निओ ग्रीन ग्रुप कंपनीच्या पुणे कार्यालयाचे उद्घाटन 

सचिन फडतरे यांच्या हस्ते  निओ ग्रीन ग्रुप कंपनीच्या पुणे कार्यालयाचे उद्घाटन पुणे
निओ ग्रीन ग्रुप कंपनी मीडिया, आय टी,स्टेशनरी,बँकिंग क्षेत्रात अग्रेसर कार्य करीत असतानाच कंपनीने निओ ग्रीन व्हेंचर या बॅनर खाली शेती उद्योगात पाऊल टाकले आहे.शेती उद्योगाला नव संजीवनी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मोलाचे सहकार्य करण्यासाठी निओ ग्रीन ची स्थापना करण्यात आली आहे. निओ ग्रीन व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड कार्यालयाचे वाकड येथे उदघाटन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सचिन फडतरे यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षित वर्गाला शेतीची आवड निर्माण व्हावी आणि हक्काचे शेतघर व शेतातील राहण्याचा अनुभव घेता यावा या उद्देशाने निओ ग्रीन ने एक मोलाची संधी उपलब्ध करून दिली आहे.


शहरात राहणाऱ्या कुटुंबाला ग्रामीण भागाची ओढ निर्माण व्हावी तसेच शेतीचा आनंद लुटता यावा आणि सोबत पर्यटन करता यावे अशी व्यवस्था निओ ग्रीन च्या माध्यमातून अनुभवता येईल असा कंपनीचा मानस आहे.दिवसे दिवस रोजगाराची समस्या वाढत असून तरुण शिक्षित वर्ग नोकरीच्या शोधात आहे अशा तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम निओ ग्रुप च्या माध्यमातून केले जात आहे. शेतघर आणि शेतातील उत्पन्न घेऊन त्यावर मासिक आर्थिक उत्पन्न देण्याची निओ ग्रीनची योजना आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad