मास्‍कची स्‍वच्‍छता: तुमच्‍या त्‍वचेची काळजी घेण्‍यासाठी अत्‍यंत आवश्‍यक

मास्‍कची स्‍वच्‍छता: तुमच्‍या त्‍वचेची काळजी घेण्‍यासाठी अत्‍यंत आवश्‍यक


 जागतिक आरोग्‍य संघटनेने (डब्‍ल्‍यूएचओ) कोविड-१९ ला जागतिक महामारी म्‍हणून घोषित केल्‍यानंतर मार्च महिन्‍यापासून ग्रुप या महामारीविरोधातील लढ्यामध्‍ये अग्रस्‍थानी आहे, तसेच क्षेत्रातील तज्ञांनी विषाणूच्‍या संसर्गाविरोधात पहिले संरक्षण कवच म्‍हणून मास्‍क्‍सच्‍या वापराला प्राधान्‍य देण्‍यास सुरूवात केली. महामारीमुळे लागू करण्‍यात आलेल्‍या लॉकडाउनदरम्‍यान 'हे करा' आणि 'हे करू नका' बाबत अनेक माहिती सांगण्‍यात आली. असे वाटते की, मास्‍क्‍सचा वापर भविष्‍यात देखील आपल्‍या जीवनाचा अनिवार्य भाग राहणार आहे. कामाच्‍या ठिकाणी, परिसरामध्‍ये किंवा साधे चालताना देखील तुम्‍हाला सुरक्षित ठेवण्‍यासाठी मास्‍क्‍सचा वापर अनिवार्य असणार आहे. मास्‍क्‍सचा तुमच्‍या त्‍वचेशी अधिककरून संबंध येत असल्‍यामुळे तुम्‍हाला कदाचित ब्रेकआऊट्सचा अनुभव येऊ शकतो. चला तर मग, या ब्रेकआऊट्सचा कशाप्रकारे उत्तमरित्‍या सामना करावा हे जाणून घेऊया.


पुनर्वापर होणारे मास्‍क्‍स दीर्घकाळापर्यंत वापरल्‍यास पुरळ किंवा मुरम ब्रेकआऊटचा त्रास होऊ शकतो, ज्‍याला 'मास्‍कने' असे म्‍हणतात. फेस मास्‍क्‍सचा वापर केल्‍याने त्‍वचेला होणारी जळजळ आणि ब्रेकआऊट्ससाठी अनेक कारणे असू शकतात, जसे मास्‍क्‍ससाठी वापरलेले कापड आणि चेह-यावर मास्‍क घट्ट परिधान करणे ही काही कारणे आहेत. वापरलेल्‍या कापडामुळे त्‍वचेला जळजळ होऊ शकते. ब-याच जणाच्या त्‍वचा कापडांसंदर्भात संवेदनशील असतात. मेकअप, धूळ व घामामुळे त्‍वचेवर पुरळ येतात. मास्‍क परिधान केल्‍यामुळे होणारी जळजळ हे कापडामुळे होणारी अ‍ॅलर्जी 'कॉन्‍टॅक्‍ट डर्माटिटिस'मुळे होऊ शकते. तसेच मास्‍क योग्‍यरित्‍या न धुतल्‍यामुळे निर्माण होणारे जीवाणू किंवा एकाच वापरानंतर विल्‍हेवाट करावयाच्‍या असलेल्‍या मास्‍क्‍सचा पुनर्वापर यामुळे देखील त्‍वचेला जळजळ होऊ शकते. मास्‍कच्‍या वापरामुळे नाक, हनवुटी, गाल किंवा कानांच्‍या मागे घर्षण होऊन ओरखडे निर्माण होऊ शकतात.


मास्‍क्‍सचा सुरक्षितपणे वापर करण्‍यासोबत ब्रेकआऊट्सला प्रतिबंध करण्‍यासाठी किंवा उपचार करण्‍यासाठी काही सूचना पुढीलप्रमाणे:
-        मास्‍कची स्‍वच्‍छता: पहिले व सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे मास्‍क योग्‍यरित्‍या स्‍वच्‍छ करण्‍याला सर्वाधिक प्राधान्‍य दिले पाहिजे. ते स्‍वच्‍छ धुवावे (पुनर्वापर मास्‍क) किंवा प्रत्‍येक वापरानंतर नवीन मास्‍कचा वापर करावा.
-        त्‍वचेला जळजळ होत असेल तर मास्‍क उबदार पाण्‍यामध्‍ये अॅण्‍टीसेप्टिक साबणासह स्‍वच्‍छ धुवावे. मास्‍क अगदी बारकाईने व योग्‍यरित्‍या स्‍वच्‍छ धुवावे आणि वापरापूर्वी पूर्णपणे कोरडे करावेत. यासाठी वॉशिंग मशिनमध्‍ये मास्‍क कोरडे करता येऊ शकतात.
-        त्‍वचेची काळजी: मेकअपमुळे चेह-यावरील छिद्रे बद होतात आणि मेकअप करून मास्‍क परिधान केल्‍याने चेह-यावर मुरम किंवा ब्रेकआऊट्स वाढू शकतात. सध्‍यातरी कोणत्‍याही कॉस्‍मेटिक्‍सचा वापर करणे टाळा किंवा किमान उपचार सुरू असेपर्यंत टाळा.
-        सौम्‍य फेशवॉशने दररोज सकाळी व रात्रीच्‍या वेळी चेहरा स्‍वच्‍छ धुवत नियमितपणे त्‍वचेची काळजी घ्‍या. यामुळे चेह-यावरील छिद्रे उघडतील. नतर पाणी-आधारित मॉइश्‍चरायझरचा वापर करण्‍याऐवजी ऑईल फ्री मॉइश्‍चरायझरचा वापर करणे सर्वोत्तम आहे.


-        चेह-यावरील पिंपल्‍सना हात लावू नका किंवा फोडू नका. यामुळे जळजळ वाढेल आणि त्‍या भागाला संसर्ग होऊ शकतो.
-        एक्‍सफोलिएशन देखील महत्त्वाचे आहे, ते त्‍वचेतील पेशी पुन्‍हा निर्माण होण्‍यास मदत करते. एक्‍सफोलिएण्‍ट्समध्‍ये असलेले सॅलिसायलिक किंवा ग्‍लायकोलिक अॅसिड्स मुरमांना प्रतिबंध करण्‍यामध्‍ये मदत करतील. हे सीरम्‍सच्‍या रूपात देखील उपलब्‍ध आहेत.
-        क्रीम व मलमामध्‍ये वापरण्‍यात येणारे घटक (पेट्रोलियम जेली) पेट्रोलॅटमयुक्‍त उत्‍पादनांचा वापर करणे टाळा.
-        फेस मास्‍कचा वापर करण्‍यापूर्वी आणि केल्‍यानंतर चेहरा स्‍वच्‍छ धुवून त्‍यावर मॉइश्‍चरायझर लावा.
-        योग्‍य कापडाची निवड करा: त्‍वचेचा प्रकार जाणून घ्‍या. तुम्‍हाला नकोसी वाटणारी समस्‍या म्‍हणजे त्‍वचा व चेह-याला खाज सुटणे. कापडाची संवेदनशीलता प्रत्‍येक व्‍यक्‍तीसाठी वेगळी आहे आणि विभिन्‍न प्रकारच्‍या कापडांसह विविध टेक्स्चर्स देखील येतात. ओलावा शोषून घेणारे कोमल व श्‍वास घेण्‍यास योग्‍य असलेल्‍या सामग्रीची निवड करा.
-        मूलभूत स्‍वच्‍छताविषयक सवयींकडे दुर्लक्ष करू नका, जसे मास्‍क परिधान करण्‍यापूर्वी हात स्‍वच्‍छ धुवा, तसेच घरी परतल्‍यानंतर देखील हात स्‍वच्‍छ धुवा. सतत त्‍वचेला जळजळ होत असेल तर कदाचित संसर्ग झालेला असावा, यासंदर्भात त्‍वरित डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍या.
लक्षात ठेवा, आपण सध्‍या अशा काळात राहात आहोत, जेथे अनपेक्षित प्रतिकूल स्थि‍तीवर मात करण्‍यासाठी सुरक्षितता व खबरदारीचे उपाय अत्‍यंत अनिवार्य आहेत.


---  डॉ. किरण गोडसे 
नवी मुंबईतील वाशी येथील फोर्टिस सहयोगी हॉस्पिटल
हिरानंदानी हॉस्पिटलमधील कन्‍सल्‍टण्‍ट डर्माटोलॉजिस्‍ट


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA