पेटीएम मॉलचा 'महा शॉपिंग फेस्टिवल'

पेटीएम मॉलचा 'महा शॉपिंग फेस्टिवल'
उत्पादने आणि उपकरणांच्या विस्तृत श्रेणीवर आकर्षक सौदे, सवलत आणि कॅशबॅक


मुंबई
पेटीएम मॉल ‘महा शॉपिंग फेस्टिवल’सह सणासुदीच्या हंगामास खास बनवीत आहे. उत्पादने आणि उपकरणांच्या विस्तृत श्रेणीवर आकर्षक सौदे, सवलत आणि कॅशबॅक मिळवा. ई- कॉमर्स प्लॅटफॉर्मने सिटीबँकेसह भागीदारी करीत क्रेडिट आणि डेबिट कार्ड व्यवहारांवर ३००० रुपयांपर्यंत अतिरिक्त कॅशबॅकची सुविधादेखील दिली आहे. पेटीएम मॉलमध्ये फ्लॅश विक्रीची सुविधादेखील देण्यात आली असून ज्यात निवडक उत्पादने आणि व्यापारी मालावर सौदे आणि सवलती देण्यात आल्या आहेत. ४,४९० रुपयांपासून सुरु होणाऱ्या सॅमसंग, विवो, ओपो स्मार्टफोनवर ५ टक्के अतिरिक्त कॅशबॅकसह ६० टक्क्यांपर्यंत तर जेबीएल स्पीकर्स, बीओएटी इअरफोन आणि क्रोमकास्टवर अतिरिक्त १५ टक्के कॅशबॅकसह ७५ टक्क्यांपर्यंत सवलत उपलब्ध आहे.


वर्क फ्रॉम होमपासून इतर उपकरणांसाठी पेटीएम मॉल हे टॉप डेस्टिनेशन असून  लॅपटॉप खरेदीवर ४० टक्क्यांपपेक्षा अधिक सवलत देण्यात आली आहे. अॅसर नायट्रो ५ (एमआरपी: १,०९,९९९)- जे ९व्या जनरेशन इंटेल कोअर i५ प्रोसेसरसह, ८ जीबी रॅम आणि १ टीबी एचडीडी  तसेच २५६ जीबी एसएसडीसह लोडेड आहे. हे ३८ टक्के फ्लॅट डिस्काउंटसह ६७,९९९ रुपये किंवा ४२,००० रुपये किंवा एमआरपीपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे. बँक ऑफर (३००० रुपये किंमतीची) आणि कॅशबॅक (५००० रुपये किंमतीची) ऑफर्सनी पुढील आणखी ५०,००० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळतो. १३ इंचाचा अॅपल मॅकबुक एअर बुक (एमआरपी ९९,९०० रुपये) १.६ GHz क्लॉक रेट व ८ व्या जनरेशन इंटेल कोअर i५ प्रोसेसरसह समर्थित असून त्यात ८ जीबी रॅम व १२८ जीबी एसएसडी  उपलब्ध असून ते ७६,९०० रुपयांपासून उपलब्ध आहे. 


पेटीएम मॉल अॅलन सोली, अॅरो, व्हॅन ह्युसेन आणि व्हेरो मोडा अशा अग्रेसर ब्रँडवर ५० ते ८० टक्के सवलत तसेच १००० कॅशबॅकही देत आहे. २४९ रुपयांपासून सुरु होणा-या वूमन वेस्टर्न वेअरवर ऑफर आणि अॅपरल१० वर ५०० रुपयांची कॅशबॅक उपलब्ध आहे. कुर्ती आणि कुर्त्यांवर ४० % ते ५०% ऑफ आणि हँडबॅग व क्लचवर ९० टक्क्यांपर्यंत ऑफ आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर स्मार्टवॉचची किंमत ७० टक्क्यांनी कमी झाली असून यावर अतिरिक्त ५,००० रुपये कॅशबॅकही उपलब्ध आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA