७ नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून देशपातळीवर साजरा व्हावा

७ नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून देशपातळीवर साजरा व्हावानागपूर
संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील सातारा या शहरात असणा-या छ. प्रतापसिंह हायस्कूल मध्ये ७ नोव्हेंबर १९०० रोजी इयत्ता पहिलीच्या (इंग्रजी) वर्गात प्रवेश घेतला. हा दिवस राज्यभर सर्व शाळांमधून "विद्यार्थी दिवस" साजरा हावा यासाठी पत्रकार अरुण जावळे यांनी प्रयत्न केले. त्यास अनुसरून महाराष्ट्र सरकारने ७ नोव्हेबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून २०१७ ला घोषित केला. आता हा दिवस भारतभर व्हायला हवा.  डॉ. अब्दूल कलाम यांच्या नावाने वाचक दिन देशभर साजरा केला जातो, तसा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने संपूर्ण भारतात विद्यार्थी दिवस साजरा होणं गरजेच असून महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे घेतलेल्या शिक्षणाचा एकंदरीत आलेख पाहता  शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी आणि शिक्षकांना त्यापासून प्रेरणा मिळावी ही काळाची गरज आहे. 


    भारतीय समाजाला जबरदस्त प्रेरणा आणि चालना देण्याच्या दृष्टीने तसेच शालेय शिक्षण चळवळ अधिक गतिमान करण्याच्या हेतूने ७ नोव्हेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन म्हणजेच 'विद्यार्थी दिवस' हा अत्यंत महत्वाचा ऊर्जादायी दिवस आहे. नवा, समृध्द, शक्तिशाली भारत उभा करायचा असेल, तमाम गोरगरिबबांच्या, दलित- वंचितांच्या आणि एकूणच सर्व भारतीय समाजाच्या नव्या पिढीला शिक्षणाच्या मुख्य धारेत आणायचे असेल तसेच एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही हे पहायचे असेल तर "विद्यार्थी दिवसाचे गांभीर्य वा महत्त्व फारच औचित्यपूर्ण ठरणार आहे. या आग्रही मागणीचा केंद्र सरकारने गारभीर्यपूर्वक विचार करावा असे आवाहन पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने करण्यात आल्याची माहिती पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख कपिल लिंगायत यांनी दिली आहे.


------------------------


 


 ^सर्वांना महत्वाचे*  विनम्र आवाहन
खालील पत्र राष्ट्रपती व प्रधानमंत्र्यांना पाठवाप्रति,


मा. राष्ट्रपती / प्रधानमंत्री
भारत सरकार नवी दिल्ली.


विषय-महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाप्रमाणे देशभरात 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून घोषित करण्याबाबत
.
संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील सातारा या शहरात असणा-या छ. प्रतापसिंह हायस्कूल मध्ये ७ नोव्हेंबर १९०० रोजी इयत्ता पहिलीच्या (इंग्रजी) वर्गात प्रवेश घेतला. हा दिवस राज्यभर सर्व शाळांमधून "विद्यार्थी दिवस" साजरा हावा यासाठी पत्रकार अरुण जावळे यांनी प्रयत्न केले. त्यास अनुसरून महाराष्ट्र सरकारने ७ नोव्हेबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून २०१७ ला घोषित केला. आता हा दिवस भारतभर व्हायला हवा.  डॉ. अब्दूल कलाम यांच्या नावाने वाचक दिन देशभर साजरा केला जातो, तसा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने संपूर्ण भारतात विद्यार्थी दिवस साजरा होणं गरजेच असून महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे घेतलेल्या शिक्षणाचा एकंदरीत आलेख पाहता  शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी आणि शिक्षकांना त्यापासून प्रेरणा मिळावी ही काळाची गरज आहे. 
    भारतीय समाजाला जबरदस्त प्रेरणा आणि चालना देण्याच्या दृष्टीने तसेच शालेय शिक्षण चळवळ अधिक गतिमान करण्याच्या हेतूने ७ नोव्हेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन म्हणजेच 'विद्यार्थी दिवस' हा अत्यंत महत्वाचा ऊर्जादायी दिवस आहे. नवा, समृध्द, शक्तिशाली भारत उभा करायचा असेल, तमाम गोरगरिबबांच्या, दलित- वंचितांच्या आणि एकूणच सर्व भारतीय समाजाच्या नव्या पिढीला शिक्षणाच्या मुख्य धारेत आणायचे असेल तसेच एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही हे पहायचे असेल तर "विद्यार्थी दिवसाचे गांभीर्य वा महत्त्व फारच औचित्यपूर्ण ठरणार आहे. आपण या पत्राचा गाभीर्यपूर्वक विचार करावा, ही विनंती.


आपला 
xxxxxxx


--------------------------------


 


 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने ७ नोव्हेंबर हा दिवस 'विद्यार्थी दिवस' म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय २७ ऑक्टोबर, २०१७ रोजी घेतला.  अतिउच्च दर्जाची विद्वता व ज्ञान असतानाही आंबेडकरांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले, आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले यामुळे शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून घोषित केले. या दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा आयोजित केल्या जातात


इतिहास -  ७ नोव्हेंबर १९०० रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये (आता प्रतापसिंह हायस्कूल) पहिल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला होता. येथे ते इ.स. १९०४ पर्यंत म्हणजेच चौथी पर्यंत शिकले. शाळेत त्यांच्या नावाची भिवा रामजी आंबेडकर अशी नोंद आहे. शाळेच्या रजिस्टरमध्ये १९१४ क्रमांकासमोर बाल भिवाची स्वाक्षरी आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळेने जपून ठेवला आहे. इ.स. २००३ पासून पत्रकार अरुण जावळे हे शाळा प्रवेश दिनाचे आयोजन करत आलेले आहेत. या दिनाला विद्यार्थी दिवस म्हणून घोषित करण्याची मागणी त्यांनी अनेकदा महाराष्ट्र शासनाला केली होती. शेवटी इ.स. २०१७ मध्ये महाराष्ट्र शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून ठरविला 


उद्देश -  साताराच्या प्रवर्तन संगठनाचे अध्यक्ष अरुण जावळेंनी ७ नोव्हेंबर ला राज्य शाळाप्रवेश दिन म्हणून घोषित करण्याची मागणी महाराष्ट्राच्या सामजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या समक्ष केली होती. त्यांच्या मागणीवर दोन्ही मंत्र्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा मधील प्रवेश दिन ७ नोव्हेंबर ला “विद्यार्थी दिवस” म्हणजे साजरा करण्याता निर्णय घेतला. इ.स. २०१७ मध्ये बाबासाहेबांच्या शाळा प्रवेश या घटनेचे स्मरण म्हणून तसेच विद्यार्थ्यांना ‘शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असून त्याच्या कठोर परिश्रमाची जाण व्हावी यासाठी’ शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला 


https://www.wikiwand.com मधून साभार


 


 


 


 


--------------------------------------------


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA