कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या दृष्टीकोनातून नियोजन करण्याचे काम सुरु आहे- मध्य रेल्वे

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या दृष्टीकोनातून नियोजन करण्याचे काम सुरु आहे- मध्य रेल्वेमुंबई
मागील अनेक दिवसांपासून मुंबई शहर व उपनगरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी रेल्वे उपनगरीय गाड्या कधी सुरु होणार याबाबत सातत्याने विचारणा करण्यात येत होती. तसेच कधी एकदा लोकल गाडी सुरु होते अशी अवस्था झाली होती. यावर आता लोकल रेल्वे सर्वच नागरिकांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून सर्वांनाच लोकलने प्रवास करण्यास रेल्वेने परवानगी द्यावी अशी मागणी करणारे पत्र रेल्वेला पाठविले.  राज्य सरकारने पाठविलेल्या पत्रावर आम्ही विचार करत असल्याची माहिती मध्य रेल्वेने एका ट्विटच्या माध्यमातून ट्विटरवर दिले. आधीच कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यात प्रवाशांमध्ये शारिरीक अंतर पाळले जाणे आवश्यक आहे. त्यादृष्टीकोनातून योजना करणे आवश्यक आहे. त्या योजनेवर सध्या रेल्वेकडून काम सुरु आहे. तसेच सर्वांसाठी रेल्वे प्रवासाची परवानगी दिल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यादृष्टीकोनातूनही नियोजन करण्याचे काम सुरु असल्याचे मध्य रेल्वेने आपल्या ट्विटच्या माध्यमातून जाहीर केले. 


कोरोनाचा प्रादुर्भावही रोखला जावा आणि सर्वांना लोकलने प्रवासही करता यावा यासाठी राज्य सरकारने वेळापत्रक निश्चित केले आहे. ते खालील प्रमाणे..... सकाळी ७.३० वाजता सुटणाऱ्या पहिल्या लोकलने प्रवास करण्यास सर्वांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या आणि क्यु आर कोड असलेल्या व्यक्तींसाठी सकाळी ८.३० ते १०.३० ही वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. सकाळी ११ ते ४.३० या कालावधीत कोणताही व्यक्ती प्रमाणित तिकीट आणि मासिक पास या आधारे प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. संध्याकाळी ५ ते ७.३०या कालावधीत पुन्हा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवास करता येणार आहे. तर रात्री ८ वाजल्यापासून शेवटची लोकलच्या कालावधीपर्यंत कोणताही व्यक्ती प्रवास करू शकणार आहे. या नव्या वेळापत्रकानुसार रेल्वेने आपली सेवा सर्वांसाठी खुली करावी तसेच त्यादृष्टीने रेल्वेच्या फेऱ्या वाढवाव्यात अशी विनंती राज्य सरकारने रेल्वेला केली होती.


 राज्य सरकारने महिलांना प्रवास करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर रेल्वेने नियमित सेवा सुरु केली नाही. ज्यामुळे महिला प्रवाशांना सुविधा मिळत नाहीय. एकीकडे रेल्वेमंत्री पियुष गोयल हे रेल्वे सेवा सुरु करण्यास तयार आहे,मात्र राज्य सरकारने परवानगी दिली नाही असे सांगत आहेत. परंतु राज्य सरकारने आता परवानगी देवून सेवा का दिली जात नाही असा सवाल करतानाच केंद्र सरकार यामध्ये राजकारण करत असल्याचा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मालिक यानी केला  रेल्वेने नियामत सेवा सुरु करा... जादा गाड्या सुरु करा... गर्दी होवू नये यासाठी अतिरिक्त सेवा सुरु करा अशी मागणीही त्यांनी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या