Trending

6/recent/ticker-posts

स्थानिक मच्छीमार, शेतकरी, बागायतदार, डायमेकर यासारखे छोटे उद्योगधंदे उद्ध्वस्त होणार

स्थानिक मच्छीमार, शेतकरी, बागायतदार, डायमेकर यासारखे छोटे उद्योगधंदे उद्ध्वस्त होणारपालघर
केंद्र व राज्य सरकार आणि जेएनपीटीच्या भागीदारीतून उभे राहणारे वाढवण बंदर अदानीसारख्या अविश्वसनीय उद्योगपतींना देण्याचा घाट घातला जात आहे. स्थानिक मच्छीमार, शेतकरी, बागायतदार, डायमेकर यासारखे छोटे उद्योगधंदे वाढवण बंदराच्या उभारणीमुळे उद्ध्वस्त होणार असल्याने माझा या बंदराला १०० टक्के विरोध राहणार असल्याचे मत शिवसेनेचे पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित यांनी व्यक्त केले.


अदानीसारख्या उद्योगपतीला वाढवण बंदरासाठी प्राधान्य देत असेल तर हा देशाला सर्वात मोठा धोका असल्याचे भीतीही गावित यांनी व्यक्त केली. केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर विविध विकासकामांसंदर्भात चर्चा करताना आपण याबाबत स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. डहाणूचे ५०० मेगावॅट क्षमतेचे थर्मल पॉवर स्टेशन उद्योगपती अंबानीकडून अदानी यांनी विकत घेतले.


पालघर जिल्ह्याच्या विविध विकासकामांसंबंधी एक प्रस्ताव राज्यमंत्र्याकडे सादर केला होता. निर्मल सागर तट समृद्धी योजनेंतर्गत सादर केलेल्या त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने २४ हजार कोटींच्या विविध कामांना त्यांनी मंजुरी दिल्याचे सांगून पालघर जिल्ह्यात ४२ कामांचा समावेश आहे. सातपाटी-मुरबे येथील मच्छीमारांच्या बोटी उभ्या करण्यासाठी मच्छीमारी बंदर उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी स्कायवॉक वसई तालुक्यातील अर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी स्कायवॉक उभारला जाणार असून एक मच्छीमार जेटी उभारली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


Post a Comment

0 Comments