इतके दिवस बौद्धांच्या धार्मिक स्थळाबाबत मी फक्त ऐकून होते. की आपल्या आस्थेच्या ठिकाणी बामणांनी ठरवून अतिक्रमण केले आहे मात्र मी सध्या धम्म टूरवर असल्याने या सर्व गोष्टी "याची देही याची डोळा" पाहून मन प्रचंड दुःखी झाले. या बाबतीत मी पाहिलेली काही उदाहरणे आपल्या सोबत शेअर करु इच्छिते आहे.
१) सारनाथ येथील मुख्य विहारात फक्त विदेशी पर्यटकांना तथागतांच्या मुर्तीजवळ सोडणे भारतीय लोकांना जाणीवपूर्वक दूर ठेवणे तसेच या ठिकाणी विदेशी पर्यटकांच्या मदती साठी जे गाइड आहेत. ते तद्दन चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती या पर्यटकांना देतात त्याचा परिणाम हे पर्यटक चुकीची माहिती (ब्राम्हण अनुकूल) घेऊन त्यांच्या देशात जातात. हे गाइड RSS चे आहेत हे लगेच जाणवते.
२) तथागतांना ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली त्या बोधगया येथील मुख्य विहारात तथागतांच्या मुर्तीसमोर गाभाऱ्यात शिवलिंग आहे (याची स्थापना कोणीतरी शंकराचार्य याने केल्याचे सांगितले जाते ) विहारात आतमध्ये बामणांचे वर्चस्व पदोपदी जाणवते विहार परिसरात असणारे सर्व गाईड हे RSS चे प्रचारक आहेत. त्या मुळे ते पर्यटकांना विहार स्थळाबाबत माहिती देताना सतत मुस्लिम द्वेष कसा बिंबवला जाईल याची काळजी घेतात. (मुस्लिमांनी विहाराची तोडफोड कशी केली हे रंगवून सांगतात, विहार परिसरात बामणांच्या देव - देवतांच्या मंदिरांची भरमार आहे....😳एका ठिकाणी उंच स्तंभाच्या छतावर पाच रुपयाचे coin फेकून जर ते coin वर थांबले तर तुमची मनोकामना पुर्ण होईल या सारखा तद्दन फालतूपणा करण्यास लोकांना प्रवृत्त केले जाते. पर्यटक वर्दळ वाढायला लागली कि RSS चे बदमाष कार्यकर्ते (जे विहार प्रशासनाच्या नोकरीत आहे, युनिफाॕर्म मध्ये असलेले तो खेळ सुरु करतात ) एकदा गर्दी वाढून पर्यटकांनी सुरुवात केली कि RSS चे बदमाष हळूहळू गायब होतात परंतू तिथे लक्ष ठेवण्यासाठी दोनतीन संघी ठाण मांडून असतात. त्या ठिकाणी काही भंते खरोखर चांगले मार्गदर्शन करतात सदर भंते महाराष्ट्रातील आहे. आणि ते योग्य मार्गदर्शन करतात. असे माझ्या निदर्शनास आले भविष्यात येणाऱ्या पर्यटकांना महत्त्वाची सूचना त्यांनी विहार परीसरात गाईड न घेता भंतेना मार्गदर्शन करण्यास सांगावे. (कदाचित माझ्या या पोस्टनंतर सदर ठिकाणचे गाइड भंतेच्या वेशात पण बसू शकतील म्हणून त्या साठी एक निकष लावायचा जर त्या व्यक्तीने मुस्लीम द्वेष सांगिताला तर तो बोगस आहे हे समजण्यास हरकत नाही.)
३) डुंगेश्वरी डोंगराच्या गुहेत ज्या ठिकाणी तथागतांनी सहा वर्षे कठोर तपस्या केली. त्या गुहेत तथागतांच्या मुर्तीपासून चार फूटांवर दोन काल्पनिक देवी साडी गुंडाळून उभ्या केल्या आहेत. आणि तेथील पंडे (भट) भाविकांना जबरदस्तीने दान टाकायला सांगतात. (एखादा त्यांच्या डोक्यावरचा भेटला कि गप बसतात) सध्या गुहेतल्या देवाला (तथागताला) बोकड सोडण्याची/बळीची नवी परंपरा पंडे पाडत असल्याचे माझ्या निदर्शनास येताच याचा मी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.४ सुजाता महल (मंदिर ) या ठिकाणी तथागताला खीरदान केल्याचा इतिहास आहे. तर येथे वडाच्या झाडा खाली तथागताच्या मुर्तीजवळ सुजाताच्या खीरपात्र असलेल्या मुर्ती शेजारी एक गाय दाखवण्यात आली आहे, या ठिकाणी दान पात्रात जमा होणारे दान घेण्या साठी शुक्ला, तिवारी नावाचे पंडे बसलेले आहेत. या दानाचा उपयोग त्यांचे पोटं भरण्यासाठी होतो. म्हणून सर्व बौध्द धम्माच्या बांधवांना विनंती आहे. की आपण जेव्हा या वरील सर्व ठिकाणी जाल तेव्हा चुकून ही एका रुपयाचे दान टाकू नये ते दान सत्पात्री न जाता कुपात्री जात आहे हे लक्षात घ्यावे .
५ कुशीनगर या ठिकाणी तथागतांच्या पाया जवळ काषाय वस्त्र परिधान केलेला एक भंते लोकांना जबरदस्तीने पैसे टाकायला लावतो याबद्दल मी त्याला जाब विचारुन त्याचे नाव विचारले तर त्याने नाव सांगायला स्पष्ट नकार दिल्यावर मी त्याला म्हटले ..
नाम नही बता रहे मतलब RSS के लिए काम करते हो क्या ❓
या वाक्यावर तो भंते काहीही न बोलता विषय बदलवण्याचा प्रयत्न करत राहिला.
६) लुंबीनी हे तथागतांचे जन्म ठिकाण नेपाळ मध्ये आहे. तुलनात्मक दृष्टीने भारता पेक्षा लहान देश परंतू त्या लोकांनी इतक्या उत्कृष्ट पद्धतीने तथागतांच्या आठवणी जपल्या आहेत कि त्यांना मानाचा मुजरा केल्या शिवाय राहवत नाही.
७) लखनौ या ठिकाणी डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांचे जे भव्य आणि डोळे दिपवणारे स्मारक आहे. त्या कडे या भाजप सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. त्याचा निषेध करावा तितका थोडाच आहे. या ठिकाणी पुतळ्यांच्या खाली त्या बाबत विवरण आहे. मात्र अनेक पुतळ्यां खालील माहिती केमिकल टाकून खोडण्याचा /अस्पष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे.
माझी सर्व बांधवांना विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत ही पोस्ट पाठवून समाजाला जागृत करावे. तसेच वरील पैकी कोठे ही कष्टाचे पैसे दान करुन बामणांना मजबूत करु नका ही नम्र विनंती .
आयुष्मती नंदिनी रविंद्र जाधव मोबा. 9860129149
( माध्यमिक शिक्षिका ) जिल्हा - नासिक
0 टिप्पण्या