Trending

6/recent/ticker-posts

बिना सहकार नाही उद्धार...

 नमस्कार....


Covide-19 अर्थात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशाचीच अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. कोरोनाच्या या अजस्त्र लाटेचा फटका सर्वच व्यवसायांना बसला आहे. कमी अधिक प्रमाणात प्रत्येक भारतीय या अवस्थेतून मार्गक्रमण करत आहे. या कोरोनाच्या लाटेत सर्वाधिक वाहून गेली ती पत्रकार मंडळी. महाराष्ट्रातील नावाजलेल्या संपादक, वृत्त संपादक, बातमीदार, पेजमेकर, जाहिरात विभागातील तसेच अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. काही हातावर मोजण्याइतकीच वर्तमानपत्रे तग धरून उभी आहेत. मात्र भांडवलदारी अंगीकारलेल्या या व्यवसायाने सर्वसामान्य पत्रकाररुपी कर्मचाऱ्यांकडे पाठ फिरवली आहे. अखेर सातत्याने समाजाच्या अन्याय, अत्याचारावर आसूड ओढणाऱ्या या मंडळींनी आता लेखनीला म्यान करत इतर व्यवसायाकडे मार्गक्रमण केले आहे. . पत्रकार आहे म्हणून अन्य संस्था त्यांना नोकरी देतांना हात आखडता घेतात. त्यामुळे सर्वाधिक घुसमट या क्षेत्राची होत आहे. एका मोठ्या संकटातून हा वर्ग जातोय. पण कुणालाही ना सोयर ना सुतक. पत्रकारांची एक पिढीच या कोरोनाने उध्वस्त केली आहे. त्यामुळे याना मोलाचे सहकार्य करण्याची गरज आहे. आपण जाहिरातीच्या माध्यमातून.... आपल्या वैयक्तिक शुभेच्छा.... आपल्या संस्था/मंडळ/संघटनांच्या शुभेच्छापर जाहीराती देऊन सहकार्य कराल ही अपेक्षा...


A/c NAME :             SHAKYARATN ENTERPRESES

BANK NAME :       THANE BHARAT SAHAKARI BANK LTD

IFCSC CODE NO. :   TBSB0000006

ACCOUNT NO. :        006110000001103


Google pay - 8828963276

--------------------------------

थोडसं प्रजासत्ताक जनता विषयी....

सन १९९८ साली प्रजासत्ताक या नावाने ६ डिसेंबर रोजी विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी अनेक मित्रमंडळी सोबत होती. अनेकांनी जाहिरातीच्या माध्यमातून मोलाचे सहकार्य केले. पत्रकारीता आणि त्याचबरोबर समाजसेवा अशी आवड असणारी काही मंडळींनी मिळून महापरिनिर्वाण दिनाचा १६ पानाचा विशेष अंक प्रकाशित केल्यानंतर आणि त्याचं व्यवस्थित मार्केटिंग झाल्यामुळे  मग स्वत:चं वर्तमानपत्र काढण्याची ओढ लागली. त्यातून प्रजासत्ताकच्या अंकाची सुरुवात झाली. लहान मशीनवर छोटा टॅब्यूलाईट साईजचा अंक सुरु झाला. सुरुवातीला मासिक स्वरुपात ७ महिने सुरु होता. नोकरी सांभाळून चार ते पाच मित्रांच्या सहाय्याने हा अंक सातत्याने सुरु ठेवण्याची धडपड सुरु होती. त्यासाठी मग अंक रजिस्ट्रर करण्याची गरज भासली. जेणेकरून त्याला काहीसं व्यवसायिक रुप देता येईल. मात्र दिल्ली दरबारी पाठवलेला रजिस्ट्रेशनचा अर्ज सुमारे वर्षभरानंतर रद्द झाल्याचे उत्तर आले. दरम्यानच्या काळात आर्थिक गणित न जुळल्याने मग आता रजिस्ट्रर झाल्यावरच अंक काढू असे ठरले.  पुन्हा सहा डिसेंबर १९९९ ला विशेष अंक. आणि अधूनमधून एखादा विशेष अंक. २००२ला पुन्हा नवीन टीम एकत्रित झाली. त्यांनीही अंकाबाबत सकारात्मक प्रतिसाद देत सुरु केला. चार ते पाच महिने व्यवस्थित सर्वजण आपुलकीने काम करीत होती. टीम जोशात होती. पण वर्तमानपत्राचे आणि त्यातील व्यावसायिकतेचे गणित माहित नसल्यामुळे आणि त्याचे अंग नसल्यामुळे चार महिन्यानंतर पुन्हा सर्व शांत. प्रत्येकजण आपआपले कौटुंबिक जीवन सांभाळण्यात गर्क झाले.

दरम्यान अनेक इतर अंक बाजारात येत असल्याने त्यांच्यासोबतच जुळवून काम सुरु होते. मात्र या अंकाचीही अवस्था तीच होती. दोन-तीन अंकाच्यावर हा प्रकार जातच नव्हता. जास्तीत जास्त ६ अंक काढल्यानंतर आर्थिक गणिते न जमल्यामुळे अंक बंद होत होते. अशात २००४ साली सम्राट सुरु झाला. मीही त्यासोबत जोडलो गेलो. मग प्रजासत्ताक अंकाबाबत कधीही विचार झालाच नाही. मात्र २००८ साली सम्राट आणि व्यवस्थापन यामध्ये सुरु झालेल्या वादाचे पर्यावसन विलगीकरणात झाले. एकीकडे सर्व कामगार तर दुसरीकडे सम्राट अशात व्यवस्थापन समितीने स्वत:चे वर्तमानपत्र सुरु केले विश्वसम्राट. मात्र व्यवस्थापन समिती आणि संपादकीय विभागात एकसुत्रीपणाचा अभावाने काही काळाने विश्वसम्राटची नौका हेलखावे खाऊ लागली. या दरम्यान प्रजासत्ताकचे पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याचे सुचले आणि तसा अर्ज भरला. मात्र यावेळीही सदर टाईटल तुम्हाला देता येणार नाही असे उत्तर आले. मग काही मित्रांनी सल्ला दिला, केवळ पाच नावे न देता अधिकाधिक नावे दे पाहू त्यातील एखादे तरी येईल.. त्यानुसार तब्बल २१ नावांची लिस्ट पाठवली. त्यामध्ये सर्वात वरच्या क्रमांकावर प्रजासत्ताक जनता, दुसऱ्या क्रमांकावर प्रजासत्ताक भारत आणि तिसऱ्या क्रमांकावर प्रजासत्ताक देश होता. 

मात्र यापैकी प्रजासत्ताक जनताची निवड झाली आणि तसे पत्र मिळाले. त्या दरम्यान दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये गाळा घेऊन येथेच आपले पत्रक आणि व्यवसाय सुरु करण्याचा विचार मनात आला. त्या अनुषंगाने कामाला सुरुवात झाली. ठाण्यातले आंबेडकरी चळवळीतले निष्ठावंत कार्यकर्ते विलास खांबे यांच्या प्रयत्नाने दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये गाळा मिळाला. आणि दोन ते तीन महिन्यातच विश्वसम्राटचीही घौडदौड मंदावली. आता गाळ्यामध्ये व्यवसाय सुरू करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. लागलीच अंकाचीही सुरुवात केली. टाईटल रजिस्ट्रर झाले होते आता पुढची प्रक्रिया आर.एन.आय नंबर मिळवणे त्यासाठी मग अंक काढणे गरजेचे होते. त्यानुसार वैयक्तिक खर्चाला कात्री देत कोणाच्याही आर्थिक मदतीशिवाय अंक काढण्यास सुरुवात केली. काही त्रुटी होत्या म्हणून दोन वेळा अर्ज बाद करण्यात आला. पुन्हा पाठवले अखेर ११-११-२०१० रोजी दिल्लीहून रजिस्ट्रर क्रमांक प्राप्त झाला. मात्र वर्तमानपत्राच्या पुढच्या कोणत्याही गोष्टी जसे सरकार दरबारी जाहीरातीकरिता नोंद करणे, एक्रेडेशन कार्ड मिळवणे. अशा बाबी माहिती नसल्याने त्यामध्ये प्रगती करता आली नाही. तरीही अंक अधून मधून सुरूच होता. कधी पीडीएफ तर कधी प्रिन्टींग अशा पद्धतीने आज १० वर्षाचा कालावधी लोटला. 

रजिस्ट्रेशन झाल्यानंतर   अंकाचे   accounting न केल्याचा दंड भरणे आहे. मागील दोन वर्षापूर्वी ही बाब लक्षात आल्याने दोन वर्षाचे accounting केले. आजही अंक सुरूच आहे.  दरम्यानच्या काळात अनेक मित्रमंडळी आली ज्यांनी आम्ही हा अंक पुढे चालवू असे निव्वळ आश्वासन दिले. मात्र आर्थिक बाब येताच सारेजण दुर गेले.   आज अंकाची बऱ्यापैकी प्रसिद्धी झाली आहे.  मुंबई, नवी मुंबई, ठाणे, जिल्ह्यासह इतर अनेक ठिकाणी प्रजासत्ताक जनता हे नाव लोकांना माहिती झाले आहे. त्यात मागील वर्षापासून सोशल मिडीयाद्वारे web page च्या माध्यमातून अगदी सातासमुद्रापलीकडे गेल्याची पोचपावती मिळाली आहे. मात्र केवळ प्रसिद्धी मिळाल्याने आर्थिक गणितं सुटू शकत नाहीत. प्रसिद्धी हा आर्थिक गणितं जुळवण्याचा एक भाग बनू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करणे गरजेचे आहे. 

आपण जाहिरातीच्या माध्यमातून.... आपल्या वैयक्तिक शुभेच्छा.... आपल्या संस्था/मंडळ/संघटनांच्या शुभेच्छापर  जाहीराती देऊन सहकार्य कराल ही अपेक्षा...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या