राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा करंजा जेट्टीचे बांधकाम पाहणी दौरा
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा करंजा जेट्टीचे बांधकाम पाहणी दौरा
दौ-यासंदर्भात ठेकेदार व संबंधीत अधिका-यांना कडक सूचना

 


 

उरण
उरण तालुक्यातील अत्यंत महत्वकांक्षी असलेल्या करंजा बंदर जेट्टीचे काम धीम्या गतीने सुरु आहे त्यामुळे या प्रकल्पाच्या विकासाला गती देण्यासाठी व संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास, बंदरे , महसूल, खारजमिन व विशेष सहाय्य राज्यमंत्री  अब्दुल सत्तार यांनी २८ ऑक्टोबर रोजी उरण करंजा बंदर जेट्टी बांधकामाच्या पाहणी संदर्भात दौरा केला. सदर दौऱ्याप्रसंगी  ठेकेदाराला व संबंधीत अधिका-यांना जेट्टीचे बांधकाम एप्रिल २०२१ पर्यंत व जेट्टीच्या पहिल्या फेसचे काम जानेवारी २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले. 

 

यावेळी मंत्र्यांसमवेत शिवसेना जिल्हाप्रमुख  आमदार मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, गटनेते गणेश शिंदे , करंजा मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष भालचंद्र कोळी नाखवा, ग्रा.सं. जिल्हाकक्ष प्रमुख रमेश म्हात्रे, पंचायत समिती सदस्य हिराजी घरत, उपतालुकासंघटक के.एम्. घरत, अमित भगत, शहर प्रमुख विनोद म्हात्रे,चेतन म्हात्रे ,हेमंत गौरीकर, विभागप्रमुख हरेश्वर म्हात्रे, एस्. के. पुरो, रजनीकांत पाटील, नगरसेवक अतुल ठाकूर, शिक्षकसेनेचे कौशिक ठाकूर सर,महेश गावंड सर, युवा सेनेचे विधानसभा अध्यक्ष नितेश पाटील,नयन भोईर, सरपंच हिना कोळी, उपविभाग प्रमुख रवी पाटील, के. एल्.  कोळी  तसेच करंजा शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खुद्द मंत्र्यांनीच आदेश दिल्याने उरण मधील करंजा प्रकल्पाच्या कामाला आता गती येणार आहे.


 

 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या