भरकटलेली ग्रामिण पत्रकारिता आणि मध्यमवर्गीय वृत्तपत्रे....

हे वास्तव त्या अर्ध्या हाळकुंड्यांना न पटणारच आहे....
भरकटलेली ग्रामिण पत्रकारिता आणि मध्यमवर्गीय वृत्तपत्रे....जिल्हा आणि विभागीय स्तरावरील मध्यम  वृत्तपत्रे सध्या डबघाईला आलेले आहेत. याच्या कारण मिमांसा केल्यास या वृत्तपत्रांच्या मालकांना दिवाळखोरीकडे नेणारे हे दिवस कोणामुळे किंवा कोणत्या धोरणांमुळे आलेत याचा थोडासा विचार येथे मांडण्याचा प्रयत्न केलाय. आत्ता हे कोणाच्या बाबतीत कितपत सत्य आहे ते सर्वांनी समजून घेऊन येत्या काळात सावधानता बाळगायला हरकत नाही. सध्या मोठ मोठ्या वृत्तपत्रांमध्ये तालुका, किंवा गाव प्रतिनिधी म्हणून कार्यरत असणार्‍या लोकांची दिवाळी असलेली पाहून केवळ त्यांच्या पाऊलखुणांवर आपली ओळख निर्माण करण्याकामी किंवा त्यांच्याच प्रमाणे आपलाही रुबाब, रुतबा, कमाई, वरकमाई करण्यासाठी हाळजेलेले अनेक तालुका, गाव तस्तरावरील विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील पत्रकारांना एव्हाना पत्रकार जमातीची प्रतिमा मलिन करुन त्यांच्याबद्दलची समाजमनात असलेली आस्था, प्रतिष्ठा तळागाळाला पोहोचवण्याकामी तत्पर झालेले आहेत असे म्हणायला हरकत नाही.


आपल्या कारकिर्दीच्या काळात सुरुवातील गुंतवणूक म्हणून विभागीय, जिल्हा वृत्तपत्रांना ही मंडळी थोडाफार व्यवसाय देतात. परंतू हा वर्ग पुढे आपल्या भागातील विविध शासकीय कार्यालये, नेते यांच्या मागे पिसाळल्या कुत्र्यासारखे तुटून पडतात. यातुन भलेही काही सिध्द करत असतील किंवा नसतील परंतू त्यांचा रुतबा मात्र चांगलाच आपल्या परिसरात वाढवतात. प्रत्यक्षात वृत्तपत्रासाठी नित्तांत गरजेची असलेली पात्रता असो वा नसो पण सध्याच्या डिजीटल युगात मोठ्या वृत्तपत्रांच्या बातम्यांमधील हेडींग, एंट्रो किंवा थोडाफार मजकुर आदलून, बदलून वार्तांकन करणार्‍या या मंडळींची शाळेशी कधी विद्यार्थीदशेत बनलेलीच नसते. एवढेच नाही तर गावातील टुकारांच्या म्होरक्या म्हणून किंवा शिक्षण अर्ध्यातून सुटलेले पण गुंडगिरीत पोसलेली अशी ही मंडळी पुन्हा पत्रकार म्हणून मिरवायला लागलेली असते. नेते मंडळींच्या बगलत राहून परिसरातील सुशिक्षीतांच्या हातापाया पडून नेत्यांबद्दलचे गोडवेगाणारे काही लेख,


बातम्या लिहून फुशारकी मिरवणारा हा वर्ग भविष्यात संपादक होण्यासाठी धडपडत असतो. बातमीतला मथळा कसा असावा ? संपादकिय म्हणजे काय भानगड असते, बातमी, संपादकिय किंवा लेख हे का आणि कशासाठी असतो याचा बौध्दिक लवलेशही नसलेली ही मंडळी केवळ परिसरातील चाकरमाण्यांची वास्तव, अवास्तव विषयांवर मुस्कटदाबी करुन वाहवाह आणि दबदबा निर्माण करुन माया कमावणारी ही मंडळी मध्यम विभागीय आणि जिल्हास्तरावरील वृत्तपत्रांसाठी घातक ठरत चालली आहेत. मुळात ही मंडळी अशा वृत्तपत्रांच्या संपर्कात येताना अतिशय विनम्र, हुषार, सुशिक्षीत असल्याचा आव आणतात. शिवाय कोण्यातरी नेत्याच्या शिफारशी किंवा विनवणीवर अशा वृत्तपत्रांत कार्यरत झालेली असतात. पण भविष्यात जेंव्हा ही मंडळी प्रत्यक्षात वृत्तपत्राच्या संपादकांशी, किंवा संपादकीय मंडळीशी सुध्दा एकरीची भाषा वापरून त्यांची औकात काढण्यापर्यंत जातात. तेंव्हाच त्यांचा हा दशावतार लक्षात येतो. परंतू याच वृत्तपत्राच्या जिवावर त्यांनी आपल्या परिसरात निर्माण केलेली ओळख आणि नाव, रुबाब, रुतबा याचा विसर पाडून ही मंडळी खाल्या मिठाला बैमान व्हायला मागं पुढं पाहत नाहीत. कुठल्याही आशयाच्या बातमीचे हेडिंग किंवा एंट्रोही लिहता येत नसेल, पण विसंगत विषयात बायलाईन छापण्याचा अठहास करणार्‍या अशा मंडळी ह्या अनेक ठिकाणी थोड्या थोडक्या काळात संपादका आगोदर फोरव्हीलरमध्ये फिरताना पहायला मिळालेले आहेत. 


एकीकडे सध्या वर्तमानपत्रानची शासकिय धोरणामुळे होत चाललेली फरफट ही वर्त मानपत्रांसाठी मारक ठरत आहे.. तर दुसरीकडं वृत्तपत्राच्या ओळखपत्रावर सर्वत्र मिरवत पोलीस, महसूल अधिकारी, गुंड, हातभट्टी धारकांच्या टपर्‍या, मटका किंग आदींकडून हप्ते वसुली करुन कधी हा टप्पा ओलांडलेला असतो हे कळतच नाही.
तालुक्यात, गावात, विभागात कोठेही रस्त्याचे काम, किंवा पुलाचे काम सुरु झाले की, ते आडवून त्यात चुका, गुणवत्ता, मजुरवर्गांच्या वास्तव अवास्तव गोष्टींच्या आडून कोण्यातरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांकडून त्यांची आडवणूक करुन टक्केवारी, हप्त्याची माया कमावणारी ही मंडळी खरोखरच शैक्षणिक पात्रतेत किंवा त्यांच्या वृत्तपत्रातील पत्करलेल्या व्यवसायासाठी पात्र किंवा तज्ञ असावीच असं काही या परिसरात बंधन नसतं अस सर्रास ठिकाणी दिसून येतं. त्यामुळे जिल्हा कार्यालयात किंवा मुख्य कार्यालयात वृत्तपत्र क्षेत्रासाठी आवश्यक असणार्‍या बी.जे., एम.जे. च्या पदव्या घेऊन कार्यरत असणार्‍या संपादक, उपसंपादक, जिल्हा प्रतिनिधी आणि पत्रकार यांच्यापेक्षा किती तरी पटीने कमाईला पुढे असतात हे मात्र नक्की. वयक्तिक माझा अनुभव सांगायचा झाल्यास 2015-16 साली मी माझ्या वृत्तपत्रासाठी एका तालुक्यात एक प्रतिनिधी नियुक्त केला. त्याने यापूर्वी एका मोठ्या विभागीय दैनिकात काम केल्याचा अनुभव सांगितला.


माझ्या वृत्तपत्राच्या एका विशेषांकाचा त्याच्या तालुक्यातील एका नेत्याच्या वाढदिवसाचा विशेषांकाचे नियोजन करुन हजारो, लाखोंचा व्यवसाय देण्याचे आश्‍वासन दिले. अंक प्रसिध्द झाला, तालुक्याच्या ठिकाणी मोठा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. मोठं सभागृह, सर्व शाही लवाजमा पाहून मला धक्काच बसला की मी माझ्या लग्नाला सुध्दा एवढं मोठं सभागृह घेतलं नव्हतं पण माझ्या एका विशेषांकाच प्रकाशन होतय. ऊर भरुन आला आणि माझ्या प्रतिनिधीकडं पाहून मला माझं उज्वल भविष्य दिसू लागलं. पण हे उज्वल भविष्य भविष्यातल्या 8-10 दिवसांतच दिवास्वप्न असल्याचा चपराक भास झाला. आहो विशेषांकातल्या एकूण जाहिराती पैकी मोजून 4 जाहिरातीचं बिलं दिलं तेही कमिशन वजा करुन. बाकीच्या जाहिराती आणि अन्य विशेषांची वसुली नेत्याच्या तिसर्‍या वाढदिवसानंतर ही आजुन वसुल करतोय आणि माझ्या अंकाचं काम सोडून तो आत्तापर्यंत माझ्यासारख्या चौथ्या वृत्तपत्राचा प्रतिनिधी झालाय. एकूणच ही मंडळी बिनभांडवली धंदा म्हणून जिल्हा आणि विभागीय दैनिकाकडे पाहतात  आणि थोड्या थोडक्या काळात या दैनिकांना ढबघाईला आणतात हे मात्र नक्की.


एकूणच काय तर लोकशाहीच्या  चौथ्या स्तंभाचे हे स्थंभ किती निर्ढावलेले असतात हेच यातून लक्षात येतय. त्याशिवाय ग्रामिण पत्रकारांच्या, प्रतिनीधींच्या अशा अविवेकी वागण्यामुळे येथील वार्तांकनावर किंवा लिखानावर समाजमनाचा विश्वासाच राहत नाही, यामुळेही प्रिंटमिडीयाकडे पाहण्याचा द्रष्टीकोण बदलतोय. सरकारकडून वर्तमानपत्रांना मिळणाऱ्या जाहिरातींची संख्याही कमी झालेली आहे. त्यामुळे अशी वर्तमानपत्रे येत्या काळात वर्तमानपत्रे तगली पाहिजेत अशी केवळ अपेक्षाच करावी लागेल....


संतोष स्वामी...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA