Top Post Ad

ठाण्यातील हॉटेल व्यवसायिकांनी केला कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध

बेळगाव प्रश्नी ठाण्यातील हॉटेल व्यवसायिकांचा महाराष्ट्र सरकारला पाठिंबा
ना एकनाथ शिंदे यांना दिले पत्र



ठाणे
1 नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळण्याचे आवाहन ना एकनाथ शिंदे यांनी केले होते, त्यांच्या आवाहनाला ठाण्यातील हॉटेल व्यवसायिकांनी पण  समर्थन दिले, बेळगाव सीमाभागात मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकार दडपशाही करत आहे,आज महाराष्ट्रात राज्य सरकार काळा दिन साजरा करत असताना ठाण्यातील हॉटेल व्यवसायिकांनी सुद्धा कर्नाटक सरकारचा निषेध करत ना एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महाराष्ट्र शासनाला पाठींबा असल्याचे पत्र दिले मूळचे कर्नाटक राज्यातील असलेले हे सर्व हॉटेल व्यावसायिक गेले कित्येक वर्षे ठाण्यात वास्तव्यास आहेत, महाराष्ट्र आणि ठाणे आमची कर्मभूमी आहे ,त्यामुळे कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा आम्ही निषेध करत असल्याचे पत्र देत या सर्व हॉटेल चालकांनी काळ्या फिती लावल्या होत्या,,या वेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे,युवा सेना विस्तारक राहुल लोंढे उपस्तिथ होते..ठाणे हॉटेल ओवनर संघटनेचे अध्यक्ष।   उमेश शेट्टी, रत्नाकर शेट्टी, रघुनाथ शेट्टी, प्रशांत शेट्टी यांचे सह अनेक हॉटेल मालक उपस्थित होते


भाषावार प्रांतरचने नुसार १ नोव्हेंबर १९५६ साली  कर्नाटक राज्याची  स्थापना झाली. तत्कालीन केंद्र सरकारने केलेल्या भाषावार प्रांतरचनेत बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी सह मराठी भाषिक बहुल भाग कर्नाटक राज्यात अन्यायकारक पध्दतीने जोडण्यात आला. तेव्हा पासून आजतागायत गेली ६५ वर्ष बेळगाव सह मराठी भाषिक ८६५ गावे महाराष्ट्र राज्यात सामाविष्ट करण्यात यावी, या मागणीसाठी सीमाभागातील मराठी बांधव लढा देत आहेत. याच पार्श्वभूमीवर दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी बेळगाव आणि सीमाभागात "काळा दिवस" पाळण्यात येतो. प्रत्यक्षात "काळा दिवस" हा कर्नाटक सरकार आणि कानडी भाषिकां विरोधात नसून  केंद्र  सरकारच्या अन्यायकारक भाषावार प्रांतरचनेच्या  विरोधात असतो. गेल्या ६५ वर्षापासुन सायकल फेरी आणि पद यात्रेच्या माध्यमातून लोकशाही आणि अहिंसेच्या मार्गाने "काळा दिवस" पाळण्यात येतो. एकीकडे, कोरोनाच्या संकटात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असताना देखील कर्नाटक राज्य सरकार १ नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्य स्थापनेचा राज्योत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याची तयारी करत आहे.  दुसरीकडे कोरोनाच्या प्रादुभावाचे कारण देत, अहिंसक आणि लोकशाही मार्गाने  गेली ६५ वर्षे लढा देण्याऱ्या सीमा भागातील मराठी बांधवांच्या बेळगाव येथील सायकल रॅली  आणि पदयात्रेवर कर्नाटक पोलिसांनी कठोर निर्बंध लादले आहेत. 

बेळगाव आणि सीमाभागात मराठी भाषिक बहुसंख्य असुन सुध्दा त्यांचे भाषिक अधिकार डावलले जातात, मराठी शाळा बंद पाडून त्याठिकाणी कानडी शाळा सुरु करणे, मराठी भाषिकांवर कानडी भाषेत बोलण्याची सक्ती करणे, या विरोधात आंदोलन करण्याऱ्या मराठी युवकांवर राजद्रोह आणि इतर गंभीर गुन्हे दाखल करण्यात येणे, मराठी भाषिकांच्या दुकानावरील मराठी फलकांवर दगड फेक करणे, आदी गोष्टी दडपशाही मार्गाने केल्या जातात. तसेच मराठी चित्रपट बंद पाडले जातात, मराठी साहित्य संमेलनांना परवानगी नाकारुन महाराष्ट्रातुन येण्याऱ्या साहित्यिकांना प्रवेश बंदी केली जाते, आणि साहित्य संमेलनाच्या आयोजकांवर कारवाई केली जाते. यावर कहर म्हणजे  मराठी माणसाची अस्मिता चिरडण्यासाठी काही कानडी संघटनांना पुढे करुन महराष्ट्राचे आराध्य दैवत वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला जातो, असे एक ना अनेक अन्यायकारक प्रकार सीमाभागात सुरुच आहेत. काहीही करुन बेळगाव आणि सीमाभागातून मराठी भाषिकांना हद्दपार करणे हाच कर्नाटक सरकारचा अजेंडा आहे असे निर्दशनास येत आहे. एकुणच  भारतीय संविधानानुसार सर्वसामान्य भारतीयांना मिळणाऱ्या मुलभूत हक्क आणि स्वातंत्र्यापासुन सीमाभागातील मराठी भाषिक बांधवांना वंचित राहावे लागत आहे.


या सर्व पार्श्वभुमीवर, गेली ६५ वर्षे सीमाभागातील जनता १ नोव्हेंबर हा दिवस "काळा दिन" पाळून निषेध नोंदवत आली आहे. सीमाभागातील तमाम मराठी बांधवांच्या पाठीशी राज्यसरकार ठामपणे उभे आहे. यासाठीच महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री सर्वश्री मा.ना.श्री.उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या मंत्रीमंडळातील सर्व कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री येत्या १ नोव्हेंबर रोजी "काळी फित" परिधान करुन सीमाभागातील या लढ्याला आपला पाठिंबा देणार आहेत. सीमाभागातील मराठी बांधवांचा हा लढा पक्ष-पंथ-धर्म-जात-पात विरहित असून फक्त मराठी या मुद्दयावर अविरत आणि अखंडपणे सुरु आहे.तरी, या लढ्याला सर्व पत्रकार बांधवांनी देखील "काळी फित" परिधान करुन सीमाभागातील या लढयाला सर्वांनी जाहिर पाठिंबा दयावा, असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे (सीमाभाग समन्वयक मंत्री) यांनी केेले होते.


बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव व सीमाभागामध्ये 1 नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळण्यात येतो. आता सीमाभागातील नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे पूर्ण मंत्रिमंडळ आज 1 नोव्हेंबर रोजी काळ्या फिती बांधून काम करत आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष , जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आपल्या हाताला काळी फित बांधून कामकाजाला सुरुवात केली आहे. याविषयावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ' कर्नाटकमधील मराठी सीमावासियांवर होणारे अत्याचार, अन्याय, जुलूम याचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आपल्या हाताला काळी फिती बांधून निषेध व्यक्त करत आहे. महाराष्ट्र सरकारमधील सर्व याचा निषेध व्यक्त करत आहे. महाराष्ट्रातील कर्नाटकातील सीमा प्रांतात अडलेल्या लोकांच्या पूर्ण ताकदीने सरकार त्यांच्या मागे उभे आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांना पाठिंबा म्हणून काळी फित बांधत कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा आम्ही निषेध करत आहोत. बेळगाव मधील मराठी भाषिकांचा विजय होईल, याचा आम्हाला विश्वास आहे.'



 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com