घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुविधा व्यवस्थित होत नसल्याने नागरिक त्रास

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुविधा व्यवस्थित होत नसल्याने नागरिक त्रास


टिटवाळा
जनसेवक विजय (भाऊ) देशेकर यांनी   मंगळवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी टिटवाळा पुर्व इंदिरा नगर स्मशानभूमी परीसरातील पाहणी करत असताना रहिवाश्यांनी त्यांना घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुविधा व्यवस्थित होत नसल्याने खुप त्रास सहन करावा लागत असल्याचे कळविले असता त्वरीत त्या परीसरात जाऊन तेथे सविस्तर माहिती घेतली आणि गुरुकृपा गॅस एजेंसीच्या गॅस वितरक करणाऱ्या कर्मचाऱ्याला बोलावून सक्त ताकीद दिली आणि त्यासोबतच महिलांच्या काहि अजुन तक्रारी होत्या जसे मेसेजवर येणाऱ्या रकमेच्या जास्त रक्कम घेणे,पावती न देणे,अरेरावीने बोलणे याबद्दल त्या कर्मचाऱ्याला तंबी दिली असुन यापुढे परत असा प्रकार टिटवाळा परीसरात घडत असेल तर त्या कर्मचाऱ्यांना शिवसेना स्टाईलने धडा शिकवू हे लक्षात घ्यावे सर्व महिला भगिनीना आवाहन आहे की घरगुती गॅस संदर्भात कोणतीही अडचण असल्यास थेट आमच्याशी संपर्क करावा.असे विजय (भाऊंनी) सांगितले 


तसेच त्याच परीसरात गेली कित्येक वर्ष रखडलेले स्मशानभूमीच्या कामाबद्दल गेल्या दोन महिन्यांपूर्वी आवाज उठविल्याने ठेकेदाराने स्मशानभूमीचे काम सुरु केले आहे पण आज प्रत्यक्षात तेथे जाऊन पाहणी केली असता काम खूप संथगतीने सुरु असुन सद्यस्थितीत ते बंद अवस्थेत देखील असल्याचे पाहण्यास मिळाले त्यामुळे ह्या संदर्भात सन्मा.आयुक्त KDMC यांना देखील माहिती दिली आहे. शिवसेना ग्राहक संरक्षण कंक्ष भाऊंची जनमानसातील प्रतिमा स्वच्छ आहे नेहमीच चर्चेत टिटवाळाकरांसाठी कोणत्याही विषयावर त्यांचे सर्वेक्षण सुरूच असते समस्या दूर करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेतच. जनसेवक विजय (भाऊ) टिटवाळ्यातील भगिनींना लाभलेल वरदान आहे.... 


 टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad