खुनाच्या गुन्हयातील फरार आरोपीस अटक

खुनाच्या गुन्हयातील फरार आरोपीस अटक



रमेशवाडी बदलापुर पश्चिम यांच्यासोबत झालेल्या किरकोळ वादातुन अभिजीत बाबुराव जाधव याने रूपेश जनार्दन पवार वय -३४ यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारहाण केली होती. यामध्ये त्यांचा जीव गेला होता.  गुन्हा केल्यानंतर जाधव फरार झाला होता. त्याच्या विरूध्द बदलापुर व कोल्हापुर येथे खुन, अपहरण ,खंडणी ,शस्त्र अधिनियमाअंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असुन तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.


तो बदलापुर पुर्व येथून एका खुनाच्या गुन्हयातुन जामीनावर सुटलेला असताना त्याने पवार यांचा खून केल्याचे उघड झाले होते. सदरच्या गुन्हयाचा समांतर तपास सुरू असतांना पोना/दादा पाटील यांना सदर गुन्हयातील आरोपी अभिजीत जाधव हा वापी, गुजरात राज्य येथे स्वत:चे अस्तित्व लपवुन राहत असले बाबत गुप्त माहिती मिळाली. त्या अनुषंगाने  पोउपनिरी/दत्तात्रय सरक व पथकाने २७ ऑक्टोबर  रोजी विक्रमगड, वापी,सुरत, गुजरात राज्य येथे रवाना झाले. मात्र सदर आरोपी हा त्याच्या मुळगावी कोल्हापुर येथे गेल्याची माहीती मिळताच आरोपीचे शोधासाठी सदर पथक कोल्हापुर येथे रवाना झाले होते.  कौशल्यपुर्ण व संय्यमाने आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, आरोपी हा कोल्हापुर सोडुन अंबरनाथ येथे गेला आहे.  त्यानंतर पुन्हा सदर पोलीस पथक कोल्हापुर येथुन अंबरनाथ ठाणे येथे येवुन  सर्व संभाव्य माहीतीची पडताळणी करून  अभिजीत बाबुराव जाधव यास अंबरनाथ एम.आय.डी.सी. येथुन दि.३० ऑक्टोबर रोजी ताब्यात घेवुन  गुन्हा उघडकीस आणला.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad