ठाणे
माझी वसुंधरा अभियानासाठी ठाणे जिल्हा परिषद क्षेत्रातील 13 ग्रामपंचायतीची निवड करण्यात आलीं आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची व गट विकास अधिकाऱ्यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक केलीं असून हे अधिकारी पालकत्वाच्या नात्याने काम करणार आहेत.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांच्या नियंत्रणाखाली उप मुख्य कार्यकारी अधिकारी( प्रशासन) अजिंक्य पवार यांची वासिंद ग्रामपंचायत , उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राहनाळ ग्रामपंचायत , उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पाणी व स्वच्छता) छायादेवी शिसोदे , शेलार ग्रामपंचायत, जिल्हा कार्यक्रम अधिकारी(महिला व बाल विकास) संतोष भोसले , काटई ग्रामपंचायत, कार्यकारी अभियंता ( बांधकाम) नितीन पालवे,खोणी ग्रामपंचायत, कार्यकारी अभियंता(ग्रामीण पाणी पुरवठा) एच.एल. भस्मे ,आसनगाव ग्रामपंचायत, कृषि विकास अधिकारी श्रीधर काळे, कारीवली ग्रामपंचायत, कल्याण गट विकास अधिकारी श्वेता पालवे , म्हारल ग्रामपंचायत, अंबरनाथ गट विकास अधिकारी शीतल कदम, वांगणी ग्रामपंचायत, भिवंडी गट विकास अधिकारी डॉ.प्रदीप घोरपडे , काल्हेर ग्रामपंचायत, सहायक गट विकास अधिकारी शहापूर सुशांत पाटील, मोखावणे ग्रामपंचायत, सहायक गट विकास अधिकारी भिवंडी अविनाश मोहिते, कोन ग्रामपंचायत, सहायक गट विकास अधिकारी हणमंतराव दोडके , पिंपळघर आदी अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीचे पालकत्व दिले आहे.
या सर्व अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायतीना भेटी देऊन ग्रामपंचायत क्षेत्रातील डम्पिंग ग्राउंड, वृक्ष लागवडीची जागा, क्रीडांगण, उद्यान, तलाव, आदी जागांची पाहणी केली. अभियाना संदर्भात व्यापक जनजागृती होण्याच्या दृष्टीने गावातील लोकप्रतिनिधी यांना मार्गदर्शन करून गावातील नागरिकांचा सहभाग घेण्याच्या दृष्टीने आवाहन केले जात आहे.
---------------------------
डी.एल.एड. प्रवेशासाठी 26 डिसेंबर पर्यंत मुदत वाढ
ठाणे- महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे यांचेमार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेशासाठी दि. 26 डिसेंबर 2020 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज दाखल करावेत. याबाबतच्या सर्व सुचना, प्रवेश पात्रता इत्यादी माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) च्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.ऑनलाईन अर्ज भरल्यानंतरचे फेरीनिहाय सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध असेल, यासाठी संबधितांनी वेळोवेळी संकेतस्थळ पहावे, या नंतर ( D.El.Ed) प्रवेशासाठी कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी असे प्राचार्य,डॉ.भरत दा .पवार जिल्हा शैक्षणिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था रहाटोली जि .ठाणे यांनी कळवले आहे.
---------------------------
विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरीय क्विझ स्पर्धा
ठाणे - महाराष्ट्राचा क्रीडा विभाग विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरीय क्विझ स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे .निरोगी सवयींची चाचणी करणे आणि त्यांचे प्रशिक्षण देणे हे मुख्य उद्दीष्ट आहे. प्रश्नोत्तरी स्पर्धा पोषण, तंदुरुस्ती आणि क्रीडा या विषयावरील प्रश्रांचा समावेश असेल. निरोगी आरोग्याची चाचणी करणे आणि त्यांचे प्रशिक्षण देणे हे मुख्य उद्दीष्ट आहे. या स्पर्धेसाठी वय गट ४ ते ७ वर्ष , ८ ते ११ वर्ष ,१२ ते १७ वर्ष असा आहे. सहभागी होण्यासाटी सर्व शाळा आणि विदयार्थ्यांनी ३० डिसेंबर 2020 पर्यंत नवीन नोंदणी करावी.प्रत्येक वयोगटातील टॉप ५ विदयार्थ्यांना ट्रॉफी व शिफारस पत्र क्रीडा संचालनालय, महाराष्ट्र यांचेकडून मिळेल, प्रत्येक वयोगटातील विजेत्या विदयार्थ्यांना विजयी ट्रॉफी व प्रमाणपत्र क्रीडा संचालनालय, महाराष्ट्र यांचे विशेष कौतुक असलेले प्रमाणपत्र प्राप्त होईल. ठाणे जिल्हयातील जास्तीत जास्त शाळा व विदयार्थ्यांनी सहभागी व्हावे. xpl.news/energize_quiz या संकेत स्थळावर या स्पर्धे विषयी सविस्तर माहिती उपलब्ध आहे.असे ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी,यांनी कळविलेआहे.
0 टिप्पण्या