बिगबॉस शो तात्काळ बंद करा ब्ल्यू पँथरची मागणी

सरकारने बिगबॉस शो वर कडक कारवाई करावी, अन्यथा सनदशीर मार्गाने लढा देऊ- एस रविराजठाणे
मराठी भाषा आणि अस्मितेचा अवमान करणाऱ्या जान कुमारसानूला केवळ माफीवर सोडू नये. त्याच्यावर आयुष्यभर लक्षात राहील अशी कारवाई करावी, इतकेच नव्हे तर वारंवार चुका करून नंतर माफी मागणाऱ्या या बीग-बॉस शो बाबतही आता कठोर भूमिका घेणे गरजेचे असल्याचे प्रखर मत ब्ल्यू पँथर या सामाजिक संघटनेने व्यक्त केले आहे.  लाईव्ह टॉक शॉ किंव् अन्य लाईव्ह शो मधून मनात येईल ते बोलायचे आणि नंतर चुकल्याचा अविर्भाव व्यक्त करायचा ही आता फॅशन झाली आहे असे मत ब्ल्यू पँथरचे सर्वेसर्व्हा एस रविराज यांनी व्यक्त केले. 


बीग-बॉस या लाईव्ह शो मध्ये घरात काय काय घडत आहे हे दाखवले जाते त्यात मारामारी, हिडस प्रकार, अश्लिलता असे सर्व प्रकार सर्रास पहायला मिळतात. यामुळे कुटुंबावर परिणाम होत आहे. हिंसकता वाढीस लागत आहे. हे शो लाईव्ह असल्यामुळे यावर सेंसॉरचे कुठलेही बंधन नाही. चित्रपटामधून एखादा सीन अधिक हिंसक असला तर त्यावर कात्री लावल्या जाते. अपशब्द वापरले असतील तर तेही काढले जातात. मात्र या लाईव्ह शोमधून सर्रासपणे याचा वापर होता यावर कोणतेही बंधन नाही. त्यामुळे असे लाईव्ह शो तात्काळ बंद करावेत अशी आमची मागणी असल्याचे रविराज यांनी सांगितले. याबद्दल लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.


सरकारने असल्या लाईव्ह शो वर कडक कारवाई करावी, अन्यथा आमच्या संघटनेतर्फे सनदीशीर मार्गाने लढा दिला जाईल.  अविचारी गोष्टींमुळे भारतीय संस्कृती लोप पावत आहे. मराठी भाषा ही आमच्यासाठी केवळ भाषा नसून आमची अस्मिता, आमचा श्वास आहे. त्यामुळे जान सानू सारख्या अपप्रवृत्तींना शिक्षा झालीच पाहिजे. फक्त माफी मागितली म्हणजे झाले असे नाही. जर महाराष्ट्रात राहायचे असेल तर ज्या पद्धतीने आमची संघटना प्रत्येक प्रांत, भाषा आणि व्यक्तीचा यथोचित सन्मान करते, तसाच इतरांनी सुद्धा केला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे जान सानूविरूद्ध कारवाई तर झालीच पाहिजे शिवाय हा शो देखील बंद झाला पाहिजे अशी आमची मागणी असल्याचे संघटनेने म्हटले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA