंगम यांनी केले.  प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन प्रदीप जगताप यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA