न्हावा शिवडी सागरी सेतू प्रकल्प संघटना (ग्रामस्थ मंडळ संघर्ष समिती जासई )तर्फे सिडकोला निवेदन.
उरण
उरण तालुक्यातील जासई गावात सिडको प्रशासनातर्फे विविध प्रकल्प, कामे जोरात सुरु आहेत मात्र जासई गावातील शेतकऱ्यांचे, ग्रामस्थांचे प्रश्न तसेच पडून आहेत त्या त्वरित सोडविण्यात यावेत यासाठी न्हावा शिवडी सागरी सेतू प्रकल्प संघटना (ग्रामस्थ मंडळ संघर्ष समिती जासई )चे पदाधिकारी अध्यक्ष सुरेश पाटील, सरपंच संतोष घरत, धर्माशेठ पाटील, यशवंत घरत, संजय ठाकूर, सुनील घरत, पदमाकर घरत,, जितेंद्र पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, जॉईंट मॅनेजर कैलास शिंदे यांना निवेदन दिले मागण्या त्वरित पूर्ण करण्यात यावेत अशी विनंती सिडको प्रशासनाकडे करण्यात आली. 15 दिवसाच्या आत मागण्या पूर्ण न झाल्यास चालू असलेली सर्व कामे, प्रकल्प बंद करण्याचा इशारा समिती तर्फे देण्यात आला आहे.
ग्रामस्थ मंडळ संघर्ष समिती जासईच्या प्रमुख मागण्या
1)शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी संपादित करण्यात येणार आहेत त्या मोबदल्यात विकसित भूखंडाची जागा आणि कालावधी लिहून द्यावा. तसेच भूखंड मिळण्याचा डेव्हलोपमेंट चार्ज रद्द करावा.
2)गरजेपोटी बांधलेली सर्व घरे नियमित करावीत. आणि वाढीव गावठाण घोषित करावे तसेच 19/12/2014 च्या MTHl च्या कराराची अंमलबाजवणी करावी
3)सिडकोकडून आलेल्या जमीन संपादित करण्याच्या नोटिसावर ज्यांनी हरकत घेतली आहे त्यांच्या नोटिसा रद्द कराव्यात, प्रकल्पा अंतर्गत प्रकल्पग्रस्तांना उलवे येथे प्लॉट उपलब्ध करून द्यावेत.
4)जमिनी संपादित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या सातबारावर ज्यांची नावे आहेत त्या सर्वांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले द्यावेत.
5)प्रथम नुकसान भरपाई देण्यात यावी नंतरच कामे सुरु करण्यात यावीत
6)प्रकल्पामध्ये स्थानिकांनाच नोकऱ्या व व्यवसाय मिळावेत.
7)मैदान समाजमंदिर, स्म्शान भूमी दफन भूमी आणि पिण्याच्या पाण्याची टाकी यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी
8)जासई ग्रामपंचायत साठी विकास निधी मिळावा
9)पावसाळ्यात 135 नागरिकांच्या घरात पाणी घुसले होते त्या सर्वांना नुकसान भरपाई मिळावी तसेच गटारांची कामे त्वरित करण्यात यावीत.
10)उरण बेलापूर मार्गावर जासई येथे रेल्वे स्टेशन व्हावे.
11)श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल व लोकनेते दि.बा पाटील ज्यू. कॉलेज जासई साठी खेळाचे मैदान मिळावे
12)हुतात्मा भवन जासईचे काम लवकरात लवकर सुरु करावे.
0 टिप्पण्या