कोरोना योद्ध्यांचा सत्कार 
कोरोना योद्ध्यांचा सत्कार 


उरण 

वैभवलक्ष्मी हौसिंग सोसायटी,म्हातवली,विजय  रिसॉर्ट शेजारी,उरण च्या वतीने उरण नगरपालिका सफाई कर्मचारी (स्वछता दूत) यांचा सत्कार करण्यात आला तसेच कोरोना महामारी च्या काळात आपलं कर्तव्य बजावणारे,डॉ संजीवन म्हात्रे,  डॉ रंजना म्हात्रे  ,  पोलीस अधिकारी संतोष मोहिते, उरण नगर पालिका कर्मचारी- नरेंद साळवी यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. कोरोना योद्धांप्रती आदरभाव दाखवत  हा कार्यक्रम  सोसायटी च्या आवारात सोशल डिस्टन्स पाळून घेण्यात आला.तरी सोसायटी एक कुटुंब म्हणून मोठ्या संख्येने महिला पुरुष उपस्थित होते.

 

सदर प्रसंगी प्राध्यापक सुनील जगधनी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सत्काराला उत्तर देताना डॉ संजीव म्हात्रे यांनी कोरोना काळात उरण मेडिकल असोसिएशन ची मदत स्थानिक प्रशासन व इंदिरा गांधी हॉस्पिटल ला कशा प्रकारे लाभली व कोरोना काळात डॉक्टर कशा प्रकारे आपले कर्तव्य बजावत होते हे विशद केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैभवलक्ष्मी सोसायटी चे अध्यक्ष राकेश केळकर हे होते. कार्यक्रमाचे आयोजन  करण्यामागे जे सफाई कामगार  वर्षभर न चुकता कचरा साफ सफाई करण्याकरिता येतात त्या बद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करणे व  कोरोना काळात कार्यरत असलेले  डॉकटर,पोलीस कर्मचारी व नगरपालिका कर्मचारी याचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करणे  हा उद्देश असल्याचे राकेश केळकर यांनी सांगितले.यावेळी सोसायटी मधील मुलांना बालदिनाचे औचित्य साधून खाऊ वाटप करण्यात आले. सदर प्रसंगी खोपटा गावच्या माजी सरपंच भावना म्हात्रे यांचाही सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता वैभवलक्ष्मी सोसायटी चे खजिनदार योगेश धर्णे,उपाध्यक्ष अंकुश वाणी,राहुल झोपे ,स्वप्नील घोणे यांचेही सहकार्य लाभले


 

 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA