शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी होताच स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य
साफसफाई कामाच्या पाहणीकरिता महापालिका आयुक्त डॉ. शर्मा रस्त्यांवर
ठाणे
कोरोनाच्या संसर्ग कमी होत असून सध्या शहरातील साफसफाई आरोग्याच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय असून महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी आपला मोर्चा आता स्वच्छता मोहिमेकडे वळवला आहे. शहरातील स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य देत प्रभागसमितीनिहाय साफसफाई कामाच्या पाहणीकरिता महापालिका आयुक्त डॉ. शर्मा रस्त्यांवर उतरले. आज सायंकाळी महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी बारा बंगला रोड येथून चालतच साफसफाई कामाची पाहणी करण्यास सुरुवात केली.यामध्ये बारा बंगला रोड, भीमशक्ती चौक, स्टेशन रोड, कोपरी ब्रिज आदी ठिकाणांच्या साफसफाई कामाची पाहणी केली. यावेळी उप आयुक्त संदीप माळवी, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे आदी उपस्थित होते.
कोरोनाचा संसर्ग कमी होत असून शहरातील स्वच्छता अतिशय महत्वाचा विषय असून महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी दिलेल्या आदेशानुसार गेल्या काही दिवसापासून प्रत्येक प्रभागसमितीनिहाय साफसफाईच्या कामाला वेग आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 2 ऑक्टोबर 2020 ते 16 ऑक्टोबर 2020 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत असून या निमित्ताने महापालिका आयुक्त डॉ .शर्मा रोज विविध ठिकाणांची स्वच्छता कामाची पाहणीसाठी स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान शहरातील ज्या दुकानांसमोर कचरा आहे त्या सर्व दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
0 टिप्पण्या