विरोधकांचा विरोध मावळला
आझादनगर नं १ (मसाणवाडा) येथील नागरिकांचा क्लस्टर बायोमेट्रिक सव्हँला उत्तम प्रतिसाद।।
माझे घर माझी जबाबदारी हि भावना प्रत्येक आझादनगर येथील रहिवाशांच्या मनात रुजलेली असावी। टेबल सवँ दरम्यान होणार्या मिटिंगा, गल्ली तिथे मंडळ, मोच्चँबांधणी हे सवँ येड गावच पांघरूण कशासाठी अट्टाहास! कोणाला काय भेटणार, माझे डबल, आतून जीना, बाहेरून गँलरी, कागदोपत्री गोंधळ हा नाटकीय प्रसंग चालू असताना। नागरिकांच्या भावना, त्यांचे प्रश्न शासन सकारात्मकतेने सोडवण्याचे काम करत आहे। आजच्या घडीला हर एक नागरिक सव्हँ साठी पुढाकार घेत आहे।मागील काही दिवसांपासून आझादनगर येथील रहिवासी संभ्रमात पडले होते।त्यातच काही तथाकथित मान्यवर स्टंटबाजीचा बुरखा घालून वावरत होते। क्लस्टर योजना ही शासकीय खैरात आहे। ना,की खाजगी!
शासनाने आखून दिलेल्या आराखड्यानुसार प्रत्येकाला हक्काच घर भेटणारच आहे। क्लस्टर योजना राबविण्या आधी त्याची ईंतभूत माहिती मंडळांना दिली असेलच तरी देखील काही गोष्टींचा विरोधा- भास व वाजवी पेंक्षा जास्त मिळण्यासाठी काही मान्यवरांचा अट्टहास इतरांना, देखील पेचात आणू शकतो। आझादनगर वासीयांची फरफट घर मिळण्यासाठीच आहे। कारण बहुतेकांना हक्काच्या झोपडीत हि समाधान भेटत नाही! असुविधांचा अभाव, दाटलेल्या त्या गल्ली बोळातील जागेतून मोकळा श्वास रोखून हेरगिरी करत जावे लागते, पावसातील ती अदृश्य परीस्थिती, घरात शिरलेले पाणी, शौचालयातील अस्वच्छ दृश्ये! हे सर्व पाहता हर, एक नागरिकाला बिल्डिंग मध्ये घर आणि आझादनगर वासीयांचा विकास हवाच ना। पण काही बांडगूळ नटलेल्या नवरी सारखे उगाच नौटकी करतात।
मग दुसर्या बाजूने बोंब ठोकायची, आम्ही सर्व एकत्र आहोत।आमचा लढा घरासाठी आहे। मग ते सर्व मिळून केले पाहिजेच ना! आझादनगर नं १( म्हसाणवाडा) येथे काही समाजसेवक, होतकरू मान्यवर देखील आहेत। त्यांनी सुरवातीच्या पहिल्या दिवसापासून क्लस्टर बायोमेट्रिक योजनेला जाहिर पाठिंबा दिला। कारण त्यांना कोणतेही राजकारण न करता जनहिताची सेवा कराणे,सोबत आझादनगर वासीयांचा विकास होणे याच मुद्द्यांवर ते ठाम होते। त्यांच्या माध्यमातून शक्य तो क्लस्टर योजनेचा विरोधाभास टळणे आणि योजनेची अंमलबजावणी सुरू होणे हेच आझादनगर वासीयांसाठी गरजेचे आहे।।।
शब्दांकन
मनोजकुमार जगताप १५/१०/२०
0 टिप्पण्या