केंद्राच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी एलटीए व बोनस 

केंद्राच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी एलटीए व बोनस 


केंद्राच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी एलटीए व बोनस मिळाला आहे. अनेक राज्य सरकारे व रेल्वेनेही बोनसची घोषणा केली आहे. अनलॉकपासून उद्योगांतील भरभराटीमुळे बाजारपेठेला चालना मिळू शकते. रिलायन्स, मारुती, विप्रो, इन्फोसिससह अनेक कंपन्यांनीही पूर्ण पगारासह बोनस, प्रमोशन आणि पगारवाढ दिली आहे. दरम्यान, बोनस-पगारवाढ किंवा सरकारच्या घोषणांमुळे बाजारपेठेत किती पैसा येईल, याचा अचूक अंदाज कुणीही वर्तवू शकत नाही.


मात्र एम.के. ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसनुसार, एलटीए, बोनसमुळे बाजारात चैतन्य पसरले आहे. केंद्राप्रमाणे खासगी कंपन्यांनीही मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामुळे बाजारपेठेत एक ते दीड लाख कोटी रुपये येऊ शकतात. रिटेलर्स असोसिएशनचे सीईओ कुमार राजागोपालन सांगतात, दिवाळीपासून लग्नसराईही सुरू होत आहे. यामुळे नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये बाजारपेठेत दोन लाख कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज आहे.


या घोषणांचा बाजारपेठेवर होईल परिणाम
- केंद्राच्या ४७ लाख कर्मचाऱ्यांसाठीच्या विविध योजनांद्वारे ३६ हजार कोटी रुपये बाजारपेठेत येतील. रेल्वे ७८ दिवसांचा बोनस देणार आहे.
- मारुती-सुझुकीने ‌वार्षिक व्हेरिएबल परफॉर्मन्स रिवॉर्डनंतर ऑक्टोबरमध्ये पगारवाढ दिली.
- रिलायन्सने पगार कपात बंद केली आहे. बोनसही मिळणार.
- आयसीआयसीआय बँकेने कर्मचाऱ्यांच्या पगारात ८ % वाढ आणि बोनसही दिला.
- टाटा मोटर्स स्पेशल बोनस व प्रॉडक्शन लिंक पेमेंट देणार.
- एअरटेलने ८०% कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरपासून पगारवाढ दिली.
- भास्कर समूहाच्या सर्व कंपन्या ऑक्टोबरच्या पगारासोबत बोनसही देणार.
- जिंदल स्टील व पॉवरने पूर्ण वेतन लागू केले आहे.
- एशियन पेंटने बेसिक पगाराच्या बरोबरीने बोनस व पगारवाढ दिली.
- महिंद्रा ने जुलै-ऑगस्टमध्ये बोनस व पगारवाढ दिली.


 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA