Trending

6/recent/ticker-posts

नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांचे संकेत 

नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांचे संकेत मुंबई
 नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. अनलॉक 5 अंतर्गत राज्यातील सुमारे चार लाख रेस्टॉरंट, हॉटेल आणि बार पुन्हा सुरु झाले आहेत. त्यामुळे राज्यात टप्प्याटप्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील आणि नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल, अशी अपेक्षा करूया, असं विधान राजेश टोपे यांनी केले आहे. राजेश टोपे यांच्या या विधानातून लॉकडाऊनला जवळपास पूर्णविराम मिळू शकतो, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.


कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे अहमदनगरमध्ये आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू सर्व गोष्टी उघडण्यास परवागनी देण्यात येणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यात रेल्वे देखील सुरु करण्यात आली आहे. लवकरचं सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालय सुरु करण्याचा विचार असल्याचेही राजेश टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.


राज्यात मागील काही दिवसांत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे. राज्यात शनिवारी २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी झाले, तर आतापर्यंत १२ लाख ५५ हजार ७७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याचदरम्यान राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे.


 


दरम्यान मध्य रेल्वेवर जलद लोकल धावत असल्यामुळे मधल्या स्थानकांतील प्रवाशांची गैरसोय होत होती. ही गैरसोय टाळण्यासाठी आता धीम्या लोकलही सोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. सीएसएमटी ते कसारा, कर्जत मार्गावर १८  आणि सीएसएमटी ते पनवेल मार्गावर चार फेऱ्या होणार आहेत. मात्र ही लोकल फक्त चार स्थानकांत थांबवण्यात येणार आहेत.  धीम्या लोकल फेऱ्या सीएसएमटी ते कसारा मार्गावर चालवताना थानशेत आणि उंबरमाळी स्थानकात थांबा देण्यात आलेला नाही. तर सीएसएमटी ते कर्जत मार्गावरही शेलू स्थानकात थांबणार नाहीत. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल चार धीम्या लोकल फेऱ्यांनाही रे रोड, कॉटन ग्रीन, चुनाभट्टी, मानसरोवर स्थानकांत थांबा नसेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. त्यामुळे या स्थानकांतून प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांची गैरसोयच होणार आहे. ठाणे ते पनवेल  ट्रान्स हार्बर मार्गावर सध्या सहा लोकल फे ऱ्या होत असून त्यांना काही मोजक्याच स्थानकांत थांबणार आहेत. या मार्गावर मात्र धीम्या लोकल चालवण्याविषयी निर्णय झालेला नाही. 


Post a Comment

0 Comments