११ प्रमोटी आयएएस अधिकाऱ्यांना  नियुक्त्या

११ प्रमोटी आयएएस अधिकाऱ्यांना  नियुक्त्यामुंबई:
सुमारे महिनाभरापूर्वी राज्यातील २० हुन अधिक अतिरिक्त जिल्हाधिकारी पदासह समकक्ष असलेल्या मंत्रालय आणि सहकार विभागातील अधिकाऱ्यांना आयएएस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली होती. मात्र त्यांना नियुक्ती प्रदान करण्यात आली नव्हती त्यापैकी ११ प्रमोटी आयएएस अधिकाऱ्यांना आज १० नोव्हेंबर रोजी नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. यापैकी थेट आयएएस यर सिंह यांची सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव विशेष चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा अपवाद वगळता व्ही.पी.फड यांची औरंगाबादच्या करमणूक विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त पदावरुन उस्मानाबादच्या जिल्हा परिषदच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली 


के.एच.बगटे यांची शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या पदावरुन राज्याच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक पदी नियुक्ती करण्यात आली. एस.एल.पाटील यांची महानंदच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली. डि.व्ही.स्वामी यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी ते नाशिक महसूलच्या उपायुक्त पदी कार्यरत होते. एस.आर.चव्हाण यांची पुणे विभागाच्या उपायुक्त पदावरुन जलस्वराज प्रकल्पाच्या संचालक पदी नियुक्ती. के.एस.तावडे यांची सिडकोच्या अतिरिक्त पदावरुन शिवशाही पुर्नवसन प्रकल्पाच्या व्यवस्थापकिय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली.


के.व्ही द्विवेदी यांची पीएमआरडीच्या अतिरिक्त आयुक्त पदावरुन पीएमआरडीएच्या महानगर प्रदेशच्या अतिरिक्त पदी नियुक्ती करण्यात आली. एस.बी.तेलंग यांची नागपूर महसूली उपायुक्त पदावरुन मार्केटींग फेडरेशनच्या व्यवस्थापकिय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली. एस.टी.टाकसाळे यांची औरंगाबाद विभागीय अतिरिक्त आयुक्त पदावरुन नागपूरच्या आदिवासी विकासच्या अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली. पी.के. पुरी यांची नाशिक विभागाच्या उपायुक्त पदावरुन पाणी पुरवठा व नागरी स्वच्छता विभागाच्या सह सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. सी.डी.जोशी यांची मुंबईच्या जात पडताळणी प्रमाणपत्र समितीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad