मुंबई उपनगरात लवकरचं गृहनिर्माण प्रकल्प- सम्यक मैत्रेय फौंडेशन

मुंबई उपनगरात लवकरचं गृहनिर्माण
सम्यक मैत्रेय फौंडेशन चा पाठपुरावामुंबई
वेगवेगळ्या उपनगरात अल्पदरामध्ये गृहनिर्माणसाठी मागील काही वर्षापासून सम्यक मैत्रेय फाउंडेशन या एनजीओच्या वतीने पाठपुरावा करण्यात येत आहे, जमीन हस्तांतरण प्रक्रिया येत्या वर्षात पूर्ण होणार आहे. गोरेगाव, बोरिवली, कांदिवली, मुलुंड व दहिसर परिसरातील सरकारी जमिनीवर गृहनिर्माण करण्यासाठी मागील काही वर्षांपासून मागणी धरून लावली आहे, घर नसलेल्यां शेकडो लोकांनी अर्ज केला असून संस्थेच्या वतीने सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे.सरकारकडून जमीन प्राप्त करून पन्नास टक्के जमीनिवर विकासकाकडून इमारती बांधून घेऊन उर्वरित जमीन विकासक स्वयंनिर्माणसाठी वापरणार आहे. 340 चौरस फुट आकाराची सदनिका सभासदांना देण्याचा प्रस्ताव सरकारकडे वारंवार पाठवला जात आहे. अशी माहिती प्रसिद्धि पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. 


घराची दारे खिडक्या पण येणार नाहीत अशा रकमेमध्ये या सदनिका उपलब्ध केल्या जाणार असून वर्षं वर्ष वाट पाहणारे डोळे जमीन हस्तांतरणाच्या प्रक्रियेला जोर आल्यामुळे सुखावले आहेत. घर नसलेल्यांना अर्ज करावयाचा असल्यास 9004545045 या व्हाट्सअप्प क्रमांकावर संपर्क साधावा असेही आवाहन इंजिओच्या वतीने करण्यात आले आहे.
एन जी ओ च्या वतीने ऍड. साबळे, ऍड मिश्रा, यांची टीम कार्य करत असून योजना पूर्णत्वास यावी म्हणून माधव माळी, कांदलगावकर, अविनाश सावंत, अशोक पवार, दीपक हंबीरे, विजय ढोलम, बालाजी वाघमारे, अथक परिश्रम घेत असून तत्कालीन मंत्री मेहता यांना दिलेला प्रस्ताव विद्यमान गृहनिर्माण मंत्री ना. जितेंद्र आव्हाड यांच्या कडे संस्थेचे अध्यक्ष राजन मकणींकर व राजेश पिल्ले यांचे शिष्टमंडळ मार्फतीने सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती सचिव श्रावण गायकवाड यांनी दिली


       वनविभाग, कोंकनविभाग प्रकरणी सहकार्य करत असून लवकरच वर्षभरात जमीन संस्थेच्या ताब्यात येणार आहे, सरकार दरबारी मागणी व पाठपुरावा करत असताना येणाऱ्या अडीअडचणीवर मात करून प्रकल्प काही वर्षातच पूर्णत्वास येईल असा आशावाद मकणींकर यांनी व्यक्त केला आहे.  विद्यमान सरकार गोरगरिबांच्या उत्थानासाठी असलेल्या जमिनी धसनदंडग्यांच्या घशात ओतत असून गोर गरिबांच्या अधिकारांची पायमल्ली होऊन गरिबी रेखा वाढत असल्याचे ही मकणींकर यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA