Top Post Ad

वसई-विरार महानगरपालिकेतील 29 गावे वगळण्यासाठी हरकती

वसई-विरार महानगरपालिकेतील 29 गावे वगळण्यासाठी हरकती

 

नवी मुंबई,
वसई-विरार महानगरपालिकेतून 29 गावे वगळणेबाबत दि.8 ऑक्टोंबर 2020 रोजी झालेल्या सुनावणीमध्ये मा.उच्च न्यायालयाने वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील 29 गावातील सर्व संबंधित व्यक्ती, नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी, संघटना यांनी या विषयीच्या आपल्या  लेखी सूचना व हरकती दि.25 नोव्हेंबर 2020 पर्यंत सादर कराव्यात. असे विभागीय आयुक्त, कोकण विभाग , नवी मुंबई यांनी कळविले आहे.

सद्यस्थितीत कोविड-19 चा प्रादूर्भाव विचारात घेता प्रत्यक्ष सुनावण्या घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील व्यक्ती, संस्था, लोकप्रतिनिधी यांना आपल्या लेखी हरकती, सूचना, निवेदने सादर करण्यासाठी पुरेशी संधी देणे आवश्यक असल्याने  हरकती, सूचना, निवेदने लेखी स्वरुपात स्विकारण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यक्रम निश्चित केला आहे व अधिकारी यांना निर्देशित करण्यात आले आहे.

 

लेखी सूचना व हरकती दाखल करण्याचा कालावधी दि.17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2020 (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत) असा राहील. सूचना व हरकती दाखल करण्याची ठिकाणे पुढीलप्रमाणे *1)* उपविभागीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय वसई जि.पालघर *2)* उपायुक्त (सामान्य), वसई-विरार महानगरपालिका उपायुक्त यांचे कार्यालय, विरार जि.पालघर *3)* निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर जि.पालघर *4)* प्रादेशिक उपसंचालक, नगरपालिका प्रशासन विभाग, कोकण भवन नवी मुंबई. तरी उक्त कार्यक्रमानुसार वसई-विरार महानगरपालिकेतून 29 गावे वगळण्याबाबत संबंधित इच्छुक व्यक्ती, संस्था, लोकप्रतिनिधी यांनी उपरोक्त नमुद ठिकाणी सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत लेखी हरकती, सूचना, निवेदने सादर कराव्यात. असे विभागीय आयुक्त, कोकण विभाग , नवी मुंबई यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com