ठाण्यात वाल्मीकि जयंती निमीत्त
व्यसनाधिनता विरोधात जनजागृति करण्याचा युवकांचा संकल्प !
ठाणे
महर्षि वाल्मिकी प्रकट दिनी व्यसनमूक्ती अभियानचे कार्यकर्त्यानी महर्षि वाल्मिकी प्रतिमा समोर दीप प्रज्वलन करून समाजात वाढत जाणारी व्यसनाधिनता विरोधात जनजागृति करण्याचा संकल्प करण्यात आला. दारुचे प्रमाण वाढत असून तरुण पिढीला यापासून वाचवण्यासाठी व्यसनमुक्ति अभियान तर्फे विविध उपक्रमांद्वारे जनजागरणाची मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अभियानचे अध्यक्ष ललित मारोठीया यांनी यावेळी दिली . कार्यक्रमात बाबूलाल करोतिया, सतपाल मेहरोल, नरसीभाई मकवाना, अजय राठोड, सुनिल दिवेकर, दिलीप चौहान, राहूल कुंड, प्रवीण खैरालिया, राकेश मरोठिया , ओमप्रकाश बहानवाल, अजयवीर,आदीसह व्यसनमूक्ती अभियानचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व अभियानचे सल्लागार जगदीश खैरालिया यांनी मार्गदर्शन केले. समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी, महिलांचे सक्षमीकारण साठी नशामुक्त समाज असणे आवश्यक आहे. बहुसंख्य कुटंबातील कलहाचे कारण व्यसनाधिन व्यक्ती ठरतात. आजच्या युगात व्यसनमुक्त कुटुंब... व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. असे श्री खैरालिया यांनी यावेळी मांडले. तरूणानी महर्षि वाल्मिकी जयंतीनिमित्त युवकांनी व्यसनमुक्त समाज घडवण्याचा केलेला निर्धार हा एक आशादायक पाऊल असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
0 टिप्पण्या