जिल्हास्तरीय मानधन निवड समित्या रखडल्या
हजारो वयोवृद्ध कलावंत मानधनाच्या प्रतिक्षेत
मुंबई
राज्यात एकूण ३६ जिल्हे आहेत.त्यापैकी ३४ जिल्ह्यात पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार जिल्हास्तरीय जेष्ठ वयोवृद्ध कलावंत मानधन निवड समिती स्थापन केली जाते. एक जेष्ठ कलावंत अथवा साहित्यिकांची या समितीचा अध्यक्ष म्हणून निवड केली जाते.तर समितीचे सदस्य सचिव म्हणून संबंधित जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे काम पाहतात.या समितीमध्ये इतर ही चार ते पाच वेगवेगळया कला क्ष्रेत्रातील मान्यवर सदस्यांचा समावेश असतो. मात्र राज्यातील पालकमंत्र्यांच्या निष्काळजीपणामुळे मागील दहा महिन्यापासून जिल्हास्तरीय जेष्ठ वयोवृद्ध कलावंत मानधन निवड समितीच्या नियुक्त्या राखडल्या आहेत. यामुळे हजारो वयोवृद्ध लोककलावंत आणि साहित्यिक मानधन लाभाच्या प्रतिक्षेत आहे. सध्या केवळ सहा जिल्ह्यात मानधन निवड समित्या अस्तित्वात आहेत.
मुंबई आणि उपनगर (मुंबई) या दोन जिल्ह्यात पालकमंत्री यांनी निर्देशित केलेल्या एका मान्यवर जेष्ठ कलावंतांची निवड समिती प्रमुख म्हणून केली जाते. या समितीचे सदस्य सचिव म्हणून सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे काम पाहतात. या समितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी किंवा तहसिलदार आणि इतर विविध कला क्ष्रेत्रतील चार ते पाच मान्यवराचा समावेश असतो. समितीला वयोवृद्ध कलावंत/साहित्यिक यांनी मानधनासाठी केलेल्या अर्जाची छाननी करून राज्य शासनाला लाभार्थ्यांचे अर्ज शिफारशीसह पाठविण्यात अधिकार असतात.पूर्वी वर्षात केवळ ६० अर्ज मंजूर करण्याचे अधिकार जिल्ह्यास्तरीय समितीला होते. आता शंभर अर्ज मंजूर करण्याचे अधिकार प्रत्येक जिल्हा निवड समितीला दिले आहेत.
दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ रोजी ना.उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. परंतु अद्याप सत्तेच्या ओढातानीत अशासकीय महामंडळाच्या नियुक्त्या रखडल्या आहेत.याचा फटका सांस्कृतिक कार्य खात्यांच्या अंतर्गत येणाऱ्या समित्यांना ही बसला आहे. या संदर्भात सांस्कृतिक कार्य संचालनालयाने राज्यातील सर्व पालकमंत्र्यांना, तातडीने जिल्हास्तरीय जेष्ठ कलावंत/साहित्यक मानधन निवड समिती गठीत करण्याचे पत्र धाडले आहे.परंतु यापैकी सांगली,रायगड,सिंधुदुर्ग, रत्नागिरी, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी मानधन निवड समित्या गठीत केल्या आहेत.समित्या लवकर गठीत।कराव्या म्हणून संबंधित संचालनालयाने स्मरण पत्र ही दिल्याचे समजते.मात्र अद्याप कोणत्याच हालचाली पालकमंत्र्यकडून झालेल्या दिसत नाही.यामुळे हजारो नवीन अर्ज सध्या।जिल्हा परिषदेच्या कार्यालयात धूळ खात पडून आहेत.याबाबत लवकरच या क्ष्रेत्रातील कार्य करणाऱ्या संघटना आपापल्या भागातील पालकमंत्री महोदयाना जाब विचारणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळत आहे.
0 टिप्पण्या