Top Post Ad

कोरोना आजारावरील कोवीशिल्ड लसीचे उत्पादन अंतिम टप्प्यात

 

अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोरोना आजारावरील कोवीशिल्ड लसीसे उत्पादन घेणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूट आणि जिनोव्हा बायो फार्मासिटिक्युअल्स कंपनीला आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला. भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने मोदी दुपारी साडेबाराच्या सुमारास लोहगाव येथील विमानतळावर दाखल झाले. तेथून हेलिकॉप्टरने सीरम इन्स्टिटय़ूटला गेले. पुण्यातील मांजरी भागात असलेल्या सीरम इन्स्टिटय़ूट आणि जिनोव्हा बायो फार्मासिटिक्युअल्स कंपनीत कोवीशिल्ड लस तयार केली जात आहे. याबाबत आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री आले होते.  सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांच्यासह शास्त्रज्ञ आणि संशोधकांशी त्यांनी संवाद साधला.

कोविशील्डची निर्मिती करणार्‍या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ची पाहणी केल्यानंतर प्रधानमंत्री म्हणाले- SII टीमसोबत चांगली चर्चा झाली. त्यांनी मला लस बनवण्यासाठी आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी भविष्यातील योजनांबद्दलही सांगितले. मी लस बनवण्याच्या फॅसिलिटीचा आढावा देखील घेतला.

प्रधानमंत्र्यांच्या  व्हॅक्सीन टूरनंतर पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII) चे CEO अदर पूनावाला यांनी व्हॅक्सीनच्या तयारीविषयी माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, आम्ही पुढच्या दोन आठवड्यांमध्ये कोवीशील्डच्या इमरजेंसी वापरासाठी अप्लाय करु. भारतात पाच व्हॅक्सीनवर काम सुरू आहेत. त्यापैकी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) कोवीशिल्ड तयार करत आहे. कोवीशिल्ड ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि फार्म कंपनी अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी मिळून बनवली आहे. ही लस सध्या भारतात अंतिम टप्प्यात आहे.

पूनावाला यांनी प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये म्हटले की, आम्ही आत्मनिर्भर भारताला लक्षात घेऊन काम केले. व्हॅक्सीनच्या फेज-3 च्या ट्रायलच्या प्रश्नावर पूनावाला म्हणाले की, आम्ही अजून प्रोसेसमध्ये आहोत. पंतप्रधानांनाही व्हॅक्सीन आणि प्रोडक्शनविषयी माहिती आहे. येणाऱ्या काळात आपल्या समोर रेग्युलेटरी सारखे चॅलेंज असतील. सरकार किती डोज खरेदी करणार हे अजून ठरलेले नाही, पण असे वाटते की, हेल्थ मिनिस्ट्री जुलैपर्यंत 300 ते 400 मिलियन डोजवर विचार करत आहेत. कोव्हशील्डचा मृत्यूदर कमी करण्यातही फायदा होईल. यामुळे हॉस्पिटलायजेशन 0% होईल अशी अपेक्षा आहे. कोवीशील्डच्या जागतिक चाचणीत हॉस्पिटलाइजेशन 0% राहिले. विषाणूचा परिणाम 60% कमी होईल.

कोवीशिल्डच्या फायनल फेजच्या ट्रायल दोन प्रकारे करण्यात आल्या. पहिल्यामध्ये ही 62% प्रभावी दिसली. तर दुसरीमध्ये 90% पेक्षा जास्त प्रभावी होती. सरासरी, प्रभावीपणा सुमारे 70% आहे.  SII कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी नुकताच लसीचे उत्पादन सुरू केल्याचा दावा केला आहे. जानेवारीपासून दरमहा 5-6 कोटी लस तयार केल्या जातील. 8 ते 10 कोटी डोसचा साठा जानेवारीपर्यंत तयार होईल. शासनाची मंजुरी मिळाल्यावर पुरवठा सुरू केला जाईल.

पुणे

लसीचे नाव : कोवीशील्ड
फॉर्म्युला : ऑक्सफोर्ड विद्यापीठ/ ब्रिटिश फार्मा कंपनी अ‍ॅस्ट्रॅजेनेका
बनवणारी कंपनी : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया
प्लांट: पुणे (महाराष्ट्र)
स्टेटस : ट्रायल अंतिम टप्प्यात





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com