Top Post Ad

प्राथमिक पातळीवर अर्थसहाय्य करण्यास सुरुवात

प्राथमिक पातळीवर अर्थसहाय्य करण्यास सुरुवात - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



सोलापूर
अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र केवळ काहीतरी घोषणा करणार नाही. जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या कुटुंबाना अर्थसहाय्य करणे आम्ही सुरु केले आहे. अजून परतीचा पाऊस पूर्ण गेलेला नाही. वेधशाळेने पुढील काही दिवस आणखी पावसाचा इशारा दिला आहे. हे संकट टळलेले नाही. धोक्याचा इशारा आहे, मात्र पंचनामे सुरु झाले असून ते पुर्ण झाल्यावर संपूर्ण माहिती येताच प्रत्यक्ष मदत केली जाणार आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले. दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री सोलापूर येथे आले असता यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार, कृषी मंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार विनायक राऊत, आमदार शहाजी बापू पाटील, प्रणिती शिंदे, महापौर श्रीकांचना यन्नम, माजी राज्य मंत्री सिद्धराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, पुरुषोत्तम बरडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले,  जे जे काही करता येणे शक्य व आवश्यक आहे ते सगळं केल्याशिवाय राहणार नाही. मात्र सध्या संकट संपलेले नाही. प्राणहानी होऊ देऊ नका अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. पूर परिस्थितीमध्ये राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन केंद्राकडे मदत मागितली पाहिजे, शेतकऱ्यांचे दुःख कमी केले पाहिजे. राजकारणाचा चिखल उडवू नये असा टोला भाजपा आणि विरोधकांना त्यांनी लगावला. पावसाची ही परिस्थिती आत्ताच, आजच कळली असे नाही. आम्ही सातत्याने याची माहिती घेत होतो आणि प्रशासनही संपर्कात होते. उद्या आणि परवाही मी पूरग्रस्त भागात फिरणार आहे. यापूर्वीही निसर्ग चक्रीवादळ येऊन गेले, पूर्व विदर्भात पूर आला , त्यावेळीही मदत केली. शुक्रवारी पंतप्रधानांचा सुध्दा मला फोन आला होता. त्यांनी आवश्यक ती मदत करू असे सांगितले आहे. त्यामुळे केंद्राकडे मदत मागण्यात काही गैर नाही. पाऊस विचित्र पडतोय. एका ७२ वर्षाच्या शेतकऱ्याने सांगितले की, त्याच्या संपूर्ण आयुष्यात त्याने असा पाऊस पाहिलेला नाही उजनी धरणातील विसर्गाबाबत पूर्ण माहिती घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


 


तर दुसरीकडे  महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार बांधावर जाऊन अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. पवारांनी आज तुळजापूर परिसरातील काक्रंबावाडी, लोहारातील सास्तुर, राजेगांव, उमरग्यातील कवठा, औसा तालुक्यातील उजनी, उस्मानाबादमधील पाटोदा, करजखेडा या गावांना भेटी देऊन अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. 'राज्य सरकारला जी काही मदत करायची आहे, ती मदत करत असतो. आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राला कर्ज काढावे लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भागाची पाहणी करून कर्ज घेऊन लोकांना या संकटातून बाहेर काढावे.


केंद्र सरकारनेही राज्याला मदत करण्याची गरज आहे असे पवार म्हणाले.  त्यांच्याकडे कोणती जादू दिसत आहे. आले की लगेच प्रश्न सोडवतील. आमची विनंती आहे की, त्यांनी आम्हालाही थोडी जादू शिकवावी. म्हणजे आम्हालाही त्यांची मदत होईल, असा टोलाही पवारांनी विरोधकांना लगावला आहे. पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर मदत करण्यासाठी आश्वासन दिले आहे. निवडणुकीच्या काळात आम्ही राजकारणी एकमेकांची जी काही मदत घ्यायची ती घेतो. भूजमध्ये भूकंप आला होता. तेव्हा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली होती. भाजपचे पंतप्रधान होते त्यांनी पक्ष न बघता मदत केली. देवेंद्र फडणवीस इथे येणार असतील तर स्वागतच आहे. आणखी कुणी काही करत असतील तर स्वागत आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे, असेही शरद पवार म्हणाले.


 


शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकार घेणार असून
कॅबिनेटच्या बैठकीत निश्चितरुपाने मदत जाहीर करेल - नवाब मलिक


मुंबई
कुठल्याही शेतकर्‍यांना अडचणीच्या काळात अडचणीत राहू देणार नाही. शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकार घेणार असून कॅबिनेटच्या बैठकीत सरकार निश्चितरुपाने मदत जाहीर करेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली.  अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पवारसाहेबांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही सरकारकडे शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवाय मुख्यमंत्रीही दौर्‍यावर आहेत. दौर्‍यावरुन परत आल्यावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चितरुपाने भरपाई देण्याची भूमिका राहणार आहे. त्याचबरोबर केंद्रानेही इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यावर मदत करण्याची जबाबदारी असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com