मराठा आरक्षणासाठी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालू- भोसले

मराठा आरक्षणासाठी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालू- भोसलेसातारा
 वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालू, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितलं आहे. सातारा नगरपालिकेत  आलेले असताना ते मराठा आरक्षणावर बोलले. सुप्रीम कोर्टात 9 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. नोकरी आणि शैक्षणिक आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे राज्यातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.


वेळ आली तर मराठा आरक्षणावर जाहीरपणे बोलेन. मी मराठा म्हणून स्वतःला कधी संबोधले नाही, असे सांगत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर रथीमहारथींना साष्टांग नमस्कार करायला आपण तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत वडीलधाऱ्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाष्य का केलं नाही, असा सवाल देखील खासदार उदयनराजे भोसले यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार  यांना नाव न घेता केला. मराठा आरक्षण हे गुणवत्तेनुसारच मिळायला पाहिजे, या भूमिकेवर आपण अजूनही ठाम असल्याचे सांगितलं उदयनराजेंनी सांगितलं.


दुसरीकडे, मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि सकल मराठा मोर्चाच्या वतीने सरकारविरोधात पंढरपूर ते मुंबई पायी दिंडी निघणार आहे. दिंडी शनिवारी 7 नोव्हेंबर रोजी नामदेव पायरी येथून विठ्ठलाचे दर्शन करुन मुंबईकडे जाणार असल्याचा नियोजित कार्यक्रम आहे. मराठा समाजाचा राजकारणासाठी उपयोग करू नये, असा इशारा सकल मराठा समाजानं सरकार व विरोधीपक्षाला दिला आहे. विठ्ठलाला साकडे घालून ७ नोव्हेंबरला धडक आक्रोश मोर्चा निघणार आहे, अशी माहिती मराठा सकल मोर्चाचे राज्य समन्वयक धनंजय साखळकर व महेश डोंगरे यांनी दिली आहे.


 


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad