ठाणे
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर २० नोव्हेंबर रोजी मंत्री. विजय वडट्टीवार यांच्या नेतृत्वाखालील ओ.बी.सी. शिष्टमंडळास चर्चेला उत्तर देताना महाराष्ट्र राज्याचा २०२० शासन भरती बिंदु नामावली आणि आरक्षणानुसारच केली जाणार आहे. ठाणे महानगरपालिका आस्थापना मध्ये २०१४ ते २०२० पदोन्नतीची चौकशी कायदयाच्या चौकटी मध्ये राहूनच करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे. यानुसारच ठाणे महानगर पालिकेने वृक्षप्राधिकरण विभागामध्ये आकृती बंधानुसार मान्य असलेले आस्थापनेवरील एकुण १७ जागापैकी रिक्त असलेल्या पदावर महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेल्या कर्मचाऱ्याची पदे कायम स्वरुपी भरावी व दिनांक २ डिेसेंबर रोजी ठाणे महानगरपालिका वृक्षप्राधिकरणाच्यावतीने दिलेली अनावश्यक जाहिरात रट्ट करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे उपाध्यक्ष सुरेशदादा पाटीलखेडे तसेच बहुजन प्रतिष्ठानचे सरचिटणीस प्रमोद इंगळे यांनी पत्राद्वारे केली आहे.
ठाणे महानगर पालिकेच्या विद्यमान आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी असे नमूद केले आहे की, वृक्षप्राधिकरण विभागामध्ये गेल्या सन २०१०/२०११ पासुन मोठया प्रमाणात आस्थापना आणि आर्थिक गैरकारभार राजरोसपणे सुरु आहे. महाराष्ट्र शासनाने वक्षप्राधिकरण आस्थापनावर रिक्त असलेल्या एकुण १७ जागा पदाच सप्टेंबर २०१९ मध्ये मंजुरी दिलेली आहे. उद्यान तपासनीस बिंदु नामावली (आकृतीबंध) नुसार एकुण १४ पदाची भर्ती होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यापैकी ठाणे महानगरपालिकेने फक्त ३ पदाची भरती केलेली आहे. उद्यान निरीक्षकाची एकुण पदे ७ असुन त्यातील फक्त एकच जागा भरलेली आहे. त्यातील ६ जागा भरणे गरजेचे आहे. परंतु आपल्या कार्यालयाने वृत्तपत्रात जाहिरात देऊन कंत्राटी पध्दतीने १ जागा भरण्यासाठी १२ डिसेंबर २०२० पर्यंत निविदा मागीतल्या. परतु ठाणे महानगरपालिकेला शासनाची मजुरी असताना सजा कंत्राटी पध्दतीची मागणी करणे अत्यंत चुकीचे आहे.
तरी नियुक्तीचे प्रकार करण्यासाठी जाहिरात देऊन मुलाखतीद्वारे वेतनश्रेणी ठरवून उमेदवाराची भरती करणे, दुसरे ठोक पगार द्वारे थेट उमेदवाराची कत्राटी कामगार म्हणून भरती करणे, तिसरे ठेकेदारा कड़न मागणी करणे अशा बाबी ठाणे महानगर पालिका आस्थापनाकडून होत आहेत. शासनाची मंजुरी असताना तसेच लाखो सुशिक्षित नोकरीच्या प्रतिक्षेत असतांना ठेकेदाराकडून भरती करण्याचे गौडबंगाल काय आहे? उद्यान विभागामध्ये भरती केलेले उच्चशिक्षित अधिकारी/कर्मचारी आज रोजी ठाणे महानगरपालिकेच्या इतर विभागामध्ये कार्यरत आहेत? तसेच आस्थापना विभागातसुध्दा भ्रष्ट्राचाराचा अड्डा झालेला आहे . उद्यान विभाग ठेकेदारासाठीच काम करित असल्याचा ही निविदा एक प्रकारचा पुरावा सिध्द करीत आहे. तेव्हा आपण याप्रकारात तात्काळ लक्ष देऊन दिलेली जाहिरात मागे घ्यावी. तसेच मंजुर पदाची जाहिरात देऊन मलाखत परिक्षा घेऊन वेतन श्रेणी ठरवुन नियमाप्रमाणे भरती करावी. अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या