प्राथमिक शाळेस परवानगी नाकारली, ग्रामस्थ मंडळ नवघरचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण
प्राथमिक शाळेस परवानगी नाकारली, ग्रामस्थ मंडळ नवघरचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

 


 

उरण
उरण तालुक्यातील नवघर गावातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा जीर्ण झाली असून ती मोडकळीस आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांच्या तसेच पालकांच्या जिवितेलाही धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी नवीन इमारत बांधणयात यावी तसेच वेळोवेळी डागदुजी करावी यासाठी नवघर ग्रामस्थ मंडळने शासन दरबारी अनेक वेळा पाठपुरावा केला मात्र कोणतेही योग्य ते प्रतिसाद मिळाला नाही.नवघर ग्रामपंचायत स्वतः नवीन इमारत बांधत नाही व गावातील ग्रामस्थांना लोक वर्गणी मधून नवीन इमारत बांधण्यास सुद्धा ग्रामपंचायत परवानगी देत नाही. शेवटी ग्रामस्थ मंडळ नवघर यांनी स्वतःपुढाकार घेवून लोक वर्गणी मधून प्राथमिक शाळा नवीन बांधून देण्याची तयारी दर्शविली तशी रितसर परवानगी ग्रामस्थ मंडळने नवघर ग्रामपंचायतकडे केली होती मात्र तरीही नवघर ग्रामपंचायत या कामाला परवानगी देत नसल्याने नवघर ग्रामपंचायतच्या निषेधार्थ नवघर ग्रामस्थ मंडळाने आज दि 22 रोजी नवघर ग्रामपंचायत कार्यालया समोरच सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.

 

 

नवघर जिल्हा परिषदेच्या मोडकळीस व जीर्ण झालेल्या शाळेबद्दल येणाऱ्या भावी पीढीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचे विचार करून नवघर जिल्हा परिषद शाळेचा डागदुजी करण्याचा तसेच नवीन इमारत बांधण्याची मागणी ग्रामस्थ मंडळ नवघर तर्फे विविध शासकीय स्तरावरही करण्यात आली. जिल्हा परिषदने एकहि रुपया अनुदान आमच्या कडून मिळणार नाही या अटीवर रायगड जिल्हा परिषदने ग्रामस्थ मंडळला व नवघर ग्रामपंचायतला परवानगी दिली आहे.मात्र ग्रामपंचायतने ग्रामस्थ मंडळला परवानगी दिली नाही.ग्रामपंचायत कडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने मंडळाने 2/10/2020 रोजी उपोषणाचा निर्णय घेतला असता याबाबत उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी पुढाकार  घेवून ग्रामपंचायत कार्यालयात 1/10/2020 रोजी नवघर ग्रामस्थ मंडळ व सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांच्यात चर्चा घडवून आणली. या चर्चेत विद्यमान सरपंच आरती चोगले यांनी शाळेची नवी इमारत ग्रामपंचायत स्वतः बांधणार असून तसे लेखी स्वरूपात येत्या 5 दिवसात नवघर ग्रामस्थ मंडळाला देण्याचे मान्य केले होते.परंतु आजतागायत तसे कोणतेही पत्र नवघर ग्रामस्थ मंडळाला मिळालेले नाही. ग्रामस्थ मंडळ लोक वर्गणीतुन नवीन शाळेची इमारत बांधण्यास तयार असताना सुद्धा नवघर ग्रामपंचायत परवानगी देत नसल्याने तसेच स्वतः ही शाळेची नवीन इमारत बांधण्यास पुढाकार घेत नसल्याने ग्रामपंचायतच्या या आडमुठे धोरणाच्या निषेधार्थ नवघर ग्रामस्थ मंडळाचे सर्व पदाधिकारी-सदस्य नवघर ग्रामपंचायत कार्यालया समोर एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाला बसले असल्याची माहिती उपोषणकर्ते नवघर ग्रामस्थ मंडळचे अध्यक्ष जयप्रकाश पाटिल यांनी दिली.सामाजिक कार्यकर्ते सुधीर घरत यांनी आक्रमक भूमिका घेत या उपोषणाला जाहिर पाठिंबा दिला असून जो पर्यंत लेखी पत्र ग्रामपंचायत देत नाही व आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत या अन्याया विरोधात लढा चालूच ठेवणार असल्याचे सांगितले.

 

 

जयप्रकाश पाटिल-अध्यक्ष ग्रामस्थ मंडळ नवघर,अमित बंडा-ग्राम सुधारणा मंडळ नवघरपाडा,राजेश कडु-कार्याध्यक्ष, प्रतीक घरत-उपाध्यक्ष, अमित जोशी-सेक्रेटरी, राजेश पाटिल-सहसेक्रेटरि,ज्ञानेश्वर भोईर-खजिनदार, समाधान तांडेल-सहखजिनदार,सामाजिक कार्यकर्ते सुधीर घरत आदि ग्रामस्थ मंडळ नवघरचे पदाधिकारी-सदस्य यावेळी या लाक्षणिक उपोषणात सहभागी होते.

 

या बाबतीत नवघर ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आरती चोगले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही स्वतः शाळेसाठी नवीन इमारत बांधणार असल्याचे सांगितले. आजपर्यंत आम्ही अनेक विकासकामे केली आहेत. पुढ़ेही करत राहु. नवीन शाळा बांधण्यासाठी नवघर ग्रामपंचायत कडून सर्वतोपरि प्रयत्न चालू आहेत.कोनाचेही मन दुखावण्याचा किंवा कोणाला त्रास देण्याचा आमचा मुळीच हेतु नाही. गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक यांना सर्वप्रथम न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे.जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी नवघर ग्रामपंचायतने नेहमी पुढाकार घेतला आहे.नवघर ग्रामस्थ मंडळने ग्रामपंचायतवर केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. ग्रामपंचायत वर केलेले आरोप खोटे आहेत.नवघर ग्रामपंचायतला बदनाम करण्याचे हे प्रयत्न चालू आहेत. तेंव्हा लवकरच ग्रामपंचायतच्या माध्यमातून शाळेची नवीन इमारत उभी राहणार असल्याचे आरती चोगले यांनी सांगितले

 

एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाच्या शेवटी उरण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार महेश बालदि यांनी मध्यस्थि करून हा वाद मिटवत मी वरिष्ठ शासकीय अधिकारी वर्गांपर्यंत याचा आमदार या नात्याने पाठपुरावा करेन असे प्रत्यक्ष उपोषण स्थळी आश्वासन दिले. आमदार यांनी दिलेल्या आश्वासना नंतर उपोषण स्थगित केले.


 

 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1